शहरं
Join us  
Trending Stories
1
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
2
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
3
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
4
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
5
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
6
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
7
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
8
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
9
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
10
पतीचे भाकीत ठरले खरे ; डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यावरून ठेवले नाव
11
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
12
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
13
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
15
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
16
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
17
लेख: वीस हजार बेवारस चपलांना नव्या झिंगाट नशेचं व्यसन !
18
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
19
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
20
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 

कोल्हापूर : शाहूवाडी, चंदगड, गगनबावड्यात अतिवृष्टी, धरणातून विसर्ग वाढला : अद्याप २७ बंधारे पाण्याखाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2018 17:30 IST

कोल्हापूर जिल्ह्यात बुधवारी शाहूवाडी, चंदगडसह गगनबावडा तालुक्यांत अतिवृष्टी झाली. राधानगरी, भुदरगड, आजरा तालुक्यांतही जोरदार पाऊस सुरू आहे. धरणक्षेत्रातील धुवाधार पावसाने विसर्ग वाढला असून, नद्यांची पाणीपातळी चांगलीच फुगली आहे.

ठळक मुद्देशाहूवाडी, चंदगड, गगनबावड्यात अतिवृष्टी, धरणातून विसर्ग वाढला अद्याप २७ बंधारे पाण्याखाली

कोल्हापूर : जिल्ह्यात बुधवारी शाहूवाडी, चंदगडसह गगनबावडा तालुक्यांत अतिवृष्टी झाली. राधानगरी, भुदरगड, आजरा तालुक्यांतही जोरदार पाऊस सुरू आहे. धरणक्षेत्रातील धुवाधार पावसाने विसर्ग वाढला असून, नद्यांची पाणीपातळी चांगलीच फुगली आहे. सात नद्यांवरील २७ बंधारे पाण्याखाली गेले असून, या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे.गेले दोन दिवस जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला आहे. विशेष करून पश्चिमेकडील तालुक्यात जोरदार पाऊस आहे. बुधवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासांत जिल्ह्यात सरासरी ३७.८१ मिलिमीटर पाऊस झाला.गगनबावडा तालुक्यात ९१ मिलिमीटर, चंदगडमध्ये ७३.५०, तर शाहूवाडी तालुक्यात ६५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. आजरा, राधानगरी, भुदरगड तालुक्यांतही जोरदार पाऊस सुरू आहे. धरणक्षेत्रातही धुवाधार पाऊस सुरू आहे. राधानगरी धरणक्षेत्रात ८०, वेदगंगा ६७, पाटगाव १७०, घटप्रभा १६०, तर कोदे धरणक्षेत्रात १४७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

राधानगरीतून प्रतिसेकंद १६००, कडवीमधून १६०, कुंभीमधून ३५०, घटप्रभामधून ३७९३, जांबरे १२४९, तर कोदे धरणातून ६३४ घनफूट पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने नद्यांची पाणीपातळी चांगलीच फुगली आहे. नद्यांचे पाणी विस्तीर्ण पसरू लागले असून, २७ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. पंचगंगेची पातळी बुधवारी सायंकाळपर्यंत २८ फुटांपर्यंत राहिली.पडझडीत १.४५ लाखाचे नुकसानतुर्केवाडी (ता. चंदगड) येथील कमलाबाई गावडे यांच्या घराच्या दोन, मजरे शिरगाव येथील रत्नाबाई कांबळे व चंदगड येथील दत्तू कांबळे यांच्या घरांच्या भिंती कोसळून १ लाख ४५ हजारांचे नुकसान झाले आहे.

कागलमध्ये ५५ टक्के पाऊसजिल्ह्याची सरासरी १७७२.३९ मिलिमीटर आहे. आतापर्यंत ५१९.५२ मिलिमीटर (२९.३१ टक्के) पाऊस झाला आहे. पण, कागल तालुक्यात सव्वा महिन्यातच सरासरीच्या ५५ टक्के पाऊस झाला आहे. शाहूवाडीमध्ये ४७ टक्के, भुदरगडमध्ये ४४, तर चंदगडमध्ये ३५ टक्के पाऊस झाला आहे.

तालुकानिहाय पाऊस मिलिमीटरमध्ये असा-हातकणंगले (३.६३), शिरोळ (३.४२), पन्हाळा (२२.४३), शाहूवाडी (६०.००), राधानगरी (५१.१७), गगनबावडा (९१.००), करवीर (१४.२७), कागल (२४.८५), गडहिंग्लज (१८.७१), भुदरगड (५३.००), आजरा (३७.७५), चंदगड (७३.५०). 

 

टॅग्स :monsoon 2018मान्सून 2018kolhapurकोल्हापूर