शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : ...तर भटकी जनावरे महापालिकेच्या दारात बांधणार, नगरसेविका बनछोडे यांचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2018 13:15 IST

येत्या आठ दिवसांत याची दखल घेतली नाही तर सर्व भटकी जनावरे महापालिकेच्या चौकात आणून बांधण्यात येतील, असा इशारा नगरसेविका उमा बनछोडे यांनी महानगरपालिकेच्या सभेत दिला.

ठळक मुद्दे ...तर भटकी जनावरे महापालिकेच्या दारात बांधणारनगरसेविका बनछोडे यांचा महापालिकेच्या सभेत इशारा

कोल्हापूर : शहरात भटक्या कुत्र्यांचा प्रश्न जेवढा गंभीर आहे, तितकाच तो भटक्या जनावरांचाही आहे. वारंवार सांगूनही अधिकारी त्याची दखल घेत नाहीत. जर येत्या आठ दिवसांत याची दखल घेतली नाही तर सर्व भटकी जनावरे महापालिकेच्या चौकात आणून बांधण्यात येतील, असा इशारा नगरसेविका उमा बनछोडे यांनी महानगरपालिकेच्या सभेत दिला. सभेच्या अध्यक्षस्थानी महापौर स्वाती यवलुजे होत्या.शहरात सर्वत्र भटक्या जनावरांचा नागरिकांना उपद्रव होत आहे. त्यामुळे वाहतुकीची कोंडी होते. महापालिकेभोवती अशी जनावरे आहेत. त्यांचा बंदोबस्त करा, असे सांगूनही काहीच कारवाई होत नाही, ही खेदाची बाब आहे. जर आठ दिवसांत कारवाई झाली नाही तर ही जनावरे महानगरपालिकेच्या चौकात आणून बांधू, असा उमा बनछोडे यांनी इशारा दिला.शहरातील भटक्या कुत्र्यांचा विषय तौफिक मुल्लाणी, कमलाकर भोपळे, भूपाल शेटे यांनी उचलून धरला. मुल्लाणी यांनी, गेल्या आठवड्यात भटक्या कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्यात २० जण जखमी झाल्याची बाब प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली. कुत्र्यांची गॅँगच्या गॅँग तयार होत असताना महापालिकेचे प्रशासन काय करते? अशी विचारणाही त्यांनी केली.निर्बीजीकरण केल्यानंतरही शहरात भटक्या कुत्र्यांची संख्या कशी वाढली, अशी विचारणा भूपाल शेटे यांनी केली. ५००० कुत्र्यांच्या निर्बीजीकरणावर २५ लाख रुपये खर्च केले; पण ते पाण्यात गेले, असे सांगून ज्या ठेकेदारावर हे काम सोपविले होते, त्यांनी कऱ्हाडहून खासगी, पाळीव कुत्री आणून त्यांच्यावर निर्बीजीकरणाच्या शस्त्रक्रिया केल्या आहेत, असा आरोप केला.यावर खुलासा करताना २००९-१० सालानंतर आपल्याकडे कुत्र्यांचे निर्बीजीकरण करण्यात आलेले नाही, असे मुख्य आरोग्य निरीक्षक डॉ. विजय पाटील यांनी स्पष्ट केले. यावर्षी निर्बीजीकरण करण्याकरिता २५ लाखांची तरतूद करण्यात आलेली आहे. आता कामास सुरुवात झाली आहे, असेही त्यांनी सांगितले. 

 

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाkolhapurकोल्हापूर