अभयारण्यग्रस्तांचा ठिय्या सुरूकोल्हापूर : चांदोली अभयारण्यातील व्याघ्र प्रकल्पामुळे बाधित झालेल्या सात गावांतील कुटुंबांना पर्यायी जमिनी द्या, शाहूवाडी तालुक्यातील उखळूपैकी अंबाईवाडीचे ठरल्याप्रमाणे खास पुनर्वसन व्हावे, या मागणीसाठी श्रमिक मुक्ती दलाच्यावतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निदर्शने करण्यात आली. सरकारने जमीन दिली नाही, हाताला रोजगार नाही, मग गावात राहून उपाशी राहण्यापेक्षा जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच ठिय्या मारण्याचा निर्णय अभयारण्यग्रस्तांनी घेतला आहे. दसरा चौकातून या मोर्चाला सुरुवात झाली. व्हीनस कॉर्नर, बसंत-बहार टॉकीजमार्गे हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर गेला. मोर्चेकरी राज्य सरकारच्या विरोधात घोषणा देत होते. मोर्चात अनेक महिला सहभागी झाल्या होत्या. मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर आल्यावर पुन्हा घोषणाबाजी झाली. त्यानंतर मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. यावेळी डॉ. भारत पाटणकर, मारुती पाटील यांची भाषणे झाली. जिल्हाधिकारी राजाराम माने यांना यापूर्वीच निवेदन दिले असल्याने त्यांनी चर्चेला बोलावले तरच आम्ही जाऊ अन्यथा आम्ही स्वत: त्यांना भेटायला जाणार नाही, असे संपत देसाई यांनी सांगितले. यावेळी डी. के. बोडके, मारुती पाटील, नजीर चौगुले, पांडुरंग कोठारी, वसंत पाटील, अशोक पाटील, आनंदा आमकर, शंकर पाटील, पांडुरंग पोवार, आनंदा गोटल भगवान बोडके, शंकर पाटील, नतूराम खोत, आदी उपस्थित होते. चांदोली अभयारण्यातील व्याघ्र प्रकल्पग्रस्त गेल्या सोळा वर्षांपासून पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत आहेत. आतापर्यंत पन्नास टक्केही पुनर्वसन झाले नाही. दहा टक्क्यांपेक्षाही कमी जमीन अभयारण्यग्रस्तांना दिली आहे. ज्या ठिकाणी विस्थापित केले आहे, तेथे जमिनीचे अंशत: वाटप केले आहे. जमिनी देण्याचे आदेश झाले; पण प्रत्यक्ष ताबा दिलेला नाही. उखळूपैकी अंबाईवाडीच्या (ता. शाहूवाडी) प्रकल्पग्रस्तांचे खास बाब म्हणून पुनर्वसन व्हावे, आदी मागण्यांसाठी हे ठिय्या आंदोलन सुरू आहे. (प्रतिनिधी) न्यायालयीन कामकाजावर वकिलांचा बहिष्कार कोल्हापूर : अलाहाबाद (उत्तर प्रदेश) येथील वकिलाचा पोलीस निरीक्षकाने गोळ्या घालून खून केल्याच्या निषेधार्थ सोमवारी कोल्हापूर जिल्ह्यातील वकिलांनी न्यायालयीन कामकाजावर बहिष्कार टाकला. यावेळी टाऊन हॉल येथील जिल्हा व सत्र न्यायालयाच्या आवारात झालेल्या सभेत या खुनाचा निषेध केला.अलाहाबाद येथे पोलीस निरीक्षकाने किरकोळ कारणावरून एका वकिलावर गोळीबार केला. त्यामध्ये या वकिलाचा मृत्यू झाला. या निषेधार्थ ‘बार कौन्सिल आॅफ इंडिया’ च्या निर्णयानुसार वकिलांनी सोमवारी न्यायालयीन कामकाजावर बहिष्कार टाकला. यामध्ये कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनचे पदाधिकारी, वकील यामध्ये सहभागी झाले. यावेळी बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. विवेक घाटगे यांनी, पोलीस यंत्रणेने जे धाडस केले आहे, ते कायदा व सुव्यवस्था यंत्रणेच्या विरोधात आहे. याचा मी निषेध करतो, असे सांगितले.यावेळी अॅड. के. ए. कापसे, अॅड. शिवाजी राणे, अॅड. संपत पवार, अॅड. प्रकाश आंबेकर, आदी वकिलांनी हा लोकशाहीला मारक हल्ला असल्याचे मत व्यक्त केले. यावेळी अॅड. महादेवराव आडगुळे, उपाध्यक्ष अॅड. के. व्ही. पाटील, अॅड. सचिव राजेंद्र मंडलिक, माजी अध्यक्ष अॅड. अजित मोहिते, अॅड. प्रकाश मोरे, अॅड. पूजा कटके, अॅड. मीना पोवार, अॅड. विद्या कांबळे, अॅड. सुलेता संगाज, अॅड. प्रणिता कांबळे, अॅड. चारुलता चव्हाण, अॅड. एस. जी. जोशी, अॅड. दीपक पाटील, अॅड. रमेश कुलकर्णी, अॅड. धनंजय पठाडे यांच्यासह वकील बांधवांचा सहभाग होता.(प्रतिनिधी)अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा मोर्चाकोल्हापूर : अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मागील वर्षापासून मानधनवाढ मिळावी, दिवाळी भाऊबीज भेट सत्वर देण्यात यावी, सेवानिवृत्त अंगणवाडी कर्मचाऱ्यांना पेन्शन सुरू करावी, आदी विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियनतर्फे सोमवारी जिल्हा परिषदेवर मोर्चा काढला. टाऊन हॉल येथून मोर्चाला सुरुवात झाली. मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयामार्गे जिल्हा परिषद कार्यालयावर पोहोचला. मोर्चा जिल्हा परिषदेवर पोहोचताच पोलिसांनी मुख्य दरवाजा बंद करून घेतला. मात्र, मोर्चातील महिलांनी हा दरवाजा उघडून आत घुसण्याचा प्रयत्न केला, परंतु पोलिसांनी तो प्रयत्न हाणून पाडला. थोडावेळ निदर्शने केल्यानंतर मोर्चाच्यावतीने एक शिष्टमंडळ जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी एम. एस. घुले यांना भेटले. या शिष्टमंडळात रघुनाथ कांबळे, नामदेव गावडे, मीना पवार, शुभांगी पाटील, सुनंदा खाडे, भारती चव्हाण, मीना पाटील, आक्काताई पाटील, जयश्री पवार, वंदना चोपडे, विद्या प्रभावळे, मीनाक्षी पाटील, पल्लवी गवळी, रेखा ऐवाळे, भारती बालाईकर, बनाबाई वाडकर, स्मिता खोत, स्मिता पाटील, आदींचा समावेश होता. उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या निवेदनात वरील प्रमुख मागण्यांसह एक महिन्याची उन्हाळी सुटी द्यावी, अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे कंत्राटीकरण हाणून पाडा, एनजीओंकडे प्रकल्पांचे हस्तांतरण करू नका, मानधन महिन्याच्या पाच तारखेपर्यंत मिळावे, अशा मागण्याही करण्यात आल्या आहेत. (प्रतिनिधी) पुरोगामी नेत्यांच्या संरक्षणाची नौजवान सभेची मागणीकोल्हापूर : पुरोगामी विचारांचे ज्येष्ठ नेते एन. डी. पाटील, निवृत्त न्यायाधीश बी. जी. कोळसे व निवृत्त पोलीस महानिरीक्षक एस. एम. मुश्रीफ यांना विशेष पोलीस संरक्षण द्यावे, या मागणीचे निवेदन सोमवारी अखिल भारतीय नौजवान सभा व आॅल इंडिया स्टुडंटस् फेडरेशनच्यावतीने विशेष पोलीस महानिरीक्षक रितेशकुमार व पोलीस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा यांना देण्यात आले. कोल्हापुरात ‘हू किल्ड करकरे’ या पुस्तकावर चर्चासत्राचे आयोजन कॉ. गोविंद पानसरे यांनी केले होते. धर्मांध शक्तींनी हे चर्चासत्र उधळण्याचा इशारा दिला होता. अवघ्या दीड महिन्यांनंतर धर्मांध शक्तींकडून पानसरे यांची हत्या झाली. त्यामुळे पुरोगामी विचारांच्या नेत्यांना पोलीस संरक्षण द्यावे, अशी मागणी शिवाजी माळी, प्रशांत आंबी, दिलदार मुजावर, ज्योती भालकर, प्रशांत पिसे, कृष्णा पानसे, उमेश माळी, मोनिका क्षीरसागर यांनी केली आहे. (प्रतिनिधी) ग्रामीण डाकसेवकांचे रास्ता रोको आंदोलन कोल्हापूर : ग्रामीण डाकसेवकांना सातवा वेतन आयोग लागू करण्यासाठी उच्च न्यायालय किंवा सर्वोच्च न्यायालयाच्या सेवानिवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करावी, या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी ग्रामीण डाकसेवकांचा गेल्या सात दिवसांपासून देशव्यापी बेमुदत संप सुरू आहे. सोमवारी आंदोलनाच्या पुढील टप्प्यात तावडे हॉटेल येथे ग्रामीण डाकसेवकांनी रास्ता रोको आंदोलन केले. यामुळे काही वेळ या मार्गावरील वाहतूक व्यवस्था ठप्प झाली होती. गेल्या सात दिवसांपासून अखिल भारतीय ग्रामीण डाकसेवक संघातर्फे ग्रामीण डाकसेवकांना खात्यात समाविष्ट करून खात्याच्या सर्व सेवा-सुविधा मिळाव्यात, सातवा वेतन आयोग निर्धारण समिती ही निवृत्त न्यायाधीशांमार्फत करावी, खात्यांचे विकेंद्रीकरण थांबविण्यात यावे, या प्रमुख मागण्यांसाठी देशव्यापी आंदोलन सुरू असल्याने ग्रामीण भागातील डाक व्यवस्था कोलमडली आहे. जिल्ह्णातील सुमारे ५०० डाकसेवक या संपात सहभागी झाले आहेत. सोमवारी दुपारी बारा वाजता तावडे हॉटेल येथे काही वेळ शांततेच्या मार्गाने रास्ता रोको आंदोलन संघटनेच्यावतीने करण्यात आले. त्यानंतर रॅलीद्वारे दुपारी एक वाजता टाऊन हॉल येथे आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यासाठी बैठक घेण्यात आली. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत बेमुदत संप सुरूच ठेवण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला. सोमवारच्या या आंदोलनात सुमारे ४०० डाकसेवक सहभागी झाले होते. आंदोलनात विभागीय अध्यक्ष डी. आर. पाटील, डी. एम. टिपुगडे, बी. डी. बोळावे, एम. बी. पाटील, डी. एस. सावंत, एम. बी. चौगुले, आदींसह सर्व तालुक्यांतील प्रतिनिधी उपस्थित होते. (प्रतिनिधी) काआंदोलनानंतर 'मनपा'ला जागगुजरीत सराफांची निदर्शने : महाद्वार रस्त्यासाठी ३५ लाखांची निविदोल्हापूर : महाद्वार रोडवरील बिनखांबी गणेश मंदिर ते पापाची तिकटी या खराब रस्त्याप्रश्नी गुजरी येथील संभवनाथ चौकात कोल्हापूर सराफ व्यापारी असोसिएशनच्यावतीने निदर्शने करण्यात आली. दरम्यान, आयुक्तांसह पदाधिकारी तिथे आले. त्यांनी तातडीने महाद्वार रोडसाठी ३५ लाख रुपयांची तरतूद करून निविदा सायंकाळी काढली. हा रस्ता महिन्यात करण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे. गेली २५ वर्षे महाद्वार रोड खराब आहे. ४ एप्रिलला श्री अंबाबाई देवीचा रथोत्सव आहे. याच मार्गावरून दरवर्षी हा रथोत्सव जातो. त्यामुळे सराफ व्यावसायिक व न्यू गुजरी मित्र मंडळाचे कार्यकर्त्यांनी संभवनाथ चौकात निदर्शने करीत महापालिकेचा निषेध केला. त्यामुळे आयुक्त पी. शिवशंकर, महापौर तृप्ती माळवी, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांच्यासह नगरसेवक तिथे आले. या रस्त्यासाठी ३५ लाख रुपयांची तरतूद करुन आजच निविदा काढण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर आंदोलन मागे घेतले. या आंदोलनाला नगरसेवक सत्यजित कदम, आर. डी. पाटील, सुभाष रामुगडे, राजू घोरपडे, नगरसेविका माधुरी नकाते, अरुणा टिपुगडे यांनी पाठिंबा दिला. दरम्यान, सायंकाळी महापालिकेने ३५ लाख रुपयांची निविदा काढली. आंदोलनात सराफ व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश गायकवाड, माजी नगरसेवक ईश्वर परमार, बाबा महाडिक, किरण नकाते, यांच्यासह संचालक, नागरिक यांचा सहभाग होता. (प्रतिनिधी)‘भाकप’तर्फे निदर्शनपानसरे यांच्या मारेकऱ्यांच्या अटकेची मागणीेकोल्हापूर : ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या मारेकऱ्यांना त्वरित अटक करण्यात यावी, या मागणीसाठी भाकपतर्फे कोल्हापुरातील बिंंदू चौक येथे सोमवारी तीव्र निदर्शने केली. यावेळी आरएसएस आणि सनातन संघटनांचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला. दाभोलकरांच्या हत्येनंतर पूर्वीच्या सरकारचा राजीनामा मागणारे आता झोपलेत काय, असा सवालही कार्यकर्त्यांनी केला. ‘आम्ही सारे पानसरे’, ‘आरएसएस चले जाव’, ‘सनातनी प्रवृत्तीचा धिक्कार’ ‘मुख्यमंत्री चले जाव’ अशा घोषणा देत कार्यकर्त्यांनी बिंंदू चौक परिसर दणाणून सोडला. पानसरे यांच्यावरील हल्ल्याला महिना होऊनही मारेकऱ्यांना पकडण्यास सरकार अपयशी ठरले आहे. सरकारच मारेकऱ्यांना पाठीशी घालत असल्याचा आरोपही कार्यकर्त्यांनी केला. अतुल दिघे म्हणाले, परिवर्तनवादी चळवळी पानसरेंचा खुन्याचा शोध लागेपर्यंत स्वस्थ बसणार नाहीत. पानसरेंचे मारेकरी सापडेपर्यंत सर्व स्तरांतून अथक प्रयत्न करणे गरजेचे आहे. व्यंकाप्पा भोसले यांनी कष्टकऱ्यांसाठी आयुष्य वेचलेल्या पानसरे यांच्यावरील हल्ला हा गोरगरिबांवरील हल्ला आहे, असे मत व्यक्त केले. पोलीस व भाजप सरकारचा निषेध नोंदविणारे फलक लेखन बिंंदू चौकात करण्यात आले. आरएसएस, सनातनी संघटनांची चौकशी करा, शासन कोडगे, निर्लज्ज आहे, असा निषेध नोंदविण्यात आला. यावेळी डॉ. टी. एस. पाटील, सुरेश शिपूरकर, अतुल दिघे, नामदेव गावडे, बजरंग शेलार, रघुनाथ कांबळे, मिलिंद यादव, शिवाजी शिंदे, सतीशचंद्र कांबळे, सुभाष वाणी, सुभाष देसाई, एस. बी. पाटील, गिरीश फोंडे, प्रशांत अंबी, रवी पाटील, बाळासाहेब पवार, प्रशांत पिसे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते. (प्रतिनिधी)राज्य शेती महामंडळ कामगारांचा मोर्चाकोल्हापूर : महाराष्ट्र राज्य शेती महामंडळ पूर्ववत पूर्ण क्षमतेने चालवा, यासह अन्य मागण्यांबाबत राज्य शेती महामंडळ कामगार लढा कृती समितीच्यावतीने सोमवारी आंबेवाडी (ता. करवीर) येथील राज्य शेती महामंडळ ऊस मळा कार्यालयावर दुपारी मोर्चा काढला. हा मोर्चा आंबेवाडी येथील चौकापासून काढण्यात आला होता.गेली २५ वर्षे संयुक्त शेतीच्या नावे दिलेली जमीन आजमितीस स्वत: न कसता इतरांना उत्पादनाच्या भागीदारी तत्त्वावर दिलेली आहे. शेती महामंडळाकडे सुमारे १७५ पर्यंत कायम कामगार असायचे व सुमारे सव्वापाचशेपर्यंत रोजंदारी कामगार असायचे; पण औषधालाही कामगार शिल्लक ठेवलेला नाही. त्यांचा रोजगार बुडाला, ते बेकार झाले. शेती महामंडळाकडे कायम व रोजंदारी कामगारांची योग्य भरती करून त्यांना रोजगार व जगण्याचे साधन द्यावे. संयुक्त शेतीच्या नावाखाली दिलेली जमीन उत्पादनाच्या भागीदारी तत्त्वावर दिल्याने, प्रत्यक्षात संयुक्त शेती नाहीच. ही शेती कामगारांना कसण्यास द्यावी, आदी मागण्यांचे निवेदन शेती महामंडळ कार्यालयाचे लिपिक युवराज निकम यांना दिले. मोर्चामध्ये सुभाष गुरव, गुडनशहा मकानदार, पार्वती पोवार, मीना कांबळे, हमीन मुल्ला, द्वारकाबाई लोहार, पांडुरंग चव्हाण, गुलाब मुल्ला आदींची भाषणे झाली. मोर्चात तुळशीदास उलपे, मारुती कुर्इंगडे, तातोबा पाटील, इंदुबाई शिपेकर, शंकर सुतार, मालू झपाटे यांच्यासह कामगार सहभागी होते.(प्रतिनिधी)
कोल्हापूरात मोर्चा, ठिय्या, धरणे अन् निदर्शन
By admin | Updated: March 17, 2015 00:06 IST