शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : शाही थाटात ‘घोेडेस्वारी’ स्पर्धेची सुरुवात, संस्थानकालीन आठवणींना चित्रप्रदर्शनातून उजाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2018 20:43 IST

डोळ्यांचे पारणे फेडणाऱ्या चित्तथरारक कसरती, दिमाखदार, धिप्पाड जातिवंत घोडे, त्यांच्यावर कौशल्याने ताबा मिळविणारे घोडेस्वार असा संस्थानकालीन थाट पाहण्याचा योग ‘द रॉयल कोल्हापूर हॉर्स शो’च्या रूपाने कोल्हापूरकरांना शनिवारी आला.

ठळक मुद्देशाही थाटात ‘घोेडेस्वारी’ स्पर्धेची सुरुवातसंस्थानकालीन आठवणींना चित्रप्रदर्शनातून उजाळा

कोल्हापूर : डोळ्यांचे पारणे फेडणाऱ्या चित्तथरारक कसरती, दिमाखदार, धिप्पाड जातिवंत घोडे, त्यांच्यावर कौशल्याने ताबा मिळविणारे घोडेस्वार असा संस्थानकालीन थाट पाहण्याचा योग ‘द रॉयल कोल्हापूर हॉर्स शो’च्या रूपाने कोल्हापूरकरांना शनिवारी आला.कोल्हापूर इक्वेटेरियन असोसिएशनतर्फे न्यू पॅलेसनजीकच्या पोलो मैदानावर या शोचे आयोजन करण्यात आले होते. घोडेस्वारीच्या या कसरतींसह जोडीला संस्थानकालीन राजर्षी शाहू महाराज, राजाराम महाराज, छत्रपती शालिनीराजे, आदींच्या उपस्थितीत पोलो मैदान, रंकाळा, पद्माळा, आदी ठिकाणची घोडेस्वारी, शर्यतींच्या छायाचित्र प्रदर्शनाने या क्षेत्रातील कोल्हापूरचा इतिहासच करवीरकरांसमोर उलगडून दाखविण्यात आला.संस्थानकाळापासून कोल्हापूरमध्ये घोडेस्वारीची परंपरा जपली आहे. त्यावेळी या खेळाला राजाश्रय होता. याच जुन्या खेळाला सध्या स्पर्धात्मक रंग आला आहे. कोल्हापूरची हीच परंपरा जपण्यासाठी या ‘शो’चे आयोजन करण्यात आले होते. अशा प्रकारची स्पर्धा पश्चिम महाराष्ट्रात प्रथमच होत आहे. त्यामुळे सकाळपासूनच शालेय विद्यार्थी आणि घोडेस्वारीमध्ये रस असणाऱ्या शौकिनांनी पोलो मैदानावर गर्दी केली होती.

शोमध्ये अनेक शाळांच्या हॉर्सरायडरबरोबरच प्रोफेशनल हॉर्स रायडरसुद्धा सहभागी झाले आहेत. त्यामुळे खेळाची रंगत आणखी वाढली आहे. उद्घाटनानंतर पोल बेंडिंग, ट्रोविंग रेस, बॉल बकेट, जम्प्ािंग अरेना, जिमखाना अरेना, टेंट पेगिंग यासह माउंटेड स्पोर्टसचे विविध प्रकार पार पडले. या हार्स शोसाठी कोल्हापूरसह मुंबई, पुणे, अकलूज, सातारा, आदी ठिकाणांहून ४०० हून अधिक स्पर्धक सहभागी झाले आहेत. ही स्पर्धा दोन दिवस असणार आहे.शनिवारी सकाळी उद्घाटनप्रसंगी एअर मार्शल अजित भोसले, शाहू छत्रपती, खासदार संभाजीराजे, माजी आमदार मालोजीराजे, संयोगीताराजे, मधुरिमाराजे, प्रवीणसिंह घाटगे, व्ही. बी. पाटील, पोलीस अधीक्षक संजय मोहिते, ऋतुराज इंगळे, वीरेंद्रसिंह घाटगे, तुषार घाटगे, आदी मान्यवर उपस्थित होते.

स्पर्धेचा निकाल असाशो जंपिग खुला गट-(अनुक्रमे पहिले पाच क्रमांक) : कईस दलाल (जॅपलूप), स्वप्निल साने (७ ए. के. स्पोर्टस हॉर्स अकॅडमी), विनायक करनावर (ग्रीन फिंगर स्कूल, अकलूज), के. व्ही. सिंग (जॅपलूप), अमर खराडे (एआयएसएसएमएस, पुणे).पोल बेंडिंग चिल्ड्रेन गट- चेतन मेंडिगेरी, प्रेम रुणवाल (दोघेही संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल), वंश जोगनी (जॅपलूप).

शो जंपिग ज्युनिअर गटकशिश बजाज, निहारिका माणियार, करिश्मा जोशी. (सर्व जॅपलूप), रोहित थोरात (ग्रीन फिंगर, आकलूज).पोल बेंडिंग - ज्युनिअर गट -अमर खराडे (एआयएसएसएमएस,पुणे ), कशिश बजाज (जॅपलूप), राजाराम चौधरी - (संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल).शो जंपिंग - चिल्ड्रन गटअनिरुद्ध मोहिरे (ए. के. स्पोर्ट हॉर्स), रोहन करमरकर, आयान शेख, मैथिली देशमुख (जॅपलूप), अनिरुद्ध मोहिरे (ए. के. स्पोर्ट हॉर्स). 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूर