शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : माजी सैनिकांच्या दवाखान्यासाठी ५0 लाखांचा निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2019 11:15 IST

शाहू छत्रपती यांच्या ७१ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून खासदार संभाजीराजे यांनी माजी सैनिकांच्या दवाखान्यासाठी ५0 लाखांचा निधी दिला. माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी हा दवाखाना मोठा आधार ठरणार आहे.

ठळक मुद्देमाजी सैनिकांच्या दवाखान्यासाठी ५0 लाखांचा निधीशाहू छत्रपतींच्या वाढदिनी संभाजीराजेंनी व्यक्त केली कृतज्ञता

कोल्हापूर : शाहू छत्रपती यांच्या ७१ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून खासदार संभाजीराजे यांनी माजी सैनिकांच्या दवाखान्यासाठी ५0 लाखांचा निधी दिला. माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी हा दवाखाना मोठा आधार ठरणार आहे.लेफ्टनंट जनरल पी. जे. एस. पन्नू आणि १०९ टी. ए. बटालियनचे कमांडिंग आॅफिसर कर्नल आर. एस. लेहल यांच्या उपस्थितीत एक्स सर्व्हिसमेन वेल्फेअर असोसिएशन लीगचे अध्यक्ष सुभेदार एन. एन. पाटील यांच्याकडे खासदार संभाजीराजे यांनी निधीबाबतचे पत्र दिले.गेल्या महिन्यात छत्रपती संभाजीराजे फौंडेशनमार्फत सशस्त्र सेनाध्वज दिनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यावेळी खासदार संभाजीराजे छत्रपती, संयोगिताराजे छत्रपती, कर्नल आर. एस. लेहल, परमपाल कौर लेहल यांच्यासोबत त्रिशक्ती स्थळावरील माजी सैनिकांच्या दवाखान्याची पाहणी केली होती.

याठिकाणी अनेक अपुऱ्या सोयी-सुविधा, यंत्र सामुग्रीचा अभाव यामुळे संभाजीराजे व्यथित झाले. म्हणून माजी सैनिक आणि त्यांच्या परिवाराच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी या दवाखान्याच्या उभारणीसाठी निधी देण्याचा निर्णय संभाजीराजे यांनी घेतला.

माजी सैनिक आणि त्यांच्या परिवाराच्या आरोग्यासाठी पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणात निधी मिळाल्याने आम्हाला दिलासा मिळाला आहे, अशा शब्दांत एस. एन. पाटील यांनी कृतज्ञता व्यक्त केली. याप्रसंगी मेजर जनरल पन्नू, कर्नल आर. एस. लेहल, परमपाल कौर लेहल, लेफ्टनंट लेआॅन, सुभेदार बाबू नाईक, सांगवडेकर, सुभेदार आनंदा पाटील, हवालदार संभाजी माने उपस्थित होते.

देशवासियांसाठी सीमेवर रात्रंदिवस सेवा बजावून निवृत्त झाल्यानंतरही या माजी सैनिकांची आणि त्याच्या परिवाराची काळजी घेणे हे मी माझे कर्तव्य समजतो. याच भूमिकेतून या माजी सैनिकांच्या दवाखान्यासाठी ५0 लाखांचा निधी देण्याचा निर्णय घेतला आहे.: खासदार संभाजीराजे छत्रपती

 

टॅग्स :Sambhaji Raje Chhatrapatiसंभाजी राजे छत्रपतीkolhapurकोल्हापूर