शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
2
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
3
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
4
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
5
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
6
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
7
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
8
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
9
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल
10
बजाजच्या या शेअरनं दिला 22000% हून अधिकचा परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; आता...!
11
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना
12
'हा' अमित मिश्रा वेगळा... कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झालेला क्रिकेटर नेमका कोण? जाणून घ्या...
13
"...तर भविष्यात भयानक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता होती"; 'वक्फ'बाबत किरण रिजिजूंचे वक्तव्य
14
फक्त मराठीच अनिवार्य, हिंदी सक्तीवर सरकारचे एक पाऊल मागे; नवीन आदेश काढणार
15
तुम्हाला वारंवार तहान लागते, पाणी प्यायल्यावरही घसा कोरडा होतो? 'या' गंभीर आजारांचे संकेत
16
मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्रासारखाच दर्जा; मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय
17
बँकेने गुन्हा दाखल केल्याने त्याची सटकली, साथीदारांना सोबत घेत अख्खी बँकच पेटवली
18
UPSC पास झाल्यानंतर उमेदवारांना पहिला पगार कधी आणि किती मिळतो? पाहा...
19
"मुस्लीम राजेशाही असो अथवा लोकशाही, वक्फ सर्वत्र...;" सौदीत पोहोचलेल्या PM मोदींवर ओवेसींचा निशाणा
20
Jammu and Kashmir : दहशतवाद्यांनी पर्यटकांना आधी विचारला 'हा' प्रश्न अन् सुरू केला गोळीबार, नेमकं काय घडलं?

कोल्हापूर : बांधकाम कामगारप्रश्नी पुढील आठवड्यात कामगार मंत्र्यांसोबत बैठक : चंद्रकांत पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2018 16:10 IST

दिवाळीत नोंदीत बांधकाम कामगारांना १० हजार रुपये भेट द्यावी, यासह विविध प्रलंबित मागण्यांसाठी लाल बावटा बांधकाम कामगार संघटनेने सोमवारी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा दिला होता. तत्पूर्वी आंदोलकांना चर्चेला बोलवून पालकमंत्र्यांनी पुढील आठवड्यात कामगार मंत्र्यांसोबत बैठक घेण्याचे आश्वासन दिल्याने मोर्चा रद्द करण्यात आला.

ठळक मुद्देबांधकाम कामगारप्रश्नी पुढील आठवड्यात कामगार मंत्र्यांसोबत बैठक : चंद्रकांत पाटील लाल बावटा बांधकाम कामगार संघटनेतर्फे निवेदन : मोर्चा रद्द

कोल्हापूर : दिवाळीत नोंदीत बांधकाम कामगारांना १० हजार रुपये भेट द्यावी, यासह विविध प्रलंबित मागण्यांसाठी लाल बावटा बांधकाम कामगार संघटनेने सोमवारी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा दिला होता. तत्पूर्वी आंदोलकांना चर्चेला बोलवून पालकमंत्र्यांनी पुढील आठवड्यात कामगार मंत्र्यांसोबत बैठक घेण्याचे आश्वासन दिल्याने मोर्चा रद्द करण्यात आला.बांधकाम कामगारांच्या मागण्या अनेक वर्षांपासून शासनपातळीवर प्रलंबित आहेत. याच्या निषेधार्थ बांधकाम कामगार संघटनेतर्फे सोमवारी पालकमंत्र्यांच्या कावळा नाका येथील कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा देण्यात आला होता. जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून कामगार शहरात दाखल होत होते. तत्पूर्वी सकाळी अकराच्या सुमारास पालकमंत्र्यांनी आंदोलकांना असेंब्ली रोडवरील एका हॉटेलमध्ये चर्चेला बोलवून निवेदन स्वीकारले.

यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष भरमा कांबळे, कार्याध्यक्ष चंद्रकांत यादव, सचिव शिवाजी मगदूम यांनी मागण्यांबाबत चर्चा केली. यावर कामगारांच्या मागण्यांबाबत पुढील आठवड्यात १० ते २० नोव्हेंबर दरम्यान कामगार मंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांच्यासोबत बैठक घेऊ, असे आश्वासन पालकमंत्री पाटील यांनी दिले. मंत्र्यांनी चर्चेला वेळ देऊन निवेदन स्वीकारून बैठकीचे आश्वासन दिल्याने नियोजित मोर्चा रद्द करण्यात आला.निवेदनातील मागण्या अशा, बांधकाम कामगारांची बंद केलेली मेडिक्लेम योजना तातडीने सुरू करावी, नोंदीत कामगारांना घर बांधणीकरिता १० लाख रुपये अनुदान द्यावे, ६० वर्षांवरील कामगारांना ५ हजार रुपये पेन्शन द्यावी, मंडळाकडून मिळणाऱ्या लाभाची रक्कम दुप्पट करावी, नोंदीत कामगारांना सुरक्षा किट व गृहोपयोगी साहित्याचे किट देण्याऐवजी रोख रक्कम द्यावी, मंडळाकरिता स्वतंत्र कार्यालय स्थापन करून, स्वतंत्र स्टाफ नियुक्त करावा.

आजरा, गडहिंग्लज, चंदगड व पन्हाळा, शाहूवाडी, गगनबावडा या दोन्ही विभागांमध्ये स्वतंत्र सरकारी कामगार अधिकारी कार्यालय सुरू करावे. यावेळी प्रकाश कुंभार, आनंदा कराडे, विजय कांबळे, दत्ता गायकवाड, कुमार कागले, नवनाथ चौगुले, अजित मगदूम, विक्रम खतकर, संदीप सुतार, भगवान घोरपडे, आदी उपस्थित होते.

 

 

टॅग्स :Chandrakant Dada Bachu Patilचंद्रकांतदादा बच्चू पाटीलkolhapurकोल्हापूरMorchaमोर्चा