शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशात हिंदू नेत्याची अपहरण करून निर्घृण हत्या, भारताने केला तीव्र निषेध
2
सावध व्हा,  आलाय नवीन स्कॅम! तुम्ही तीर्थयात्रेचे पॅकेज ऑनलाइन बुक केले आहे का?
3
लग्न झालं, वधूच्या डोक्यावरचा पदर उचलला, पाहतो तर काय, आत होती नवरीची विधवा आई, तरुणाची फसवणूक 
4
राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येणार? आम्हाला काहीच फरक पडणार नाही : शिंदेसेना
5
आजचे राशीभविष्य - २० एप्रिल २०२५, सर्व दृष्टींनी लाभदायी दिवस, सामाजिक क्षेत्रात सक्रीय राहाल
6
मालेगाव बॉम्बस्फोट खटला; निकाल लागणार ८ मे रोजी, अनेक अडथळे पार करत १७ वर्षांनंतर सुनावणी पूर्ण
7
जमीन मोजणी हरकतीवर आता केवळ दोनच अपील, मोजणी नकाशे अपलोड झाल्यानंतरच अंतिम निकाल
8
जेलमधून बाहेर येताच त्याने युवतीला पुन्हा पळवून नेले, तलवारी-रॉडने घरावर केला हल्ला
9
राजची साद अन् उद्धवचा प्रतिसाद; मराठीच्या धुरळ्यात ठाकरे बंधूंच्या मनोमिलनाची चर्चा
10
डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरण: हॉस्पिटलच्या व्यवहारातून बेदखल केल्याने होता तणाव
11
मित्राला वाचविताना दोन सख्ख्या भावांनी गमावला जीव; वेळास समुद्रकिनाऱ्यावर तिघांचा बुडून दुर्दैवी मृत्यू
12
अवघ्या १७ दिवसांत ८३१ टन हापूस निर्यात; अमेरिकेला सर्वाधिक आंबा रवाना, युरोपाचीही पसंती
13
अवयवदात्याची स्वॅप रजिस्ट्री तयार करा, केंद्राच्या ‘नोटो’कडून सर्व राज्यांना सूचना
14
पावणेपाच लाखांचा घोटाळा; मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीत बनावट कागदपत्रे, रुग्णनोंदी आढळल्या
15
अँटालिया स्फोटके प्रकरण: पोलिस अधिकारी काझीच्या दोषमुक्ततेस कोर्टाचा नकार, गुन्हेगारी कटाचा आरोप
16
कॅनडात बस स्टॉपवर भारतीय तरुणीची गोळीबारात हत्या; हल्लेखोरांना दुसऱ्यावर चालवायची होती गोळी
17
"ऑफर देणारे, अटी ठेवणारेही तेच, त्यामुळे मी..."; राज-उद्धव एकत्र येण्यावर CM फडणवीसांनी व्यक्त केला आनंद
18
"जाऊ दे यार, कामाचं बोला"; राज-उद्धव एकत्र येण्याच्या प्रश्नावर एकनाथ शिंदे चिडले
19
मला स्टार्क वैगेरे व्हायचं नाही; ऑस्ट्रेलियन स्टारशी तुलना केल्यावर आवेश खाननं असा दिला रिप्लाय
20
शेकापच्या संतोष पाटलांच्या दोन्ही मुलांचा वेळास बीचवर एकाच वेळी मृत्यू; बहिणीचा मुलगाही सुमद्रात बुडाला

कोल्हापूर : नारळाचे भाव वाढले, केरळातील अतिवृष्टीचा काही अंशी परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2018 16:33 IST

रोज जेवणात नारळाचा वापर करणाऱ्या मंडळींना नारळ-खोबऱ्यांचा वापर जरा हात आखडूनच करावा लागणार आहे. श्रावण, गणेशोत्सव, सणासुदी आणि केरळातील अतिवृष्टीमुळे नारळाच्या किमतीत १० ते २० टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे किमान २०, तर कमाल ४० रुपयांपर्यंत नारळाच्या आकाराप्रमाणे दरात वाढ झाली आहे.

ठळक मुद्दे नारळाचे भाव वाढले, केरळातील अतिवृष्टीचा काही अंशी परिणाम तमिळनाडू, कर्नाटकातून नियमित पुरवठा

कोल्हापूर : रोज जेवणात नारळाचा वापर करणाऱ्या मंडळींना नारळ-खोबऱ्यांचा वापर जरा हात आखडूनच करावा लागणार आहे. श्रावण, गणेशोत्सव, सणासुदी आणि केरळातील अतिवृष्टीमुळे नारळाच्या किमतीत १० ते २० टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे किमान २०, तर कमाल ४० रुपयांपर्यंत नारळाच्या आकाराप्रमाणे दरात वाढ झाली आहे.देवपूजा, मानपानासह रोजच्या जेवणात व नाष्ट्यात खोबऱ्यांचा चव म्हणून वापर केला जातो. विशेषत: चटण्यांमध्ये खोबरे चवीसाठी हमखास वापरले जातेच. कोल्हापूर जिल्ह्यात रोज तमिळनाडू, केरळ व कर्नाटकातून सुमारे सहा ते सात ट्रक नारळांची आवक होते. त्यात श्रावण व पुढील महिन्यात येणारा गणेशोत्सव आणि केरळातील भीषण अतिवृष्टीमुळे नारळाची आवक काही प्रमाणात कमी झाली आहे. त्यात मागणी वाढली की दरही वाढतात. त्यानुसार नारळाचे भाव १० ते २० टक्क्यांनी वाढले आहेत.

दिवसाकाठी एका ट्रकमधून सुमारे २५ हजारांहून अधिक नारळ, अशी सुमारे सहा ट्रकमधून दीड लाख नारळांची आवक आहे. पोत्यातील ‘भरती ’नुसार नारळाचे दरही काढले जातात. नारळ आकाराने मोठा असेल तर एका पोत्यात ५० नारळ भरले जातात; तर आकाराने लहान असेल तर एका पोत्यात १०० नारळ भरले जातात.

सद्य:स्थितीत श्रावण, गणेशोत्सव, आदी सणांमुळे नारळाची मागणी वाढली आहे. त्यामुळे दरही २० ते ४० रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. नियमित नवा पाणी, जुना पाणी, बोळ, कंगणार, आदी जातींचे नारळ विक्रीसाठी या राज्यातून येतात. विशेषत: हॉटेल, रेस्टॉरंटमध्ये बोळ नारळाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. त्यामुळे या नारळाचे दर कायम चढेच असतात.

किरकोळ बाजारात यांची विक्रीची किंमतही अगदी ४० ते ५० रुपये प्रतिनग इतकी आकारली जाते. सणासुदीमुळे नारळाच्या मागणीत गेल्या दोन महिन्यांच्या तुलनेत वाढ झाली आहे.

नारळाचे दर असे (घाऊक बाजार)

  1. मोठा जुना पाणी नारळ - शेकडा दर १३५० रुपये (पूर्वी १२५० )
  2. लहान जुना पाणी नारळ - शेकडा दर १३०० (पूर्वी १४००)
  3. कंगणार - शेकडा दर - १५००
  4. बोळ (हॉटेल किंग) आकारानुसार -शेकडा दर - २८०० ते ३०००

कोल्हापूरचा विचार करता रोज सहा ट्रकची आवक आहे. कर्नाटक, तमिळनाडूमधून नियमित आवक आहे. मात्र, केरळातील नारळ मुंबई, पुण्याकडे जातो. त्याच्यावर परिणाम झाला आहे. मात्र, कोल्हापूरच्या नारळाच्या बाजारपेठेत केरळातील अतिवृष्टीचा काहीअंशी परिणाम झाला आहे. त्यात श्रावण, येणारा गणेशोत्सव आणि जागेवरील खरेदी किंमत वाढल्याने दरही १० ते २० टक्क्यांनी वाढले आहेत.- अविनाश नासिपुडे,नारळाचे व्यापारी

 

टॅग्स :Kerala Floodsकेरळ पूरkolhapurकोल्हापूर