शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
3
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
4
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
5
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
6
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
7
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
8
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
9
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
10
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
11
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
12
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
13
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
14
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
15
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
16
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
17
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
18
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
19
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
20
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात

खेळाबरोबर पंचगिरीतही कोल्हापूरचा ठसा ; सुनील पोवारची वेगळी वाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2018 00:23 IST

कोल्हापूर : सामना कोणताही असो, त्यात संघ भलेही मोठ्या समर्थकांचा असो त्यात निष्पक्ष, कडक निर्णय घेण्यास न कचरणारा पंच, ...

ठळक मुद्देजिल्हा ते राष्ट्रीय स्पर्धांमध्ये पाच हजारांहून अधिक सामन्यांमध्ये पंचगिरी

कोल्हापूर : सामना कोणताही असो, त्यात संघ भलेही मोठ्या समर्थकांचा असो त्यात निष्पक्ष, कडक निर्णय घेण्यास न कचरणारा पंच, असा पंच म्हणून कोल्हापूरच्याफुटबॉल पंढरीत सर्वश्रृत असलेल्या सुनील पोवारने स्थानिक, जिल्हा विभाग, राज्य आणि राष्ट्रीय अशा विविध स्पर्धांत आपल्या पंचगिरीचा ठसा उमटविला आहे.

यात विशेष म्हणजे पाच हजारांहून अधिक स्पर्धांमध्ये उत्कृष्ट पंचगिरी करीत करिअरची नवी वाट शोधली आहे.अकरा वर्षांपूर्वी विविध स्थानिक संघांकडून फुटबॉल खेळताना पंचगिरीबद्दल आकर्षण वाटले; त्यामुळे वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन व कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशनच्या माध्यमातून पंच परीक्षा दिली. त्यानंतर आजतागायत १0 वर्षांत दरवर्षी क्रीडा कार्यालयातर्फे भरविल्या जाणाऱ्या शालेय फुटबॉल स्पर्धा, त्यात जिल्हा, ग्रामीण विभाग आणि राज्यस्तरीय अशा विविध स्पर्धांमध्ये पंचगिरी करीत आहे. यासह के. एस. ए. लीग, स्थानिक संयोजनातून वर्षभरातील विविध स्पर्धा, डीएसके चषक पुणे, १६, १८ वर्षांखालील आयलीग राष्ट्रीय स्पर्धा, रिलायन्स फौंडेशन, विफाच्या फुटबॉल स्पर्धा, के. एस. ए. अ, ब, क, ड, ई अशा एक ना अनेक फुटबॉल स्पर्धांतही सातत्याने पंच म्हणून सुनील उत्कृष्ट कामगिरी बजावत आहे.

बी. कॉम. झालेल्या सुनीलने ११ वर्षांपूर्वी फुटबॉल खेळातून करिअर करण्याचा प्रयत्न केला; मात्र त्याला कोठेही नोकरी मिळाली नाही. त्यामुळे वेगळी वाट म्हणून त्याने फुटबॉलमधील पंचगिरीला आपलेसे केले. त्यातून त्याने राष्ट्रीय पातळीवरील पंचाकरिता असणारी कॅट-३ ही परीक्षाही उत्तीर्ण केली. त्यामुळे मुंबई येथे रिलायन्सतर्फे भरविण्यात आलेल्या राष्ट्रीय स्पर्धेच्या अंतिम सामन्यांत पंचगिरी करण्याची संधी मिळाली. यात संघमालक सचिन तेंडुलकर, नीता अंबानी, जॉन अब्राहीम, अभिषेक बच्चन या मंडळींनी सुनीलची पाठ थोपटली. या स्पर्धेनंतर त्याने आयलीग ‘ए’ डिव्हिजनमध्येही पंच म्हणून काम केले आहे. यात मोहन बागान, मुंबई एफसी, बंगलोर एफसी, चेन्नई एफसी, सेसा गोवा, साळगावकर, धेंपो, केरळ एफसी अशो संघांच्या सामन्यातही मुख्य पंच, लाईन पंचाची भूमिका पार पाडली आहे.

यासह ‘विफा’तर्फे भरविण्यात येणाºया अनेक राज्य स्पर्धांमध्येही पंच म्हणून उत्कृष्ट कामगिरी नोंदविली. दरवर्षी के. एस. ए. वरिष्ठ गट साखळी सामने - ५६, तर के. एस. ए. ब - ३६, क गट- ३६, ड -३, इ - ७५, गडहिंग्लज साखळी सामने, करवीर, यांसह राज्य, राष्ट्रीय अशा स्पर्धांमध्ये गेल्या १0 वर्षांत पाच हजारांहून अधिक लहान-मोठ्या सामन्यांत सुनीलने पंचगिरी केली आहे. खेळातूनही अशी करिअर वाट मिळते हे सुनीलने साध्य करून दाखविले आहे. 

वाणिज्य शाखेचे पदवीधर होऊनही नोकरी काही मिळाली नाही. खेळातून वेगळी वाट म्हणून फुटबॉल पंचगिरीतील परीक्षा देत आहे. त्यात स्थानिक ते राष्ट्रीय पातळीवरील परीक्षांचा समावेश आहे. सध्या मी राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेत ‘अ ’ दर्जाच्या स्पर्धांसाठी पंच म्हणून काम करता यावे, याकरिता अखिल भारतीय फुटबॉल महासंघाची के-२ ही परीक्षा देत आहे.- सुनील पोवार, फुटबॉल पंच

टॅग्स :Footballफुटबॉलkolhapurकोल्हापूर