शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी निदर्शक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
2
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
3
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
4
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
5
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
6
'एआय'मुळे खासगी आयुष्य धोक्यात! चेहऱ्यांचे बनावट फोटो, खोटे आवाज, सही याचा गैरवापर
7
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
8
सर्व्हर डाऊनमुळे शेकडोंची 'स्टाफ सिलेक्शन' परीक्षा हुकली; केंद्रावर झाला गोंधळ : पोलिसांना केले पाचारण
9
तुम्हीही शौचालयात मोबाइल घेऊन जाता का?
10
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
11
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
12
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
13
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
14
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
15
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
16
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
17
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!
18
नेपाळ हिंसाचारासंदर्भात CM योगी आदित्यनाथ यांचं मोठं विधान; म्हणाले - "छोट्या-छोट्या गोष्टींकडे..."
19
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
20
चार दिवसांत थंड व्हाल, हिंम्मत असेल तर कारागृहात पाठवून दाखवा; प्रशांत किशोर यांचं संजय जायसवाल यांना आव्हान

कोल्हापूरचे आंतरराष्ट्रीय खेळाडू घराघरातच; तेजस्विनी, राही, वीरधवल आदींनी कोरोनापासून घेतली दक्षता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2020 00:43 IST

- सचिन भोसले  कोल्हापूर : कोल्हापूरच्या सुवर्णकन्या आंतरराष्ट्रीय नेमबाज तेजस्विनी सावंत-दरेकर, राही सरनोबत, अनुष्का पाटील, नेमबाज शाहू माने, अनुष्का ...

- सचिन भोसले कोल्हापूर : कोल्हापूरच्या सुवर्णकन्या आंतरराष्ट्रीय नेमबाज तेजस्विनी सावंत-दरेकर, राही सरनोबत, अनुष्का पाटील, नेमबाज शाहू माने, अनुष्का पाटील, युवा फुटबॉलपटू अनिकेत जाधव हे कोल्हापुरातील, तर गोल्डन बॉय वीरधवल खाडे यांनी मुंबई येथील घरातच राहून कोरोना विषाणू संसर्गापासून खबरदारी घेणे पसंत केले आहे. त्यामुळे ही स्टार मंडळी घरी बसून करतात तरी काय, असा सवाल सर्वांना पडला आहे.

नेमबाज तेजस्विनी सावंत ही दिल्ली येथे होणारी विश्वचषक नेमबाजी स्पर्धा रद्द झाल्यानंतर कोल्हापुरातील राजेंद्रनगर येथील घरी चार दिवसांसाठी विश्रांतीकरिता १९ मार्चला आली होती. त्यानंतर संचारबंदी जाहीर झाली. ती आता सकाळी गच्चीवर चालणे, त्यानंतर योगासने, ड्राय पॅ्रक्टिस, दुपारनंतर वाचन आणि पुन्हा सायंकाळी अशाच पद्धतीने स्वत:ला फिट ठेवत आहे.

नेमबाज राही सरनोबत हीही दिल्लीतील स्पर्धा रद्द झाल्यानंतर कोल्हापुरातील राजारामपुरी येथील घरीच वास्तव्याला आहे. तिनेही उद्यमनगरातील एका कारखान्यातून घरातच २५ मीटरचे टार्गेट बनवून घेतले आहे. त्यावर तिचा सराव सुरू आहे. याशिवाय ती वाचन, मनन, चिंतन, प्राणायाम, ड्राय प्रॅक्टिस करते.

वीरधवल खाडे हाही मुंबईतील खार येथील त्याच्या फ्लॅटमध्येच आहे. तो आॅलिम्पिकची तयारी म्हणून २० मार्चला अमेरिकेत अ‍ॅडव्हान्स प्रशिक्षणासाठी रवाना होणार होता. तत्पूर्वी कोरोना संसर्गामुळे त्याचे जाणे रद्द झाले. त्याची तहसीलदार म्हणून मुंबई विमानतळावर ड्यूटी आहे. मात्र, त्याला यातून सूट देण्यात आली आहे.

युवा नेमबाज शाहू माने हाही १६ मार्चला नवी दिल्ली येथे निवड चाचणी व विश्वचषक नेमबाजी स्पर्धेसाठी गेला होता. मात्र, स्पर्धा रद्द झाल्यामुळे तोही १८ मार्चला कोल्हापुरात पोहोचला. तो सरदार तालीम (शिवाजी पेठ) येथील घरी थांबून आहे. तोही दिवसभरात वाचन, ड्राय प्रॅक्टिस, फिजिकल जिम अशा पद्धतीने दिवस व्यतीत करीत आहे.

नेमबाज अनुष्का पाटील ध्यानचंद हॉकी स्टेडियम परिसरातील घरातच ध्यान, ड्राय प्रॅक्टिस, वाचन करीत आहे; तर कांबळवाडी (ता. राधानगरी) चा युवा नेमबाज स्वप्निल कुसाळेही दिल्लीला स्पर्धेसाठी गेला होता. मात्र, ती रद्द झाल्यामुळे तो १९ मार्चला कोल्हापुरात आला. त्याने स्वत:हून कसबा तारळे येथे वैद्यकीय तपासणी केली. अधिकची दक्षता म्हणून तो स्वत:च्या घरी ‘होम क्वारंटाईन’ आहे.

फुटबॉलपटू अनिकेत जाधवही कोल्हापुरातील शाहूपुरी पाचवी गल्ली येथील घरी आहे. तो मागील महिन्यात इंडियन सुपर लीग स्पर्धा झाल्यानंतर विश्रांतीसाठी कोल्हापुरात दाखल झाला होता. तोही व्यायामाबरोबर जगभरातील नामांकित फुटबॉलपटूंच्या खेळण्याच्या कौशल्याचा अभ्यास व्हिडिओद्वारे करीत आहे. तो जून महिन्यात पुन्हा जमशेदपूरला स्पर्धेसाठी रवाना होणार आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरcorona virusकोरोना वायरस बातम्या