शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पर्यटकांनी कोल्हापूर हाऊसफुल्ल, वाहतुकीची कोंडी : पर्यटन स्थळे बहरली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 10:56 IST

tourism kolhapurnews- ख्रिसमस, शनिवार आणि रविवार या सलग सुट्यांमुळे आलेल्या पर्यटकांनी कोल्हापूर फुलले आहे. लॉकडाऊननंतर प्रथमच शहरात एवढ्या मोठ्या संख्येने पर्यटकांची गर्दी झाली असून, हायवेपासून ते अगदी शहरांतर्गत रस्त्यांवरही ट्रॅफिक जाम झाले आहे. अंबाबाई, जोतिबा या तीर्थक्षेत्रांसह शहरातील न्यू पॅलेस, रंकाळा, पन्हाळा, कणेरी, गगनबावडा, चांदोली अशी पर्यटनस्थळे पुन्हा एकदा बहरली आहेत. ​​​​​​​

ठळक मुद्देपर्यटकांनी कोल्हापूर हाऊसफुल्लवाहतुकीची कोंडी : पर्यटन स्थळे बहरली

कोल्हापूर : ख्रिसमस, शनिवार आणि रविवार या सलग सुट्यांमुळे आलेल्या पर्यटकांनी कोल्हापूर फुलले आहे. लॉकडाऊननंतर प्रथमच शहरात एवढ्या मोठ्या संख्येने पर्यटकांची गर्दी झाली असून, हायवेपासून ते अगदी शहरांतर्गत रस्त्यांवरही ट्रॅफिक जाम झाले आहे. अंबाबाई, जोतिबा या तीर्थक्षेत्रांसह शहरातील न्यू पॅलेस, रंकाळा, पन्हाळा, कणेरी, गगनबावडा, चांदोली अशी पर्यटनस्थळे पुन्हा एकदा बहरली आहेत.दरवर्षी उन्हाळा, दसरा, दिवाळी, नाताळ या सणांच्या निमित्ताने पडणाऱ्या सुट्यांमुळे कोल्हापुरात पर्यटकांची प्रचंड गर्दी असते. यंदा कोरोनाच्या धास्तीमुळे दिवाळीपर्यंत पर्यटकांनी कोल्हापुरात येणे टाळले. आता मात्र कोरोना संसर्ग थांबल्याने नागरिकदेखील पर्यटनासाठी बाहेर पडू लागले आहेत.

शुक्रवारी ख्रिसमसची सुटी, त्यानंतर शनिवार आणि रविवार अशा सलग सुट्या आल्या आहेत. शाळा अद्याप सुरू झाल्या नसल्या, तरी ख्रिसमसमुळे ऑनलाईन वर्गांनादेखील सुटी देण्यात आल्याने या सगळ्यांमुळे गुुरुवारी सायंकाळपासूनच कोल्हापुरात मोठ्या संख्येने पर्यटक दाखल होत आहेत.शुक्रवारी दुपारपासून मुंबई-पुण्यासह अन्य जिल्हयांतील वाहने कोल्हापुरात दाखल होऊ लागल्याने हायवेला तसेच कोल्हापूर प्रवेशद्वाराजवळ वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. शहरात अंबाबाई मंदिराला जोडणारे लक्ष्मीपुरी, बिंदू चौक, दसरा चौक, सीपीआर, मिरजकर तिकटी, शनिवार पेठ, रंकाळा या ठिकाणी सायंकाळी वाहतुकीची कोंडी होत होती.

दसरा चौकात वाहने लावण्यासाठी जागा नव्हती. याशिवाय हॉटेल, रेस्टॉरंट, खाऊ गल्ली, धर्मशाळा, भक्तनिवास याठिकाणीही नागरिकांची हाऊसफुल्ल गर्दी होती.

टॅग्स :tourismपर्यटनkolhapurकोल्हापूरChristmasनाताळ