शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर तापले, पारा ३९ अंशावर

By संदीप आडनाईक | Updated: April 4, 2024 16:13 IST

उकाड्यात होणार वाढ

कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीसाठी प्रचाराचा पारा हळूहळू चढू लागलेला असतानाच आता उन्हाच्या तीव्र झळांनी त्यात भर टाकली आहे त्यामुळे कोल्हापूरचा पारा गुरुवारी ३९ अंश इतका तापला आहे. वातावरणातील तापमानाचा पारा ४० अंश सेल्सिअसपर्यंत पुढे सरकू लागल्याने प्रचारक आणि नागरिकही घामाघूम झाले आहेत. तीव्र झळांनी अंगाला चटके बसत असतानाही कार्यकर्ते उमेदवारांसमवेत प्रचारासाठी दारोदार फिरताना दिसत आहेत.कोल्हापुरात आजवर सर्वोच्च ४१ अंश सेल्सिअस तापमान गेल्यावर्षी मे महिन्यात नोंदवले गेले होते; पण यंदा एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यातच उष्णतेचा कहर अनुभवण्याची वेळ कोल्हापूरकरांवर आली आहे. गुरुवारी सकाळी ७ वाजता ३८.७अंश सेल्सिअस असणारे तापमान दुपारी एकच्या सुमारास ३९ अंशावर पोहोचले आणि चारनंतर पुन्हा ३८ अंशावर आले.गेल्या आठवड्यात कोल्हापुरचा पारा तब्बल २.१ अंश सेल्सिअसने वाढता राहिला आहे, या आठवड्यात तो २.३ अंश सेल्सिअसपर्यंत वाढण्याचा अनुमान हवामानतज्ञांनी व्यक्त केला आहे. कडक उन्हाच्या झळांनी कासावीस झालेले जीव गारव्याच्या शोधात आहेत. भर दुपारी तीव्र झळांनी अंगाची लाही लाही होत आहे.

कमाल तापमान जाणार ४० अंशावर

दिवसाची उष्णता वाढू लागली आहे. गुरुवारपासून सर्वच जिल्ह्यात दुपारच्या कमाल तापमानाच्या ९५ व्या टक्केवारीनुसार कमाल तापमान नोंदवणाऱ्या एकुण सर्व केंद्रापैकी ९५ टक्के केंद्रांवर दुपारचे किमान पातळीवरील ४० डिग्री सेल्सिअस ग्रेड कमाल तापमानापेक्षा अधिक म्हणजे दुपारचे कमाल तापमान ४१ ते ४२ सेल्सिअस ग्रेड जाणवणार आहे.

उकाड्यात होणार वाढदरम्यानच्या काळात पहाटेचे किमान तापमानही सरासरी किमान तापमानापेक्षा २ डिग्री सेल्सिअसने अधिक जाणवणार आहे. उष्णतेच्या काहिलीबरोबरच रात्रीचा उकाडाही चांगलाच जाणवू शकेल असा अंदाज निवृत्त हवामान तज्ञ डॉ. माणिकराव खुळे यांनी व्यक्त केला आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरTemperatureतापमान