शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : हयातीच्या दाखल्यांसाठी आठवड्याची मुदत, पंचवीस हजार निवृत्ती वेतनधारकांचे दाखले सादर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2018 17:42 IST

शासकीय व निमशासकीय निवृत्तीवेतनधारकांना हयातीचे दाखले सादर करण्याची मुदत सात डिसेंबरपर्यंतच देण्यात आली आहे. या कालावधीत उर्वरित निवृत्तीवेतनधारकांनी दाखले सादर करावेत, अन्यथा त्यांना पुढील पेन्शन मिळणार नाही, असे कोषागार कार्यालयाने कळविले आहे. आतापर्यंत एकूण ३२ हजार जणांपैकी अंदाजे २५ हजार जणांचे दाखले या कार्यालयाकडे प्राप्त झाले आहेत.

ठळक मुद्देहयातीच्या दाखल्यांसाठी आठवड्याची मुदतपंचवीस हजार निवृत्ती वेतनधारकांचे दाखले सादर कोषागार कार्यालयातील चित्र

कोल्हापूर : शासकीय व निमशासकीय निवृत्तीवेतनधारकांना हयातीचे दाखले सादर करण्याची मुदत सात डिसेंबरपर्यंतच देण्यात आली आहे. या कालावधीत उर्वरित निवृत्तीवेतनधारकांनी दाखले सादर करावेत, अन्यथा त्यांना पुढील पेन्शन मिळणार नाही, असे कोषागार कार्यालयाने कळविले आहे. आतापर्यंत एकूण ३२ हजार जणांपैकी अंदाजे २५ हजार जणांचे दाखले या कार्यालयाकडे प्राप्त झाले आहेत.विविध शासकीय व निमशासकीय विभागातून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांचे निवृत्तीवेतन हे कोषागार कार्यालयातून संबंधितांच्या बॅँक खात्यावर जमा होते. ते जमा करण्यापूर्वी संबंधित वेतनधारकाच्या हयातीचे दाखले घेतले जातात. ते सादर करण्यासाठी कोषागार कार्यालयाने १ नोव्हेंबर ते ७ डिसेंबर हा कालावधी देण्यात आला आहे. आतापर्यंत ३२ हजार निवृत्तीवेतन धारकांपैकी सुमारे २५ हजार जणांचे दाखले या कार्यालयाकडे प्राप्त झाले आहेत.कोषागार कार्यालयाकडून ज्या निवृत्तीवेतनधारकांचे निवृत्तीवेतन बँकेत जमा केले जाते. त्या बँक शाखेमध्ये दि. १ नोव्हेंबर ते दि. ७ डिसेंबर २०१८ या कालावधीत निवृत्तीवेतनधारकांचे हयातीचे दाखले उपलब्ध आहेत. त्या नावाच्या यादीतील नावांसमोर त्यांनी स्वाक्षरी करणे आवश्यक आहे. जे निवृत्तीवेतनधारक स्वाक्षरी करणार नाहीत त्यांना पुढील महिन्यापासून निवृत्तीवेतन मिळणार नाही. याची सर्व राज्य शासकीय निवृत्तीवेतनधारकांनी नोंद घ्यावी, असे कोषागार कार्यालयाने कळविले आहे.

 

निवृत्तीवेतनधारकांना हयातीचे दाखले सादर करण्याची मुदत ७ डिसेंबर आहे. तरी उर्वरित निवृत्तीवेतनधारकांनी लवकरात लवकर दाखले सादर करावेत, अन्यथा त्यांचे निवृत्तीवेतन बंद होणार आहे.- महेशकुमार कारंडे, जिल्हा कोषागार अधिकारी

‘पीएफ’च्या एक लाख जणांचे दाखले जमाभविष्य निर्वाह निधी (पीएफ) च्या कोल्हापूर विभागीय कार्यालयाकडे एकूण दीड लाख निवृत्तीवेतनधारकांपैकी एक लाख जणांनी हयातीचे दाखले सादर केले आहेत. कोल्हापूरसह सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग येथील निवृत्तीवेतनधारकांचा समावेश आहे. या कार्यालयाकडे खासगी आस्थापनांचे निवृत्तीवेतनधारक आहेत. हयातीचे दाखले करण्याची अखेरची मुदत ३१ डिसेंबरपर्यंत असून, लवकरात लवकर उर्वरित निवृत्तीवेतनधारकांनी दाखले सादर करावेत, असे आवाहन या कार्यालयाकडून करण्यात आले आहे. 

 

टॅग्स :bankबँकkolhapurकोल्हापूर