शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: कोल्हापूरात दणक्यात लक्ष्मीपूजन, दीपोत्सवाला अभ्यंगस्नानाने प्रारंभ

By संदीप आडनाईक | Updated: November 12, 2023 20:29 IST

Kolhapur News: धकाधकीचे जीवन, ताण-तणावातूनही वेळ काढत गेल्या पंधरा दिवसांपासून ज्या सणाची जय्यत तयारी सुरू होती ती दिवाळी म्हणजेच दीपोत्सवाला खऱ्या अर्थाने आज, रविवारपासून प्रारंभ झाला आहे.

- संदीप आडनाईककोल्हापूर - धकाधकीचे जीवन, ताण-तणावातूनही वेळ काढत गेल्या पंधरा दिवसांपासून ज्या सणाची जय्यत तयारी सुरू होती ती दिवाळी म्हणजेच दीपोत्सवाला खऱ्या अर्थाने आज, रविवारपासून प्रारंभ झाला आहे. अभ्यंगस्नान झाल्यावर देवाचे दर्शन आणि आई-वडिलांचे आशीर्वाद घेतले गेले. त्यानंतर देवाला फराळ व गोडधोडाचा नैवेद्य दाखवण्यात आला. पहाटेपासूनच फटाक्यांची आतषबाजी सुरू होती आणि सायंकाळी लक्ष्मीपूजनावेळी तर सारा परिसर आतषबाजीच्या कडकडाटाने दणाणून गेला. सायंकाळी घरोघरी आणि व्यापारी पेढ्यांवर लक्ष्मीपूजनाचा सोहळा पार पडला.

दिवाळी म्हणजे आकाशकंदिलाचा झगमगाट, पणत्यांचे तेज, चटपटीत फराळ, फटाक्यांची आतषबाजी, गोधन पूजन, धनत्रयोदशी, लक्ष्मीपूजन, पाडवा, भाऊबीज अशा या सहा दिवसांच्या उत्सवाला प्रारंभ झाला. वसू बारस हा दिवस शेतकरी बांधवांकडून तर शुक्रवारी पार पडलेला धनत्रयोदशी हा दिवस वैद्यकीय क्षेत्राकडून साजरा केला गेला. परंतु नरकचर्तुदशीच्या अभ्यंगस्नानाने खऱ्या अर्थाने दिवाळीची सुरुवात झाली.

दणक्यात झाले लक्ष्मीपूजननरकचर्तुदशीला उटणे आणि सुवासिक तेलाने अभ्यंगस्नान झाले. या अभ्यंगासाठी उटणे, तेल, साबणासह अत्तर, डिओ, सेंट अशा सुवासिक साहित्यांची खरेदी केली होती. सायंकाळी लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने लक्ष्मी कुबेराचे फोटो, लाह्या, बत्तासे, झेंडूची फुले, पान, सुपारी, वस्त्रमाळ, धने, पाच फळे, केळी, धूप, कापूर, सुवासिक अगरबत्ती, अशा पूजा पार पडल्या. दिवसबर पूजेच्या या साहित्यांची महापालिका चौक जोतिबा रोड, शिंगोशी मार्केट, टिंबर मार्केट येथे विक्री सुरू होती. झेंडू ५० रुपये किलो, पाच फळे ८० ते ९० रुपयांना तर धूप, अगरबत्तीची त्यांचा सुगंधावरून किंमत आकारण्यात येत होती.

टॅग्स :Diwaliदिवाळी 2023kolhapurकोल्हापूर