शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

‘मोरुच्या मावशी’चे कोल्हापूर ‘माहेरघर’ आवडते शहर : कलाकारांशीही जवळीक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2018 00:40 IST

कोल्हापूर : विविध नाटके, चित्रपटांच्या चित्रीकरणासाठी अभिनेते विजय चव्हाण यांची कोल्हापुरातील अनेक कलाकारांशी जवळीक निर्माण झाली. विशेष म्हणजे ‘नम्र कलाकार’ म्हणून ते सर्वांमध्ये प्रसिद्ध होते. त्यांच्या अचानक जाण्याने या सहृदयी कलाकाराला मुकल्याची भावना मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गजांनी शुक्रवारी व्यक्त केली.अभिनेते विजय चव्हाण यांचे खूप वर्षांपासून कोल्हापूरशी आपुलकीचे नाते होते. आनंद काळे, ...

कोल्हापूर : विविध नाटके, चित्रपटांच्या चित्रीकरणासाठी अभिनेते विजय चव्हाण यांची कोल्हापुरातील अनेक कलाकारांशी जवळीक निर्माण झाली. विशेष म्हणजे ‘नम्र कलाकार’ म्हणून ते सर्वांमध्ये प्रसिद्ध होते. त्यांच्या अचानक जाण्याने या सहृदयी कलाकाराला मुकल्याची भावना मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गजांनी शुक्रवारी व्यक्त केली.

अभिनेते विजय चव्हाण यांचे खूप वर्षांपासून कोल्हापूरशी आपुलकीचे नाते होते. आनंद काळे, सर्जेराव पाटील आणि मिलिंद अष्टेकर या स्थानिक कलाकारांशी त्यांचे मैत्रीचे संबंध होते. दिग्दर्शक यशवंत भालकर आणि महेश कोठारे यांच्या अनेक चित्रपटांच्या चित्रीकरणासाठी ते कोल्हापूरला आले होते; पण ते कोल्हापूरकरांच्या लक्षात राहिले ते म्हणजे त्यांच्या ‘मोरुच्या मावशी’ नाटकातील मावशीच्या पात्रामुळे. केशवराव भोसले नाट्यगृहात ‘मोरुच्या मावशी’चे झालेले सर्व प्रयोग हाउसफुल्ल झाले होते. विशेष म्हणजे कोल्हापुरात चव्हाण यांचे दोन दिवसांचे चित्रीकरण असले की त्यांना येथील दिग्दर्शक तीन दिवसांच्या चित्रीकरणासाठी करारबद्ध करत असत. कारण दोन दिवस ते चित्रीकरणात गर्क असायचे आणि उरलेल्या एका दिवसात विश्रांती घेत. 

विजय चव्हाण केवळ विनोदी कलाकार नव्हता. कोणतीही भूमिका तो अत्यंत गांभीर्याने करत असे. माझ्या ‘पैज लग्नाची’, ‘घे भरारी’, ‘नाथा पुरे आता’ आणि ‘आबा जिंदाबाद’, आदी चित्रपटांत त्याने काम केले आहे. दिग्दर्शकाला मान देणारा व नम्र कलाकार होता.- यशवंत भालकर, ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शकमाझा व त्यांचा परिचय कोल्हापुरातील ‘मोरुच्या मावशी’ च्या पहिल्या प्रयोगापासून पक्का मित्र असा झाला. खासीयत म्हणजे त्याने या आधुनिक जगाची कास धरतानाही मोबाईल फोन कधी वापरला नाही, हे विशेष होय. चित्रीकरणाच्या तारखा, व्यवहाराचे बोलणेही तो दूरध्वनीवरून करत होता.- मिलिंद अष्टेकर, ज्येष्ठ निर्मिती व्यवस्थापक