शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : खंडेनवमी, शाही दसरा सोहळा गुरुवारी, पूजेच्या साहित्याची खरेदी : बाजारपेठेत उत्साह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2018 16:29 IST

कोल्हापूर : शारदीय नवरात्रौत्सवात  गुरुवारी खंडेनवमी अर्थात विजयादशमी साजरी होत आहे. यानिमित्त श्री अंबाबाईची रथातील पूजा बांधण्यात येईल. सायंकाळी ...

ठळक मुद्देखंडेनवमी, शाही दसरा सोहळा गुरुवारीपूजेच्या साहित्याची खरेदी : बाजारपेठेत उत्साह

कोल्हापूर : शारदीय नवरात्रौत्सवात  गुरुवारी खंडेनवमी अर्थात विजयादशमी साजरी होत आहे. यानिमित्त श्री अंबाबाईची रथातील पूजा बांधण्यात येईल. सायंकाळी सहा वाजता ऐतिहासिक दसरा चौकात शाही दसरा सोहळा होणार आहे; तर मुहूर्ताच्या खरेदीसाठी बाजारपेठ सज्ज झाली आहे.गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेल्या शारदीय नवरात्रौत्सवाची सांगता  गुरुवारी होणार आहे. यंदा खंडेनवमी आणि विजयादशमी या दोन्ही तिथी एकाच दिवशी आल्याने खंडेनवमीची शस्त्रपूजा व विजयादशमीचा दसरा सोहळा आजच होणार आहे.

अंबाबाईच्या जागराच्या होमामुळे आज सकाळी नऊ वाजल्यानंतर अंबाबाईचे दर्शन सुरू होईल. दसऱ्याला देवस्थान समितीच्या वतीने श्री अंबाबाई, महाकाली व महासरस्वती या तीनही देवतांना मानाची साडी अर्पण करण्यात येणार आहे. या साडीवरच श्री अंबाबाईची रथातील सालंकृत पूजा बांधली जाईल.सायंकाळी पाच वाजता तोफेच्या सलामीनंतर श्री अंबाबाईची उत्सवमूर्ती पालखीत विराजमान होऊन आपल्या लवाजम्यानिशी निघेल. त्याचवेळी गुरुमहाराज व श्री तुळजाभवानी देवीची पालखीही दसरा चौकासाठी प्रस्थान करील.

न्यू पॅलेसमधून शाहू छत्रपती, खासदार संभाजीराजे, माजी आमदार मालोजीराजे यांचे मेबॅक कारमधून दसरा चौकात आगमन होईल. पालख्यांचे दसरा चौकात आगमन झाल्यानंतर सायंकाळी सहा वाजता देवीची आरती होईल. शाहू छत्रपतींच्या हस्ते शमीपूजन झाल्यानंतर सोने लुटण्याचा कार्यक्रम होईल.त्यानंतर पालख्या परतीच्या मार्गाला लागतील. श्री अंबाबाईची पालखी सिद्धार्थनगर, पंचगंगा घाट येथून रात्री मंदिरात परतेल. यानिमित्त झेंडूची फुले, लव्हाळा या पूजेच्या साहित्याची मोठ्या प्रमाणात आवक झाली आहे.

झेंडूची फुले २० रुपये पाव किलो, तर लव्हाळा, आपट्याची पाने १० रुपयांना विकली जात होती. शहरातील मिरजकर तिकटी, पापाची तिकटी, महाद्वार रोड, जोतिबा रोड, बिंदू चौक, बिनखांबी गणेश मंदिर या प्रमुख बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी नागरिकांची गर्दी लोटली होती.

मुहूर्तासाठी बाजारपेठा सज्ज

वर्षातील साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या दसऱ्याच्या मुहूर्ताच्या खरेदीसाठी बाजारपेठा सज्ज झाल्या आहेत. इलेक्ट्रॉनिक्सच्या वस्तू, होम अप्लायन्सेस, फर्निचर, दुचाकी-चारचाकी वाहनांचे शोरूम, गुजरीसह ब्रॅँडेड अलंकारांची शोरूम्स सजविण्यात आली आहेत. अनेक कंपन्यांनी या वस्तूंच्या खरेदीवर आकर्षक सूट व भरघोस बक्षीस योजना जाहीर केली आहे. 

 

टॅग्स :Dasaraदसराkolhapurकोल्हापूर