शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
3
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
4
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
5
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
6
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
7
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
8
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
9
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
10
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
11
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
12
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
13
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
14
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
15
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
16
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
17
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
18
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
19
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
20
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...

कोल्हापूर : शैक्षणिक बदलांचा वेध घेण्यासाठी संस्थेच्या शाखांना भेटी देणार : चंद्रकांत पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2018 13:25 IST

शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांचे शैक्षणिक कार्य फार मोठे आहे. त्यांनी केलेली श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेची उभारणी आणि शिक्षणप्रसारामुळे समाजातील गोरगरिबांच्या मुलांना शिक्षणाच्या संधी उपलब्ध झाल्या. त्यांचे शैक्षणिक कार्य प्रेरणादायी आहे. बापूजींच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त संस्थेच्या विविध शाखांना भेटी देऊन शैक्षणिक बदलांचा वेध घेणार आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री व श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी येथे केले.

ठळक मुद्देशैक्षणिक बदलांचा वेध घेण्यासाठी संस्थेच्या शाखांना भेटी देणार : चंद्रकांत पाटील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेची वार्षिक सभा

कोल्हापूर : शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांचे शैक्षणिक कार्य फार मोठे आहे. त्यांनी केलेली श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेची उभारणी आणि शिक्षणप्रसारामुळे समाजातील गोरगरिबांच्या मुलांना शिक्षणाच्या संधी उपलब्ध झाल्या. त्यांचे शैक्षणिक कार्य प्रेरणादायी आहे. बापूजींच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त संस्थेच्या विविध शाखांना भेटी देऊन शैक्षणिक बदलांचा वेध घेणार आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री व श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी येथे केले.संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते अध्यक्षपदावरून बोलत होते. पालकमंत्री पाटील म्हणाले, संस्थेच्या विविध शाखांना भेटी देऊन गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी नवे अभ्यासक्रम, भौतिक सुविधा, आदींबाबत चर्चा करणार आहे. केंद्र, राज्य शासनाच्या विविध योजनांद्वारे शाखांच्या विकासासाठी प्रयत्नशील राहीन.या सभेच्या प्रारंभी स्वामी विवेकानंद, शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे, संस्थामाता सुशीलादेवी साळुंखे यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. महेश हिरेमठ यांनी संस्थेची प्रार्थना, भक्तिगीते सादर केली. संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांनी प्रास्ताविकातून संस्थेच्या शैक्षणिक कार्याचा आढावा घेतला.

यावेळी संस्थेचे सहसचिव प्राचार्य आर. व्ही. शेजवळ, माजी प्राचार्य पी. यू. शेठ यांनी मनोगत व्यक्त केले. संस्थेचे उपाध्यक्ष संपतराव जेधे, अविनाश पाटील, जी. पी. काका पाटील, शाहीर कुंतीनाथ करके, प्राचार्य डॉ. एस. वाय. होनगेकर, आदी उपस्थित होते. संस्थेच्या सचिव प्राचार्या शुभांगी गावडे यांनी आभार मानले.

त्या म्हणाल्या, बापूजींनी उभी केलेली ज्ञानभूमी जनसेवेची कर्मभूमी आहे. शिक्षणाच्या प्रसारातून उच्चतम संस्कारमूल्ये जतन करावयाची आहेत. दरम्यान, या सभेत मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करण्यात आले. सन २०१७-१८ च्या अहवाल, आॅडिटेट रिपोर्टस, सन २०१८-१९ च्या एकत्रित जमाखर्चाच्या अंदाजपत्रकास मंजुरी देण्यात आली. सन २०१८ ते २०२१ या वर्षासाठी नवीन व्यवस्थापक मंडळ, समित्यांची नियुक्ती करून त्यास मंजुरी देण्यात आली. सर्व ठराव एकमताने मंजूर झाले.

कार्याचा वारसा जतन करावाबापूजींच्या कार्याचा वारसा आपण सर्वांनी जतन केला पाहिजे. अनेक शाळा, महाविद्यालये निर्माण करून विवेकानंद शिक्षण संस्था शैक्षणिक प्रगतिपथावर उभी राहिली. बापूजींच्या जन्मशताब्दीनिमित्ताने ही संस्था नवे अभ्यासक्रम, शैक्षणिक धोरणे राबवून शिक्षणात नवे बदल घडवत असते, असे पालकमंत्री पाटील यांनी सांगितले.

कोल्हापुरात श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या वार्षिक सभेत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मार्गदर्शन केले. यावेळी शेजारी अविनाश पाटील, आर. व्ही. शेजवळ, अभयकुमार साळुंखे, संपतराव जेधे, शुभांगी गावडे उपस्थित होत्या. (छाया : दीपक जाधव) 

 

टॅग्स :Chandrakant Dada Bachu Patilचंद्रकांतदादा बच्चू पाटीलkolhapurकोल्हापूर