शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुका महायुती की स्वबळावर; निर्णय घेण्याचे अधिकार स्थानिकांना, मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्टीकरण
2
भाजपा, JDUने आपल्या जागा मित्रपक्षांना दिल्या, तरी NDAमधील तिढा सुटेना, नाराज मांझी म्हणाले..      
3
ENG W vs SL W : ...अन् श्रीलंकन कॅप्टनवर आली स्ट्रेचरवरुन मैदानाबाहेर जाण्याची वेळ; जाणून घ्या सविस्तर
4
माझ्या राजकीय कारकिर्दीत मी पाहिलेले पहिले हतबल मुख्यमंत्री म्हणजे उद्धव ठाकरे; बावनकुळेंची टीका
5
शेवटच्या चेंडूपर्यंत थरार, नामिबियाने बलाढ्य दक्षिण आफ्रिकेला हरवलं, सामन्यात नेमकं काय घडलं?
6
वयाने लहान तरुणाला घरी बोलावून ठेवायची शारीरिक संबंध, मग केली हत्या, महिलेला अटक
7
Nashik: "...शरीरसंबंध ठेव, अन्यथा तुझे फोटो व्हायरल करीन"; मुंबईत विवाहित मैत्रिणीचे व्हिडीओ काढले, घरी जाऊन केला बलात्कार
8
फ्रान्सच्या राजकारणात मोठी उलथापालथ, सेबॅस्टिन लेकोर्नू एका आठवड्यात दुसऱ्यांदा बनले पंतप्रधान
9
"उद्धवजी, हंबरडा राखून ठेवा, महापालिकेतील पराभवानंतर तुमच्या..."; शेलारांचे ठाकरेंना उत्तर
10
या उद्योगातील ५० हजार नोकऱ्या धोक्यात! हळूच जातील जॉब; हा आहे कंपन्यांचा प्लान
11
"राहुल गांधींची जशी अमेठीमध्ये अवस्था झाली होती, तशीच तेजस्वी यादवांची..."; प्रशांत किशोर यादवांच्या बालेकिल्ल्यातून फुंकणार रणशिंग
12
"पत्नीची हत्या, १३ वर्षांचा कारावास भोगला; बाहेर येताच त्याने..."; आरोपीचे कारनामे कळल्यावर पोलिसही अवाक्
13
सोन्यापासून बनवला सगळ्यात महागडा ड्रेस, तुम्ही बघितला का? वजन १० किलो आणि किंमत...
14
ट्रम्प यांनी चीनवर लादले 100% टॅरिफ; शेअर आणि क्रिप्टो मार्केट कोसळले, $2 ट्रिलियन बुडाले...
15
"मी आरशात बघतो, पण तुम्ही शेतकऱ्यांकडे तरी बघा"; CM फडणवीसांच्या टीकेला उद्धव ठाकरेंचे प्रत्युत्तर
16
नोबेल परत घ्या, मुस्लिम संघटनांनी मारिया कोरिना मचाडो यांच्या विरोधात आंदोलन केले सुरू
17
"...तर दोन्ही उपमुख्यमंत्री साधे मंत्री म्हणून फिरले पाहिजेत"; ठाकरेंचं नियमावर बोट, सरकारला सुनावले खडेबोल
18
मोदींचा ‘तो’ फोटो शेअर करणाऱ्या मामा पगारेंना काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी घेतलं खांद्यावर, केला सत्कार
19
"सत्याने प्रेरीत पण...", 'बॅड्स ऑफ..' वादावर आर्यन खाननं सोडलं मौन; समीर वानखेडे प्रकरणावर म्हणाला...
20
धंगेकरांनी पक्षांतर केले याचे त्यांना भान नाही, ते विसरले आहेत; अजितदादांनी घेतला धंगेकरांचा समाचार

कोल्हापूर ‘फुल्ल’ रविवार...

By admin | Updated: October 19, 2015 00:14 IST

अंबाबाई मंदिरात गर्दीचा कळस

कोल्हापूर : करवीरनिवासिनी अंबाबाईच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या गर्दीने रविवारी कळस गाठला. एका दिवसात २ लाख ८८ हजार ७५० भाविकांनी देवीचे दर्शन घेतले. त्यामुळे मंदिर परिसराला जत्रेचे स्वरूप आले होते, तर गेल्या सहा दिवसांत गर्दीने १४ लाख ७० हजार ४७८चा आकडा पार केला.दरवर्षी नवरात्रात अंबाबाईच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांची संख्या १४ लाखांच्या आसपास असते. यंदा मात्र राज्यातील काही महापालिकांच्या निवडणुका असल्याने उच्चांकी गर्दी होत आहे. शुक्रवारपासून सुरू झालेल्या गर्दीचा ओघ रविवारी उच्चांकी पातळीवर होता. पहाटे पाच वाजल्यापासूनच भाविकांच्या रांगा मंदिराबाहेर आल्या होत्या. महिला भाविकांच्या चार पदरी रांगा भवानी मंडपापर्यंत आल्या होत्या. पुरुष भाविकांच्या रांगा जोतिबा रोडमार्गे भवानी मंडपात वळवून पुढे भाऊसिंगजी रोडपर्यंत गेली होत्या. दक्षिण दरवाजा येथील मुख्य दर्शनाच्या रांगाही शेतकरी बाजारपर्यंत आल्या होत्या. मंदिरात दत्तमंदिरासमोरील व गरुड मंडपातील मुख्य दर्शनाच्या ठिकाणीही भाविकांचे लोंढेच्या लोंढे होते. मंदिर परिसरात पाय ठेवायलाही जागा नव्हती. रविवारी होणारी गर्दी अपेक्षित ठेवूनच मंदिराकडे जाणाऱ्या सर्वप्रकारच्या वाहनांना प्रवेश बंदी करण्यात आली होती. मंदिरापासून ते शिवाजी चौक, बिंदू चौक, खरी कॉर्नर, ताराबाई रोड, पापाची तिकटी या सगळ््या मार्गांवर फक्त भाविकांची गर्दीच गर्दी दिसत होती. याशिवय आटपाडी येथून भाविकांच्या ४० बसेस दाखल झाल्या होत्या. स्वयंसेवींची अमूल्य मदत..भाविकांची ही अलोट गर्दी सावरण्यात पोलिसांना खरी मदत झाली ती स्वयंसेवी संस्थांच्या कार्यकर्त्यांची. या रांगांचे नियोजन करण्यात अनिरुद्ध उपासना केंद्र, व्हाईट आर्मी, स्वयंस्फूर्तीने पुढे आलेले तरुण-तरुणी, जीवन ज्योती संस्थेचे कार्यकर्ते यांनी मोलाची भूमिका बजावली. मुखदर्शनाची रांग, गाभारा दर्शनाची रांग या पाट्याही घेऊन महिला व मुली थांबल्या होत्या. श्रीपूजक गजानन मुनीश्वर यांच्याकडून तसेच काही संस्थांकडून भाविकांना पिण्याचे पाणी पुरविले जात होते.भाविकांची गर्दी अशी दि. १३ : १ लाख ६६ हजार १२७दि. १४ : २ लाख १२ हजार ४४६दि. १५ : २ लाख ५० हजार ९५९दि. १६ : २ लाख ९० हजार ३२०दि. १७ : २ लाख ६१ हजार ७५०दि. १८ : २ लाख ८८ हजार ८७६+उमेदवारांचा प्रचार..या गर्दीचा लाभ उठवत शहरातील बहुतांशी उमेदवारांच्या कार्यकर्त्यांनी परिसरात प्रचार मोहीम राबविली होती. त्या-त्या पक्षांचे कार्यकर्ते स्कार्फ-टोप्या घालून भाविकांना केळी, खिचडी, लाडू अशा प्रसादाचे वाटप करत होते.दोन टप्प्यांत प्रचार...रखरखत्या उन्हाचा अंदाज घेत उन्हाचा तडाखा वाढण्यापूर्वी सकाळी व ऊन कमी झाल्यानंतर सायंकाळी अशा दोन टप्प्यांत या प्रचारफेऱ्यांचे नियोजन केले होते. वैयक्तिक गाठीभेटीरविवारी कुटुंबातील सर्व मतदार भेटणार असल्याने उमेदवारांनी घरोघरी जाऊन गाठीभेटीवर भर दिला, तसेच वॉर्डनिहाय आणि प्रभागनिहाय बैठका घेऊन प्रचाराची आखणी केली. बच्चेकंपनीसह महिलाही प्रचारात सहभागी होत्या.