शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : न्यायालयाच्या स्थगितीमुळे ‘गोकुळ’ला अभय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2018 17:53 IST

शासनाच्या आदेशानुसार गाईच्या दुधाला खरेदी दर न दिल्याने विभागीय उपनिबंधक (दुग्ध) यांनी ‘गोकुळ’ला नोटीस काढली असली तरी, जोपर्यंत शासनाच्या आदेशाला न्यायालयाची स्थगिती आहे, तोपर्यंत संघाला अभय राहणार आहे. याबाबत न्यायालयाने निकाल दिल्याशिवाय सहकार विभागाला काहीच कारवाई करता येणार नाही. त्यामुळे दुग्ध विभागाने केवळ सुनावणीची प्रक्रिया सुरू ठेवली आहे.

ठळक मुद्देसुनावणीची प्रक्रिया म्हणजे कारवाई नव्हे निकालाशिवाय कारवाई करणे अशक्यच न्यायालयाच्या स्थगितीमुळे ‘गोकुळ’ला अभय

कोल्हापूर : शासनाच्या आदेशानुसार गाईच्या दुधाला खरेदी दर न दिल्याने विभागीय उपनिबंधक (दुग्ध) यांनी ‘गोकुळ’ला नोटीस काढली असली तरी, जोपर्यंत शासनाच्या आदेशाला न्यायालयाची स्थगिती आहे, तोपर्यंत संघाला अभय राहणार आहे. याबाबत न्यायालयाने निकाल दिल्याशिवाय सहकार विभागाला काहीच कारवाई करता येणार नाही. त्यामुळे दुग्ध विभागाने केवळ सुनावणीची प्रक्रिया सुरू ठेवली आहे.शासनाने जून २०१७ मध्ये गाय व म्हैस दूध खरेदीच्या दरात प्रतिलिटर तीन रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतला. ‘गोकुळ’ने दीड महिना त्यानुसार दरवाढ दिली आणि गाईच्या दुधाच्या दरात दोन रुपयांची कपात केली. याविरोधात तक्रार झाल्यानंतर राज्यातील ५० दूध संघांना दुग्ध विभागाने नोटिसा काढल्या. याविरोधात ‘गोकुळ’, ‘पुणे’ व ‘बारामती’ दूध संघांनी न्यायालयात याचिका दाखल केली आणि शासन आदेशाला स्थगिती मिळविली.

नोटीस देऊनही दूध दरवाढ केली नसल्याने विभागीय उपनिबंधक सुनील शिरापूरकर यांनी ‘संचालक मंडळ बरखास्त का करू नये?’ अशी नोटीस काढली. पुणे विभागातील दूध संघाबरोबरच नाशिक व औरंगाबाद येथील दूध संघांनाही नोटिसा काढल्या आहेत; पण न्यायालयाने स्थगिती दिल्याने या संघांना अभय मिळाले आहे. न्यायालयाच्या निकालाशिवाय दुग्ध विभागाने जरी ठरविले तरी कारवाई करता येणार नाही, हे मात्र निश्चित आहे.उपनिबंधकांची कारवाई आणि ‘अवमान’दूध दरवाढीच्या शासन आदेशाला स्थगिती देताना न्यायालयाने संबंधित दूध संघावर गंभीर स्वरूपाची कारवाई करता येणार नाही, असे नमूद केले आहे. याबाबत २४ एप्रिलला सुनावणीदरम्यान‘गोकुळ’च्या वतीने विभागीय उपनिबंधकांनी काढलेल्या नोटिसीचा संदर्भ देत ‘हा न्यायालयाचा अवमान होत नाही का?’ असे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले होते. त्यावर सुनावणीची प्रक्रिया पूर्ण केली म्हणजे कारवाई असा अर्थ होत नसल्याचे सरकारी वकिलांनी सागिंतले होते.पावणे पाच लाख खात्यांचा कॅशलेस व्यवहारपुणे विभागातील दूध संघांची बैठक कात्रज डेअरीमध्ये विभागीय उपनिबंधक सुनील शिरापूरकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यामध्ये संघांना दिलेल्या नोटिसा, लेखापरीक्षण दोष-दुरुस्ती अहवालाबाबत चर्चा झाली. कॅशलेस व्यवहाराचा आढावा घेण्यात आला. यामध्ये विभागात ४ लाख ६० हजारांपेक्षा अधिक दूध उत्पादक कॅशलेस व्यवहार करतात. अद्याप तीन लाख उत्पादकांना या प्रक्रियेत आणायचे असल्याचे संघांनी सांगितले.

न्यायालयाने स्थगिती देताना गंभीर स्वरूपाची कारवाई करता येणार नसल्याचे म्हटले आहे. सुनावणीची प्रक्रिया पूर्ण म्हणजे कारवाई नव्हे. त्यामुळे न्यायालयाचा अवमान होण्याचा प्रश्नच येत नाही.- सुनील शिरापूरकर

(विभागीय उपनिबंधक - दुग्ध)---------------------------------------------------------(राजाराम लोंढे)

 

टॅग्स :milkदूधkolhapurकोल्हापूर