शहरं
Join us  
Trending Stories
1
जॉन सीनाने शेवटचा सामना 'मुद्दाम' गमावला? गुंथरकडून पराभव, रिंगला किस करून घेतला WWE चा निरोप...
2
सुदानमध्ये संयुक्त राष्ट्राच्या तळावर क्रूर ड्रोन हल्ला; ६ बांगलादेशी पीसकीपर्स ठार, ८ गंभीर जखमी; युनो महासचिवकडून तीव्र निषेध
3
जॅकपॉट अन् खजिना...! महाराष्ट्राच्या शेजारील राज्यात सापडले सोने, लिथिअम आयनचे साठे; खोऱ्याने पैसा ओढणार...
4
चोरी केल्यानंतर ते शिर्डी गाठायचे, साईबाबांच्या चरणी 'दान' ठेवायचे! काळाचौकी पोलिसांची २४ तासांत कारवाई; दोन तरुण चोर जेरबंद
5
वर्सोवा-भाईंदर कोस्टल प्रकल्पासाठी ४५ हजार खारफुटी तोडणार; हायकोर्टाचा हिरवा झेंडा
6
अमेरिकेतील ब्राउन युनिव्हर्सिटीत अंतिम परीक्षांदरम्यान गोळीबार; २ मृत, ८ गंभीर जखमी, हल्लेखोर पसार
7
पतीकडूनच सर्पदंश करवून पत्नीची हत्या, ब्रेन हॅमरेजने मृत्यू झाल्याचा बनाव; तिघांना अटक
8
मुंबईच्या फनेल झोनमधील इमारतींच्या पुनर्विकासासाठी 'हाउसिंग फॉर ऑल' योजना
9
मुंबईत महायुतीचाच महापौर होणार, मुख्यमंत्र्यांचा दावा! जागावाटपावर फडणवीस यांचे स्पष्टीकरण
10
पीएचडी शिष्यवृत्तीला आता शिस्तीची चौकट; अर्थ खात्याकडून पैसे न मिळाल्याने शिष्यवृत्तीची रक्कम रखडली!
11
सर्व्हेसाठी गेलेल्या अधिकाऱ्यांवर जमावाकडून दगड आणि धनुष्यबाणांद्वारे हल्ला, ४७ जण जखमी   
12
आजचे राशीभविष्य - १४ डिसेंबर २०२५, कार्य साफल्याचा दिवस, नवे काम सुरू कराल
13
राज्यातील सर्व २९ महापालिकांची निवडणूक होणार एकाच टप्प्यात! ५० टक्के आरक्षण मर्यादेचा अडसर नाही
14
आश्रम हल्ला प्रकरणातील एकमेव आरोपीची तब्बल ३४ वर्षांनंतर सुटका; काय होते नेमके प्रकरण?
15
ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
16
कोलकात्यात मेस्सी आला अन्... संतप्त चाहत्यांनी खुर्च्यांचाच फुटबॉल केला!
17
डोंबिवलीत पाच वर्षांनंतर पुन्हा गुलाबी रस्ता; प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर
18
चार्टर्ड प्लेनमधील 'त्या' प्रवासामुळे भाजपच्या नेत्यांना वरिष्ठांचे फटके!
19
दिसते तसे नसते... म्हणूनच जग फसते! भाजप-शिंदेसेनेच्या भांडणामागचे आणि युतीमागचे 'राजकारण'
20
निधीटंचाई; शेततळ्यांना सरकारनेच दिली कबुली; कृषिमंत्र्यांनी दिली माहिती : रक्कम देताना हात आखडता
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : बाल राज्य नाटय स्पर्धेचे उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2019 17:11 IST

लहान मुलांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी अशा बाल नाटय स्पर्धांची खऱ्या अर्थाने गरज आहे. या स्पर्धेत बाल मित्रांनी मोठया संख्येने सहभागी होऊन कलेचा आनंद घ्यावा, असे आवाहन महापौर सरिता मोरे यांनी शुक्रवारी येथे केले . केशवराव भोसले नाट्यगृहात शासनाच्या सांस्कृतिक संचालनालयातर्फे १६ व्या बाल राज्य नाट्य स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या.

ठळक मुद्देनाट्यस्पर्धांमधून मुलांच्या कलागुणांना वाव : सरिता मोरे कोल्हापूर बाल राज्य नाटय स्पर्धचे उद्घाटन

कोल्हापूर : लहान मुलांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी अशा बाल नाटय स्पर्धांची खऱ्या अर्थाने गरज आहे. या स्पर्धेत बाल मित्रांनी मोठया संख्येने सहभागी होऊन कलेचा आनंद घ्यावा, असे आवाहन महापौर सरिता मोरे यांनी शुक्रवारी येथे केले . केशवराव भोसले नाट्यगृहात शासनाच्या सांस्कृतिक संचालनालयातर्फे १६ व्या बाल राज्य नाट्य स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या.यावेळी महापौर यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने स्पर्धेेचे उद्घाटन झाले. ११ जानेवारीपर्यंत या स्पर्धा सुरु राहणार आहेत.गेल्या २५ वषार्पासून बालरंगभूमीची सेवा करणाऱ्या सलीम शेख आणि तरन्नुम शेख या दांपत्याचा महापौर मोरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला . यावेळी अखिल भारतीय नाटय परिषद कोल्हापूर शाखेचे अध्यक्ष मनोहर कुईगडे प्रमुख उपस्थित होते.सलीम शेख म्हणाले, आतापर्यंत अनेकवेळा माझे सत्कार झाले, परंतु शासनाने आमच्या कामाची दखल घेऊन केलेल्या सन्मानामुळे समाधान वाटत आहे. प्रशांत जोशी यांनी स्वागत केले . यावेळी मिलिंद अष्टेकर, परीक्षक प्रकाश देवा (नागपूर ), दिलीप भताडे (रत्नागिरी), निता कुलकणी (बेळगाव) आदी उपस्थित होते .

बाल कलाकारांच्या अविष्काराने रसिक तृप्तआजच्या सर्धेची सुरुवात एस. पी शिसोदे लिखित 'पाऊल पडते पुढे' या नाटकाने झाली . आदर्श गुरुकुल विद्यालय हातकणंगलेच्या कलाकारांनी हे नाटक सादर केले . यानंतर व्ही . ए . पोतदार आजरा हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी ' तप्त दाही दिशा ' हे नाटक सादर केले तर आण्णाभाऊ इंग्लिश स्कूल आजरा येथील विद्यार्थ्यांनी ' एक घर एकविसाव्या शतकातील ' नाटक सादर करुन रसिकांना तृप्त केले. बाल कलाकारांच्या अविष्काराला रसिकांनी टाळ्यांच्या गजरात दाद दिली.

उद्याचे नाटकसकाळी ९ वाजतानाटक : भेटलेखक : असिफ अन्सारीदिग्दर्शक : ऋषिकेश डोंगरेसादरकर्ते : आम्ही कलाकार सांस्कृतिक प्रतिष्ठान (इचलकरंजी)

सकाळी १०.१५वाजतानाटक : केल्याने होत आहे रेलेखक : ज्योतीराम कदमदिग्दर्शक : संजीव चौगुलेसादरकर्ते : डॉ. बापट बाल शिक्षण मंदीर(सांगली)

सकाळी ११.३० वाजतानाटक : सावधान पर्यावरण संपत चालले होलेखक : ए.एन. इंगवलेदिग्दर्शक : ए.एन. इंगवलेसादरकर्ते : ग्रीन व्हॅली पब्लिक स्कूल (पेठ वडगाव)

 

 

टॅग्स :cultureसांस्कृतिकkolhapurकोल्हापूर