शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर :जात प्रमाणपत्रासंदर्भात सोमवारपासून तालुक्याच्या ठिकाणी सुनावणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2018 11:54 IST

स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीत आरक्षित प्रभागातून निवडून आलेल्या सदस्यांच्या जातवैधता प्रमाणपत्रासंदर्भात सोमवार (दि. १०) ते १५ सप्टेंबरपर्यंत सुनावणी घ्यावी. तसेच याबाबतचा अहवाल १८ सप्टेंबरपर्यंत सादर करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी शुक्रवारी सर्व तहसीलदारांना लेखी पत्राद्वारे दिले आहेत.

ठळक मुद्देजात प्रमाणपत्रासंदर्भात सोमवारपासून तालुक्याच्या ठिकाणी सुनावणीकोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांचे तहसीलदारांना निर्देश

कोल्हापूर : स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीत आरक्षित प्रभागातून निवडून आलेल्या सदस्यांच्या जातवैधता प्रमाणपत्रासंदर्भात सोमवार (दि. १०) ते १५ सप्टेंबरपर्यंत सुनावणी घ्यावी. तसेच याबाबतचा अहवाल १८ सप्टेंबरपर्यंत सादर करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी सर्व तहसीलदारांना लेखी पत्राद्वारे दिले आहेत.ग्रामविकास विभागाच्या ४ सप्टेंबर २०१६ च्या शासन निर्णयानुसार जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये मागासवर्गीयांसाठी आरक्षित असलेल्या जागेवर निवडून आलेल्या सदस्याने सहा महिन्यांत जातवैधता प्रमाणपत्र सादर न केल्यास त्याची निवड रद्द करण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.

त्यामुळे आरक्षित प्रभागातून निवडून आलेल्या सदस्यांनी त्यांचे जातवैधता प्रमाणपत्र वेळेत सादर केले आहे की नाही, याबाबतची सविस्तर सुनावणी संबंधित तहसीलदारांनी तालुक्याच्या ठिकाणी सोमवारी (दि. १०) ते १५ सप्टेंबरपर्यंत घ्यावी व त्याचा अहवाल १८ सप्टेंबरपर्यंत द्यावा, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.सर्वाेच्च न्यायालयाने नगरसेवकांबाबत दिलेल्या निर्णयानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही याची कार्यवाही सुरू झाली आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायत सदस्यांच्या जातवैधता प्रमाणपत्राचे आॅडिट सुरू करण्यात आले आहे. 

 

टॅग्स :Caste certificateजात प्रमाणपत्रkolhapurकोल्हापूर