शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : शेतकऱ्यांना लाचार करण्याचा सरकारचा प्रयत्न : राजू शेट्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2018 17:34 IST

शेतकऱ्यांना आश्वासन देऊन सत्तेवर आलेल्या भाजपा सरकारला शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवायचे नाहीतच; पण त्यांना लाचार करण्याचा प्रयत्न सुरू असल्याची टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक खासदार राजू शेट्टी यांनी केली. एकाच प्रश्नासाठी किती आंदोलने करायची, किती मोर्चे काढायचे? असा सवालही त्यांनी यावेळी केला.

ठळक मुद्देएकाच प्रश्नासाठी किती आंदोलने करायची, किती मोर्चे काढायचे? मुख्यमंत्र्यांकडून कौतुक म्हणजे धोका : राजू शेट्टी

कोल्हापूर : शेतकऱ्यांना आश्वासन देऊन सत्तेवर आलेल्या भाजपा सरकारला शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवायचे नाहीतच; पण त्यांना लाचार करण्याचा प्रयत्न सुरू असल्याची टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक खासदार राजू शेट्टी यांनी केली. एकाच प्रश्नासाठी किती आंदोलने करायची, किती मोर्चे काढायचे? असा सवालही त्यांनी यावेळी केला.कसत असलेल्या जमिनी शेतकऱ्यांच्या नावावर कराव्यात, विनाअट संपूर्ण कर्जमाफी करावी, यांसह विविध मागण्यांसाठी नाशिकहून निघालेला मोर्चा मुंबईत धडकला आहे. मागण्यांवर शेतकरी ठाम असून, सरकारची अडचण झाली आहे. याबाबत ‘स्वाभिमानी’चे नेते राजू शेट्टी यांची भूमिका जाणून घेण्यासाठी पत्रकारांनी सोमवारी त्यांच्याशी संपर्क साधला असता, शेट्टींनी सरकारवर जोरदार टीका केली.शेट्टी म्हणाले, गेली अनेक वर्षे शेतकऱ्यांचे तेच प्रश्न आहेत. एकाच प्रश्नासाठी किती आंदोलने करायची, किती मोर्चे काढायचे? याचे उत्तर सरकारने द्यावे. सरकारला कोणत्याही परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवायचे नाहीत.

शेतकऱ्यांना लाचार करायचे, एवढेच काम भाजपा सरकारकडून सुरू आहे. आतापर्यंत आम्ही सनदशीर मार्गाने आमचे प्रश्न व मागण्या मांडत होतो. त्याची दखलही सरकारने घेतली नाही. तुम्ही दादच देणार नसाल तर शेतकरी आक्रमक होणारच. बळीराजाच्या जिवावर सत्ता भोगताय. त्यांनाच पायदळी तुडवाल तर याद राखा. सरकारला गुढगे टेकायला लावल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा इशाराही खासदार राजू शेट्टी यांनी दिला.

मुख्यमंत्र्यांकडून कौतुक म्हणजे धोकाशेतकरी मोर्चाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कौतुक करीत आहेत म्हणजे काहीतरी धोका वाटतो. याचा अनुभव आम्हाला आल्याची टीकाही शेट्टी यांनी केली. 

 

टॅग्स :Raju Shettyराजू शेट्टीkolhapurकोल्हापूर