शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : ‘महारेरा’ च्या साहाय्याने कामकाजातील पारदर्शकता वाढवा : वसंत प्रभू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2018 12:41 IST

ग्राहकांचा विश्वास जिंकण्यासाठी कामकाजातील पारदर्शकता महत्त्वाची आहे; त्यामुळे महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरणाच्या (महारेरा) साहाय्याने विक सक, बांधकाम व्यावसायिकांनी कामकाजातील पारदर्शकता वाढवावी, असे आवाहन ‘महारेरा’चे सचिव डॉ. वसंत प्रभू यांनी येथे केले.

ठळक मुद्दे ‘महारेरा’ च्या साहाय्याने कामकाजातील पारदर्शकता वाढवा : वसंत प्रभूक्रिडाई कोल्हापूरची कार्यशाळा

कोल्हापूर : ग्राहकांचा विश्वास जिंकण्यासाठी कामकाजातील पारदर्शकता महत्त्वाची आहे; त्यामुळे महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरणाच्या (महारेरा) साहाय्याने विक सक, बांधकाम व्यावसायिकांनी कामकाजातील पारदर्शकता वाढवावी, असे आवाहन ‘महारेरा’चे सचिव डॉ. वसंत प्रभू यांनी येथे केले.क्रिडाई कोल्हापूर, महारेरा आणि शिवाजी विद्यापीठातील तंत्रज्ञान अधिविभागातर्फे आयोजित ‘महारेरा’ कायदाविषयक कार्यशाळेत ते बोलत होते. विद्यापीठातील वि. स. खांडेकर भाषाभवनातील या कार्यक्रमास ‘क्रिडाई महाराष्ट्र’चे उपाध्यक्ष राजीव परीख, ‘महारेरा’ चे तांत्रिक अधिकारी डी. आर. हाडदरे, विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉ. पी. डी. राऊत, तंत्रज्ञान अधिविभागाचे संचालक डॉ. जयदीप बागी प्रमुख उपस्थित होते.

सचिव डॉ. प्रभू म्हणाले, विक सकांनी ‘महारेरा’ अंतर्गत नोंदणी केल्यानंतर प्रत्येक तीन महिन्यांनी त्यांच्या प्रकल्पाचे पूर्ण झालेले काम, सुधारणा आणि ग्राहकांच्या नोंदी संकेतस्थळावर भरणे आवश्यक आहे, त्यातून संबंधित प्रकल्पाची ग्राहकांना सर्व माहिती आॅनलाईन आणि घरबसल्या मिळते. आवश्यक ती माहिती मिळाल्याने ग्राहकांचे गैरसमज दूर होतात. विकसकांनी माहिती अद्यावत करणे आवश्यक आहे. त्यांनी ‘महारेरा’ची अंमलबजावणी योग्य पद्धतीने करावी.या कार्यशाळेत ‘महारेरा’चे तांत्रिक सल्लागार गणेश जाव्हरे, प्रिन्सिपल कन्सल्टंट केतन अस्तिक, सीनिअर कन्सल्टंट हेतल हादियेल, आयटी सपोर्ट कन्सल्टंट विनित वायकूळ यांनी विविध मुद्द्यांवर मार्गदर्शन केले.

यावेळी शीतल नातू, आदित्य बेडेकर, निखिल अगरवाल, प्रतीक ओसवाल, लहू पटेल, विकेश ओसवाल, निर्मल पगारिया, अजय कोराणे, संदीप मिरजकर, आदींसह कोल्हापूर, सांगली, सातारा आणि कोकणातील बांधकाम व्यावसायिक, विक सक उपस्थित होते.

‘क्रिडाई कोल्हापूर’चे अध्यक्ष महेश यादव यांनी प्रास्ताविक केले, त्यात त्यांनी ज्याप्रमाणे विकसक, बांधकाम व्यावसायिकांना ‘महारेरा’ लागू केला. त्याप्रमाणे बांधकाम व्यावसायिकांना लागणाऱ्या विविध प्रकारच्या एनओसी देणाºया घटकांना या कायद्याच्या कक्षेत आणणे आवश्यक असल्याचे सांगितले. रवी माने यांनी सूत्रसंचालन केले. ‘क्रिडाई कोल्हापूर’चे उपाध्यक्ष विद्यानंद बेडेकर यांनी आभार मानले.

वसंत प्रभू म्हणाले,

  1. *‘महारेरा’ कडे दडपण म्हणून पाहू नका.
  2. * नोंदणी करण्यासाठी कोणत्याही कार्यालयात जाण्याची आवश्यकता नाही.
  3. * सर्व सुविधा आॅनलाईन पद्धतीने उपलब्ध आहेत.
  4. *विक सकांनी ‘रेरा’ नोंदणीचे बोधचिन्ह वापरावे.
  5. *पुढील काळ आॅनलाईनचा असल्याने त्यादृष्टीने कार्यरत रहावे.

 

कोल्हापुरात बेंचची स्थापनाग्राहक आणि विक सक यांच्यातील तक्रारी, गैरसमज हे समोरासमोर चर्चा करून सोडविण्यासाठी मुंबई, पुणे, नागपूर येथे तक्रार निवारण बेंचची स्थापना केली आहे, त्यामध्ये ग्राहक आणि विक सकाच्या सहमतीने तक्रारींचे निवारण केले जाते. त्याचा चांगला परिणाम झाला असल्याचे सचिव डॉ. प्रभू यांनी सांगितले. ते म्हणाले, या स्वरूपातील बेंचची स्थापना कोल्हापूरमध्ये ग्राहक चळवळ आणि क्रिडाई कोल्हापूरच्या माध्यमातून व्हावी. 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूर