शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : ‘महात्मा फुले’मधील आणखी पाच रुग्णालये रडारवर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2018 11:24 IST

राज्य शासनाच्या महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेत समाविष्ट असलेली कोल्हापूर जिल्ह्यातील आणखी पाच रुग्णालये रडारवर आहेत. या रुग्णालयांची कागदपत्रांची तपासणी सुरू आहे. त्याचबरोबर निलंबित केलेल्या रुग्णालयातील या योजनेतील रुग्ण अन्य रुग्णालयांत हलविण्याचे काम सुरू झाले आहे. निलंबित केलेल्या रुग्णालयांची इत्यंभूत माहिती उद्या, बुधवारी किंवा गुरुवारी (दि. १८) प्रसारमाध्यमांना पत्रकार परिषद घेऊन देणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

ठळक मुद्दे ‘महात्मा फुले’मधील आणखी पाच रुग्णालये रडारवर !निलंबित रुग्णालयांतील रुग्ण हलविले : दोन पथके जिल्ह्यात कार्यरत

कोल्हापूर : राज्य शासनाच्या महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेत समाविष्ट असलेली कोल्हापूर जिल्ह्यातील आणखी पाच रुग्णालये रडारवर आहेत. या रुग्णालयांची कागदपत्रांची तपासणी सुरू आहे. त्याचबरोबर निलंबित केलेल्या रुग्णालयातील या योजनेतील रुग्ण अन्य रुग्णालयांत हलविण्याचे काम सुरू झाले आहे. निलंबित केलेल्या रुग्णालयांची इत्यंभूत माहिती उद्या, बुधवारी किंवा गुरुवारी (दि. १८) प्रसारमाध्यमांना पत्रकार परिषद घेऊन देणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.कोल्हापूर जिल्ह्यातील ३४ रुग्णालयांचा या योजनेत समावेश आहे. तीन दिवसांपूर्वी या योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधाकर शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पथकाने जिल्ह्यात कारवाईस सुरुवात केली. ३४ रुग्णालयांवर छापे टाकून एक रुग्णालयास निलंबित केले. या छाप्यामुळे वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली.

अचानक झालेल्या या कारवाईमुळे अनेक डॉक्टरांचे धाबे दणाणले. सध्या दोन पथके जिल्ह्यात कार्यरत आहेत. या पथकाला पाच रुग्णालये संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहेत. त्यांनी या रुग्णालयातील कागदपत्रांची तपासणी सुरू ठेवली आहे. त्यामुळे ही पाच रुग्णालये पथकाच्या रडारवर असल्याचे सांगण्यात आले.त्याचबरोबर जे रुग्णालय निलंबित झाले आणि होणार आहेत, त्या रुग्णालयांतील या योजनेत उपचार घेत असलेल्या रुग्णांना समाविष्ट असलेल्या अन्य रुग्णालयांत हलविण्याचे काम सुरू झाले आहे. दरम्यान, या कारवाईचे सर्वसामान्य नागरिकांमधून स्वागत होत आहे.

‘आरोग्य मित्र’ अडचणीत...रुग्णालयाबरोबर रुग्णांची कागदपत्रे घेणारे ‘आरोग्य मित्र’ अडचणीत आले आहेत. या ‘आरोग्य मित्रां’ची चौकशी करण्यात आली असून पथकाने त्यांच्या कागदपत्रांची तपासणी सुरू केली आहे. ३४ रुग्णालयांत ‘आरोग्य मित्र’ कार्यरत आहेत. या कारवाईमुळे चार ते पाच ‘आरोग्य मित्र’ अडचणीत आले असल्याचे सांगण्यात आले.निलंबित रुग्णालयांची यादी वेबसाईटवर?कोल्हापूर जिल्ह्यात जी रुग्णालये निलंबित होणार आहेत. या रुग्णालयांच्या माहितीची यादी लवकरच महात्मा फुले जनआरोग्य योजनेच्या वेबसाईटवर टाकण्यात येणार असल्याचे वरिष्ठ सूत्रांनी सांगितले. 

टॅग्स :hospitalहॉस्पिटलkolhapurकोल्हापूर