शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : आबालवृद्धांनी लुटला गणेशदर्शनाचा आनंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2018 11:51 IST

गणेशोत्सवातील पहिलाच रविवार सुटीचा मिळाल्याने अनेक गणेशभक्तांनी केवळ आकर्षक गणेशमूर्ती पाहण्याचा आनंद लुटला. त्यामुळे सायंकाळनंतर राजारामपुरी, शाहूपुरी, शिवाजी चौक येथे गणेशभक्तांनी गर्दी केली होती.

ठळक मुद्देदेखाव्यांच्या अगोदर आकर्षक गणेशमूर्ती पाहण्यास भक्तांची पसंती राजारामपुरी, शाहूपुरी, शिवाजी चौकात गर्दी

कोल्हापूर : गणेशोत्सवातील पहिलाच रविवार सुटीचा मिळाल्याने अनेक गणेशभक्तांनी केवळ आकर्षक गणेशमूर्ती पाहण्याचा आनंद लुटला. त्यामुळे सायंकाळनंतर राजारामपुरी, शाहूपुरी, शिवाजी चौक येथे गणेशभक्तांनी गर्दी केली होती.गणेशोत्सवात घरगुती गणेशमूर्ती व गौरी विसर्जनानंतर सार्वजनिक मंडळांचे देखावे सर्वांसाठी खुले केले जातात. यंदा देखावे मंगळवारपासून सुरू होण्याची शक्यता आहे. त्यात गणेशोत्सव काळातील पहिलाच रविवार सुटीचा मिळाल्याने अनेक कुटुंबांनी केवळ आकर्षक गणेशमूर्ती पाहण्यास पसंती दिली. 

कोल्हापुरातील छत्रपती शिवाजी चौकातील महागणपतीच्या दर्शनाला रविवारी सायंकाळी गणेशभक्तांनी मोठी गर्दी केली होती. (छाया : दीपक जाधव)त्यामुळे सायंकाळनंतर राजारामपुरीतील दुसरी गल्ली येथील शिवाजी तरुण मंडळाचे काल्पनिक आकर्षक मंदिर, तर शाहूपुरी येथील राधाकृष्ण तरुण मंडळाने साकारलेली जॉर्डन येथील पेट्रा जॉर्डन ही गुहा पाहण्यासाठी काही प्रमाणात गर्दी केली होती.यासह शिवाजी चौकातील महागणपती व छत्रपती शिवाजी चौक संयुक्त मित्रमंडळाची २१ फुटी गणेशमूर्ती पाहण्यासाठी सायंकाळनंतर मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. यासह शहरातील मंगळवार पेठेतील जय पद्मावती तरुण मंडळाची ‘वज्रवैभव’ तिबेटीयन मूर्ती, टेंबे रोडवरील जादू ग्रुप, मॉडर्न स्पोर्टसची आकर्षक गणेशमूर्ती पाहण्यास पहिली पसंती दिली.

मंगळवारनंतर शहरातील शिवाजी पेठ परिसरातील दयावान गु्रपची कमान, बुवा चौकातील मित्रप्रेम तरुण मंडळ, रंकाळा टॉवर मित्रमंडळ (सजीव देखावे), मंगळवार पेठेतील अनेक मंडळांचेही सजीव देखावे, तर शिवाजी उद्यमनगर परिसरातील मदनलाल धिंग्रा तरुण मंडळचा ‘सिंच्यान’, जय शिवराय तरुण मंडळाचे ३० फुटी अवकाशयान व स्पेस सेंटर असे तांत्रिक देखावेही उद्या, मंगळवार अथवा बुधवारी पाहण्यास खुले होतील.

 

 

टॅग्स :Ganesh Chaturthi 2018गणेश चतुर्थी २०१८kolhapurकोल्हापूर