शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर तापले--तापमान ४१ अंश सेल्सिअसवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2019 18:25 IST

अवघ्या ११ दिवसांवर आलेल्या मतदानासाठी प्रचाराचा पारा टिपेला पोहोचला असतानाच आता उन्हाच्या तीव्र झळांनी त्यात भर टाकल्याने कोल्हापूरची हवा तापली आहे. वातावरणातील तापमानाचा पारा ४१ अंश सेल्सिअसच्याही पुढे सरकू लागल्याने

ठळक मुद्देउन्हाच्या झळांनी घामाघूम

कोल्हापूर : अवघ्या ११ दिवसांवर आलेल्या मतदानासाठी प्रचाराचा पारा टिपेला पोहोचला असतानाच आता उन्हाच्या तीव्र झळांनी त्यात भर टाकल्याने कोल्हापूरची हवा तापली आहे. वातावरणातील तापमानाचा पारा ४१ अंश सेल्सिअसच्याही पुढे सरकू लागल्याने प्रचारक आणि सर्वसामान्य नागरिकही घामाघूम झाले आहेत. तीव्र झळांनी अंगाला चटके बसत असतानाही कार्यकर्ते उमेदवारांसमवेत प्रचारासाठी दारोदार भटकताना दिसत आहेत. 

कोल्हापुरात आजवर सर्वोच्च ४१ अंश सेल्सिअस तापमान गेल्यावर्षी मे महिन्यात नोंदवले गेले होते; पण आता एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यातच उष्णतेचा कहर अनुभवण्याची वेळ कोल्हापूरकरांवर आली आहे.  गुरुवारी सकाळी ३९ अंश सेल्सिअस असणारे तापमान दुपारी एकच्या सुमारास ४१ वर पोहोचले. चारनंतर पुन्हा ३९ वर आले. कडक उन्हाच्या झळांनी कासावीस झालेले जीव गारव्याच्या शोधात आहेत. दुपारी १२ ते ३ या वेळेत तर उन्हात एक मिनिटही उभे राहू शकत नाही, इतकी उन्हाची तीव्रता जाणवत आहे. तीव्र झळांनी अंगाची लाही लाही होत आहे. 

अशा स्थितीतही प्रचाराचा धडाका सुरूच आहे. २३ ला होणाºया मतदानासाठी २१ रोजीच जाहीर प्रचाराची सांगता होणार आहे; त्यामुळे अवघे १0 दिवसच प्रचारासाठी राहिले आहेत. मुळातच कोल्हापूरच्या दोन्ही लढती हाय व्होल्टेज असल्याने उन्हातान्हाची पर्वा न करताच उमेदवार, कार्यकर्ते प्रचारासाठी सकाळी आठ वाजल्यापासून प्रचारासाठी बाहेर पडत आहेत. ऊन जास्त असल्याने गर्दी जमवण्याचे मोठे आव्हान उभे ठाकल्याने सकाळी ११ पर्यंत पदयात्रा पूर्ण करून, त्यानंतर कोपरा सभा घेण्याचे आणि रात्रीच्या वेळेस जाहीर सभा घेण्याचे नियोजन केले जात आहे. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूर