शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाने बदल स्वीकारल्यास युवा महोत्सवातील रंगत वाढेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2018 18:36 IST

परीक्षकांची नियुक्ती, जिल्हा आणि मध्यवर्तीचे नियोजन, खर्चासाठी निधीची उपलब्धता आणि विद्यार्थी कलाकारांना गुण देणे, आदींबाबतचे बदल शिवाजी विद्यापीठाने स्वीकारल्यास युवा महोत्सवातील रंगत आणि स्पर्धा आणखीन वाढणार आहे.

ठळक मुद्देबदल स्वीकारल्यास युवा महोत्सवातील रंगत वाढेलशिवाजी विद्यापीठाकडून निर्णयाची अपेक्षा; विद्यार्थी कलाकारांना गुण मिळावेत

संतोष मिठारीकोल्हापूर : परीक्षकांची नियुक्ती, जिल्हा आणि मध्यवर्तीचे नियोजन, खर्चासाठी निधीची उपलब्धता आणि विद्यार्थी कलाकारांना गुण देणे, आदींबाबतचे बदल शिवाजी विद्यापीठाने स्वीकारल्यास युवा महोत्सवातील रंगत आणि स्पर्धा आणखीन वाढणार आहे.महाविद्यालयीन आणि विद्यापीठ पातळीवरील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने शिवाजी विद्यापीठातर्फे जिल्हास्तरीय आणि मध्यवर्ती युवा महोत्सव घेण्यात येतो. जिल्हास्तरीय महोत्सवाचे ३८ वे, तर मध्यवर्ती युवा महोत्सवाचे यंदा ३५ वे वर्षे आहे. स्पर्धांच्या स्वरूपातील बदल स्वीकारून विद्यापीठाने महोत्सवाची व्याप्ती वाढविली; मात्र, गेल्या काही वर्षांपासून या महोत्सवाला एक साचेबद्धपणा आल्यासारखे झाले आहे.

परीक्षक, नियोजनात तोच-तोचपणा दिसत आहे. ते टाळण्यासाठी विद्यापीठाने काही बदल स्वीकारणे आवश्यक आहे. दोन ते तीन स्पर्धांच्या परीक्षणाचे काम अनेकदा एकाच परीक्षकांवर सोपविले जाते. परीक्षकांची नियुक्ती करताना ते संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञ असणे आवश्यक आहेत.

राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) आणि क्रीडा स्पर्धांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना ज्या पद्धतीने गुण दिले जातात. त्याप्रमाणे महोत्सवातील विजेत्यांना गुण देण्याची व्यवस्था विद्यापीठाने करावी. महोत्सवातील तयारीसाठी खर्चाकरिता निधीची रक्कम वाढविणे आवश्यक आहे. या महोत्सवातून नाट्य, चित्रपटसृष्टीला अनेक चांगले अभिनेते, गायक, वादक, आदी कलाकार मिळाले आहेत. ते लक्षात घेऊन विद्यापीठाने बदल स्वीकारणे महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

परिपत्रकानंतर अनेक महाविद्यालयांना जागविद्यापीठाने युवा महोत्सवाबाबतचे परिपत्रक पाठविल्यानंतर काही महाविद्यालयांतील सांस्कृतिक विभागाला जाग येते. ते टाळण्यासाठी वर्षभर विविध उपक्रम राबविणे, या विभागांसाठी विद्यापीठाने बंधनकारक करणे आवश्यक आहे.

आॅगस्टमध्येच महोत्सव व्हावेतराज्यातील मुंबई, पुणे, औरंगाबाद आदी विद्यापीठांचे मध्यवर्ती युवा महोत्सव आॅगस्ट ते सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात पूर्ण होतात; त्यामुळे त्यांना ‘इंद्रधनुष्य’ या राज्यस्तरीय महोत्सवासाठी तयारी करायला जादा दिवस मिळतात. त्याच पद्धतीने शिवाजी विद्यापीठाने आॅगस्टमध्येच जिल्हास्तरीय आणि मध्यवर्ती महोत्सव घेण्याचे नियोजन अधिक चांगले ठरणार आहे.

तज्ज्ञ परीक्षक असावेतमहोत्सवातील विविध स्पर्धांसाठी परीक्षकांची नियुक्ती करताना ते संबंधित कलाप्रकारांतील तज्ज्ञ असावेत. महोत्सवात सहभागी असलेल्या महाविद्यालयांशी ते संबंधित असता कामा नयेत. परीक्षकांनी दिलेला निर्णय हा अंतिम मानने आवश्यक असल्याचे चित्रकार-छायाचित्रकार विजय टिपुगडे यांनी सांगितले. ते म्हणाले, महोत्सवासाठी विद्यार्थी कलाकार वर्षभर तयारी करतात; त्यामुळे मध्यवर्ती महोत्सवात सहभागी होणाऱ्या आणि विजेता ठरणाऱ्या विद्यार्थी कलाकारांना एनएसएसप्रमाणे ठरावीक गुण देण्याची तरतूद विद्यापीठाने करावी.

 

टॅग्स :Shivaji Universityशिवाजी विद्यापीठkolhapurकोल्हापूर