शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

‘विल्सन पुतळा ’ विद्रुप करणाºया स्वातंत्र्यसैनिकांना कोल्हापुरात अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2017 18:01 IST

कोल्हापूर : स्वातंत्र्य सौदामिनी भागीरथीबाई तांबट व जयाबाई हाविरे यांनी खटकणारा लॉर्ड विल्सनचा पुतळा विद्रूप केला. त्यांनी घडविलेला इतिहास आजही स्मरणात ठेवणे महत्त्वाचे आहे. ते जाणून स्वातंत्र्यसैनिक उत्तराधिकारी संघटनेने केलेले काम कौतुकास्पद आहे, असे गौरवौद्गार पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी गुरुवारी काढले.‘विल्सन नोज कट’ या नावाने ओळखल्या जाणाºया या घटनेला म्हणजेच ...

ठळक मुद्दे विल्सनचा पुतळा डांबर फेकून विद्रूप केल्याच्या घटनेला ७५ वर्षे पूर्ण स्फूर्ती देणाºया इतिहासाचे स्मरण ठेवणे महत्त्वाचे : चंद्रकांतदादा पाटीलस्वातंत्र्यसैनिक उत्तराधिकारी संघटनेकढून स्मरण आंदोलनाचे बीज कुठून आले हे समजले : चंद्रकांतदादा यांचा टोला पाठ्य पुस्तकात धडा घेऊन अभ्यासक्रमात समावेश करण्याची मागणी

कोल्हापूर : स्वातंत्र्य सौदामिनी भागीरथीबाई तांबट व जयाबाई हाविरे यांनी खटकणारा लॉर्ड विल्सनचा पुतळा विद्रूप केला. त्यांनी घडविलेला इतिहास आजही स्मरणात ठेवणे महत्त्वाचे आहे. ते जाणून स्वातंत्र्यसैनिक उत्तराधिकारी संघटनेने केलेले काम कौतुकास्पद आहे, असे गौरवौद्गार पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी गुरुवारी काढले.

‘विल्सन नोज कट’ या नावाने ओळखल्या जाणाºया या घटनेला म्हणजेच विल्सनचा पुतळा डांबर फेकून विद्रूप केल्याच्या घटनेला ७५ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल या घटनेत सहभागी झालेल्या स्वातंत्र्यसैनिकांना अभिवादन करण्यासाठी शिवाजी चौकात आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.

पालकमंत्री पाटील म्हणाले, सन १९४२ च्या ‘चले जाव’च्या लढ्यात पुरुषांबरोबर हिरीरीने भाग घेऊन स्वातंत्र्य सौदामिनी भागीरथीबाई तांबट व जयाबाई हाविरे यांनी मातीच्या भांड्यातून लपवून आणलेले डांबर विल्सनच्या पुतळ्यावर टाकले. हा पुतळा पूर्ण विद्रूप केला.

पुढे स्वातंत्र्यसेनानी दत्तोबा तांबट, शंकरराव माने, डॉ. माधवराव कुलकर्णी, निवृत्ती आडूरकर, सिदलिंग हाविरे, शामराव पाटील, नारायणराव घोरपडे, नारायणराव जगताप, पैलवान माधवराव घाटगे, काका देसाई, कुंडलिक देसाई, पांडुरंग पोवार, अहमद शाबाजी मुल्ला, व्यंकटेश देशपांडे यांनी पुतळ्यावर घण घालून फोडला आणि हा इतिहास आजरामर झाला.

या घटनेला ७५ वर्षे पूर्ण झाल्यानंतर स्वातंत्र्यसैनिक उत्तराधिकारी संघटनेने स्मरण ठेवून त्या घटनेला पुन्हा उजाळा दिला. ही बाब इतिहासाला उजाळा देण्यासारखी महत्त्वाची आहे. कोल्हापूर चेंबर आॅफ कॉमर्सचे माजी अध्यक्ष व संघटनेचे आनंद माने यांनी प्रास्ताविक केले. स्वागत शरद तांबट यांनी केले.

यावेळी महापौर हसिना फरास, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती अध्यक्ष महेश जाधव, उपमहापौर अर्जुन माने, शिवसेना जिल्हाप्रमुख विजय देवणे, डॉ. संदीप नेजदार, मराठा महासंघाचे जिल्हा अध्यक्ष वसंत मुळीक, नगरसेवक अशोक जाधव, माजी महापौर आर. के. पोवार, बाबा पार्टे, अनिल घाटगे, महादेव पाटील आदी उपस्थित होते.

चळवळीचे बीज

भाषणादरम्यान माजी महापौर आर. के. पोवार यांच्याकडे पाहत पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी टोलविरोधी आंदोलन, पंचगंगा पूल आंदोलनाचे बीज कुठून आले हे समजले, असा टोला हाणला. त्यांनी जर चळवळ उभारली नसती व आम्हाला त्रास दिला नसता तर कोल्हापूरकरांवरील टोल हटला नसता, असेही त्यांनी कबुली दिली.

आठवण जागीविदु्रपीकरणाच्या आंदोलनातील स्वातंत्र्य सौदामिनी भागीरथीबाई तांबट यांच्याबरोबर त्यांचे सुपुत्र डॉ. निशीकांत तांबट हे त्या आंदोलनाच्यावेळी ६ वर्षाचे होते. तेही भागीरथीबार्इंच्याबरोबर तुरूंगात होते. ही आठवण ठेवून उत्तराधिकारी संघटनेने डॉ. निशीकांत तांबट यांच्या हस्ते गुरुवारी छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यास त्यांना खास बोलाविले होते. तांबट यांनी चंद्रकांतदादा पाटील यांच्याबरोबरीने पुष्पहार अर्पण केला.

पाठ्य पुस्तकात धडा घ्या

‘विल्सन नोज कट ’ या पुतळा विदु्रपीकरण इतिहासाचा महाराष्ट्र राज्य शासनाने पाठ्य पुस्तकात धडा घेऊन अभ्यासक्रमात समावेश करावा. अशी मागणी स्वातंत्र्यसैनिक उत्तराधिकारी संघटनेचे शरद तांबट यांनी मागणी केली होती. यास उत्तर देताना पालकमंत्री पाटील म्हणाले, पाठ्य पुस्तकाच्या अभ्यासक्रमात धडा घेण्यासाठी प्रयत्न करु. तत्पुर्वी ५० ते ६० पानांचे पुस्तक काढू व त्यांच्या दहा हजार प्रति मी स्वत: छपाई करुन देतो. अशी ग्वाही त्यांनी दिली.