शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : चुयेतील मधुबाला मगदूमची राष्ट्रीय भरारी,  बालविज्ञान परिषदेत बाजी; गाईच्या दूध उत्पादनाबाबत प्रकल्प सादर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2018 19:42 IST

चुये (ता. करवीर) येथील एसएचपी हायस्कूल आणि आनंदरावजी पाटील कनिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थी मधुबाला मारुती मगदूम हिने राष्ट्रीय पातळीवर भरारी घेतली आहे. अहमदाबाद येथे झालेल्या २५ व्या राष्ट्रीय बालविज्ञान परिषदेतील उत्कृष्ट पंधरा प्रकल्पांमध्ये तिने सादर केलेल्या प्रकल्पाची निवड झाली आहे. तिने या परिषदेत ‘ओझोलाचा गाईच्या दूध उत्पादनावर परिणाम’ हा प्रकल्प सादर केला.

ठळक मुद्देगाईच्या दूध उत्पादनाबाबत प्रकल्प सादरचुयेतील मधुबाला मगदूमची राष्ट्रीय भरारीबालविज्ञान परिषदेत बाजीराष्ट्रीय पातळीवरील यशाचा मोठा आनंद

कोल्हापूर : चुये (ता. करवीर) येथील एसएचपी हायस्कूल आणि आनंदरावजी पाटील कनिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थी मधुबाला मारुती मगदूम हिने राष्ट्रीय पातळीवर भरारी घेतली आहे. अहमदाबाद येथे झालेल्या २५ व्या राष्ट्रीय बाल विज्ञान परिषदेतील उत्कृष्ट पंधरा प्रकल्पांमध्ये तिने सादर केलेल्या प्रकल्पाची निवड झाली आहे. तिने या परिषदेत ‘ओझोलाचा गाईच्या दूध उत्पादनावर परिणाम’ हा प्रकल्प सादर केला.केंद्र सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागातर्फे अहमदाबाद येथील सायन्स सिटीमध्ये दि. २७ ते ३१ डिसेंबर दरम्यान राष्ट्रीय बालविज्ञान परिषद घेण्यात आली. यात देशभरातून विविध ५८८ प्रकल्प सादर झाले. यातील उत्कृष्ट १५ प्रकल्पांची निवड करण्यात आली. यामध्ये चुये (ता. करवीर) येथील मधुबाला मगदूम हिच्या प्रकल्पाची निवड झाली.

तिने ‘टू स्टडी द इफेक्ट आॅफ ओझोला आॅन प्रॉडक्शन आॅफ काऊस मिल्क’ हा प्रकल्प सादर केला. या प्रकल्पाच्या संशोधनात तिच्यासह प्रतिक्षा रघुनाथ पाटील, आकांक्षा सदाशिव पाटील, रेश्मा राजेंद्र पाटील, सानिका शहाजी पाटील यांचा समावेश होता. त्यांना बालविज्ञान परिषदेचे राज्य समन्वयक एम. बी. मुडबिद्रीकर, यु. जी. वाकुरे, डॉ. मस्के यांचे मार्गदर्शन लाभले.

दरम्यान, राष्ट्रीय बालविज्ञान परिषदेसाठी महाराष्ट्रातून ३० प्रकल्प सादर झाले. यात ‘अझोला’सह तीन प्रकल्पांचा समावेश होता. त्यात स. म. लोहिया स्कूलच्या विरेंद्रसिंह नरेंद्र जाधव याने कृत्रिम रंगाचा शरीरावर होणारा परिणाम अभ्यासणे आणि बाहुबलीतील एम. जी. शहा विद्यामंदिरच्या रिद्धी शैलेश चव्हाण हिने ‘कृषी कचऱ्याचे व्यवस्थापन’ हा प्रकल्प सादर असल्याचे मुडबिद्रीकर यांनी सांगितले. ते म्हणाले, राष्ट्रीय परिषदेतील यशामुळे कोल्हापूरचा नावलौकीक झाला आहे. उत्कृष्ट पंधरा प्रकल्पातील सहभागामुळे मधुबाला हिला

काय आहे अझोलाअझोला हे पशुखाद्य आहे. ते गाईचे दूध उत्पादन आणि गुणवत्ता वाढविते. या अझोलामध्ये उच्च प्रोटीन, आवश्यक अमिनो अ‍ॅसिडस्, शरीरवाढीसाठी आवश्यक असणारी खनिजे जसे की, कॉपर, फेरस, मॅग्नशिअम, पोटॅशिअम आदी आणि ड्रायमॅटर बेसिसवर २५ ते ३० टक्के प्रथिने आहेत. जे दूधाचे उत्पादन वाढवितात. इतर खाद्यांपेक्षा ते पौष्टिक आणि स्वस्त असल्याचे मधुबाला हिने सांगितले.

राष्ट्रीय पातळीवरील यशाचा मोठा आनंदकरवीर तालुक्यातील दूध उत्पादन चांगले आहे. ते अधिक वाढविण्याच्या उद्देशाने मी आणि माझ्या अन्य विद्यार्थीनी मैत्रिणींनी एखादे पशुखाद्य तयार करण्याचे संशोधन सुरू केले. त्यातून अझोलाची निर्मिती झाल्याचे मधुबाला हिने सांगितले.

ती म्हणाली, या पशुखाद्याची आम्ही चुये येथील गायींवर चाचणी घेतली. यातून दूध उत्पादनात वाढल्याचे दिसून आले. आमचा हे संशोधन प्रकल्प राष्ट्रीय पातळीवर उत्कृष्ट ठरल्याचा खूप आनंद होत आहे. माझ्या यशात आई-वडील, शिक्षक, एम. बी. मुडबिद्रीकर यांचा मोठा वाटा आहे. आम्ही या संशोधनाची व्याप्ती वाढवून महिला आणि कुपोषितांसाठी चांगले खाद्य तयार करण्याचे ध्येय आहे. 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरscienceविज्ञान