शहरं
Join us  
Trending Stories
1
'तुला तुरुंगामध्ये टाकेन हा, मी तुला सांगतोय'; अजित पवारांच्या संतापाचा कडेलोट, दीड कोटींच्या उधारीचं प्रकरण काय?
2
PM मोदींच्या 'X' पोस्टने पाकिस्तानचे मंत्री मोहसिन नकवी अन् ख्वाजा आसिफचा 'थयथयाट', म्हणाले...
3
Ahilyanagar: मुस्लीम धर्मगुरूंचे नाव रस्त्यावर लिहून विटंबना; अहिल्यानगरमध्ये तणाव, 'रास्ता रोको'नंतर लाठीचार्ज
4
IND vs PAK : क्रिकेटमध्ये राजकारण आणणारा तू पहिला कॅप्टन! सूर्यानं पाक पत्रकाराला असा दिला रिप्लाय (VIDEO)
5
'अगदी बरोबर केलं...!'; पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालेल्या विनय नरवाल यांचे वडील टीम इंडियावर खुश!
6
आता टीम इंडियाला मिळणार नाही आशिया चषकाची ट्रॉफी? काय आहे ICCचा नियम, जाणून घ्या
7
जन्मदातीने सोडलं, परदेशी जोडप्यानं सांभाळलं; ३८ वर्षांनी स्वित्झर्लंडची नताशा मुंबईत, खऱ्या आईला भेटली
8
भारताविरोधात लढत होता पाकिस्तानी नेव्हीचा अधिकारी, खेळलाही...; पण गुडघे टेकत पराभूत झाला...
9
ज्यांनी भावाची चौकशी केली नाही, ते गावाची काय करणार; शिवाजी सावंतांचा तानाजी सावंतांवर आरोप
10
भारताने ट्रॉफी न घेतल्याचा भविष्यात त्रास होऊ शकतो; पाकिस्तानचा बालिश बहु माजी कर्णधार बडबडला... 
11
Sleep Tourism : नव्या ट्रेंडची भुरळ! फक्त शांत झोपेसाठी लोक करताहेत लांबचा प्रवास; काय आहे स्लीप टूरिझ्म?
12
अष्टमीच्या नैवेद्याला कांदा, लसूण न घालता करा काळ्या वाटण्याची चमचमीत उसळ, पुऱ्या आणि शिरा; खास टिप्स!
13
'सैयारा'नंतर अहान पांडेला लागला मोठा जॅकपॉट, दोन दिग्गज दिग्दर्शकाच्या सिनेमात लागली वर्णी
14
Tamil Nadu Stampede : "माझ्या डोळ्यांसमोरच जमावाने आईला चिरडलं, मी मदतीसाठी..."; महिलेने सांगितलं काय घडलं?
15
टीम इंडियाची ट्रॉफी पाकिस्तानच्या मोहसिन नक्वी यांनी चोरली; सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस
16
चीनच्या माजी मंत्र्यांनी भ्रष्टाचार करून अब्जावधी रुपये कमावले, आता न्यायालयाने दिली मृत्युदंडाची शिक्षा
17
सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ; Gold पुन्हा ऑल टाइम हायवर, चांदी २००० रुपयांनी वधारली
18
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना जिल्हाधिकाऱ्यांनी सुनावले; "तुम्ही किती किट आणले..."
19
आर्यनच्या सीरिजमध्ये पोलिसाच्या भूमिकेत दिसलेला अभिनेता कोण? समीर वानखेडेंच्या वादावर म्हणाला..
20
अमानवीय! तुमच्या म्हशी आमच्या शेतात चरायला येतात; शेतकऱ्याचा १२ म्हशींवर कुऱ्हाडीने वार...

कोल्हापूर : कचऱ्यापासून वीज प्रकल्पाची उद्या ‘आयआयटी’कडून तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2019 12:49 IST

कचऱ्यापासून वीज निर्मितीचा प्रकल्प गेले १0 दिवस पूर्ण कार्यक्षमतेने सुरू आहे, यामध्ये शहरातून येणारा सर्वच कचरा थेट या वीज प्रकल्पावर नेऊन, तेथे वीज निर्मिती सुरू आहे.

ठळक मुद्देकचऱ्यापासून वीज प्रकल्पाची उद्या ‘आयआयटी’कडून तपासणीमहापालिका : रोज पुरवला जातो १५० ते १७५ टन कचरा

कोल्हापूर : कचऱ्यापासून वीज निर्मितीचा प्रकल्प गेले १0 दिवस पूर्ण कार्यक्षमतेने सुरू आहे, यामध्ये शहरातून येणारा सर्वच कचरा थेट या वीज प्रकल्पावर नेऊन, तेथे वीज निर्मिती सुरू आहे. महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी या प्रकल्पास नुकतीच भेट देऊन पाहणी केली असली, तरी तांत्रिक बाबी तपासणीसाठी उद्या, शनिवारी मुंबईच्या आयआयटीचे पथक कोल्हापुरात दाखल होत आहे. या पथकामार्फत प्रकल्पाच्या अद्ययावत मशिनरीची तपासणीही होणार आहे. या प्रकल्पासाठी रोज किमान १५० ते १७५ टन कचरा पुरविला जात आहे.कसबा बावडा येथील झूम कचरा प्रकल्पाच्या ठिकाणी सध्या साडेपाच लाख टन कचरा पडून आहे. त्याचे कॅपिंग करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे; पण शहरात रोज नव्याने तयार होणाऱ्या कचऱ्यांवर प्रक्रिया करून वीजनिर्मितीसाठी ग्रीन एनर्जी या कंपनीमार्फत ‘बांधा, वापरा, हस्तांतर करा’ हा सुमारे १५ कोटी रुपये खर्चून प्रकल्प उभारला आहे. महापालिकेने रोज किमान २०० टन घरगुती कचरा पुरविल्यास त्यातील ३० टन किचन वेस्ट, ओल्या कचऱ्यामधून किमान २०० किलोवॅट वीजनिर्मिती होणार आहे. उर्वरित कचºयातून ४० टन दगड-माती, ८० ते १०० टन आरडीएफ मिळत आहे.हा प्रकल्प गेले दोन महिने सुरू असला, तरी गेल्या महिनाभरात या प्रकल्पाचे अत्याधुनिकीकरण करण्यात आले. त्यातून दि. १ जानेवारीपासून हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरू करण्यात आला; पण प्रारंभीच्या काळात सुमारे २०० टन कचरा मिळाला; पण आता रोज १५० ते १७५ इतका कचरा मिळतो; त्यामुळे शहरातून जमा होणारा सर्वच कचरा येथे आणून त्यावर प्रक्रिया केली जात आहे.

आठवड्यात महापालिकेचे उपायुक्त मंगेश शिंदे, प्रभारी मुख्य आरोग्य निरीक्षक डॉ. विजय पाटील, आरोग्याधिकारी डॉ. दिलीप पाटील यांनी भेटी देऊन विविध सूचना केल्या आहेत. दरम्यान, या प्रकल्पाच्या तांत्रिक बाबी तपासण्यासाठी मुंबई आयआयटीचे पथक उद्या, शनिवारी कोल्हापुरात येत आहे.

किचन वेस्टमध्ये प्लास्टिकचे प्रमाणवीजनिर्मितीसाठी प्रामुख्याने किचन वेस्ट हा हॉटेल, मटन मार्केट यांच्यासह ओला कचऱ्याची आवश्यकता असते; पण हॉटेलमधून येणाऱ्या कचऱ्यामध्ये प्रामुख्याने प्लास्टिक चमचे, प्लास्टिक बाटल्या येत असल्यामुळे ते स्वतंत्र करताना अडचणी निर्माण होत आहेत; त्यामुळे हॉटेलमधून येणारा कचरा प्लास्टिक व ओला कचरा असा स्वतंत्र करण्याच्या सूचना प्रत्येक हॉटेलला महापालिकेने दिल्या आहेत. 

 

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाkolhapurकोल्हापूर