शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : महापालिका रुग्णालये सुसज्ज करा, डेंग्यू, स्वाईन फ्लूच्या पार्श्वभूमीवर आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2018 18:57 IST

कोल्हापूर शहरात डेंग्यू आणि स्वाईन फ्लू या साथींच्या रोगात नागरिकांचे जीव जात असून, महापालिका प्रशासन गप्प आहे, अशा रोगांसाठी ‘सीपीआर’ हा एकमेव दवाखाना असल्याने शहर व जिल्ह्यासह आसपासच्या परिसरातील रुग्णांचा भार ‘सीपीआर’ रुग्णालयावर पडत आहे; त्यामुळे शहरातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी महानगरपालिकेने घ्यावी. याकरिता महापालिकेचे दवाखाने व वॉर्ड दवाखाने यंत्रसामुग्री, कर्मचारी व औषधांनी सुसज्ज करावेत, अशी सूचना आमदार राजेश क्षीरसागर यांनी महापालिका प्रशासनास केली.

ठळक मुद्देकोल्हापूर महापालिका रुग्णालये सुसज्ज कराडेंग्यू, स्वाईन फ्लूच्या पार्श्वभूमीवर आवाहन

कोल्हापूर : शहरात डेंग्यू आणि स्वाईन फ्लू या साथींच्या रोगात नागरिकांचे जीव जात असून, महापालिका प्रशासन गप्प आहे, अशा रोगांसाठी ‘सीपीआर’ हा एकमेव दवाखाना असल्याने शहर व जिल्ह्यासह आसपासच्या परिसरातील रुग्णांचा भार ‘सीपीआर’ रुग्णालयावर पडत आहे; त्यामुळे शहरातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी महानगरपालिकेने घ्यावी. याकरिता महापालिकेचे दवाखाने व वॉर्ड दवाखाने यंत्रसामुग्री, कर्मचारी व औषधांनी सुसज्ज करावेत, अशी सूचना आमदार राजेश क्षीरसागर यांनी महापालिका प्रशासनास केली.शहरातील डेंग्यू आणि स्वाईन फ्लू रोगाची साथ आटोक्यात आणण्यासाठी आमदार क्षीरसागर यांनी मंगळवारी महापालिकेत आयुक्त डॉ. अभिजित चौधरी, उपायुक्त मंगेश शिंदे, आरोग्याधिकारी डॉ. दिलीप पाटील, मुख्य आरोग्य निरीक्षक डॉ. विजय पाटील यांच्यासह आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यावेळी या सूचना दिल्या.

बारा दिवसांपूर्वी डेंग्यूने उदयोन्मुख युवा फुटबॉल खेळाडूचा, तर स्वाईन फ्लूने वृद्ध डॉक्टरांचा बळी घेतला. एकीकडे साथीच्या रोगांनी शहरात थैमान घातले असताना प्रशासन आपली जबाबदारी झटकून त्याकडे दुर्लक्ष करीत आहे. मुंबई, पुणे शहरात तेथील महापालिका प्रशासनाने स्थानिक दवाखाने सुसज्ज ठेवले आहेत. त्याच पद्धतीने महानगरपालिकेचे पंचगंगा, सावित्रीबाई फुले, आयसोलेशन दवाखाने सुसज्ज ठेवावेत, असे आमदार क्षीरसागर यांनी सांगितले.दवाखान्यामध्ये कायमस्वरूपी डॉक्टर उपलब्ध ठेवण्याच्या दृष्टीने शासनाकडे पदे भरतीची मागणी करावी, त्याचा पाठपुरावा स्वत: मी मंत्रालय स्तरावर करेन. त्याचबरोबर शहरातील सेवाभावी डॉक्टरांना या रुग्णालयात सेवा देण्याबाबत महापालिकेने आवाहन करावे, अशा सूचनाही त्यांनी मांडल्या. आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी आलेल्या सूचनांचा आढावा घेऊन लवकरात लवकर त्यावर उपाययोजना करण्याच्या सूचना संबंधित अधिकाºयांना दिल्या.बैठकीस परिवहन सभापती राहुल चव्हाण, माजी उपमहापौर रविकिरण इंगवले, पद्माकर कापसे, उदय पोवार, दीपक गौड, जयवंत हारुगले, रमेश खाडे, धनाजी दळवी, तुकाराम साळोखे, अजित गायकवाड, अनिल पाटील, रघुनाथ टिपुगडे, राजू पाटील, राहुल चव्हाण, विशाल देवकुळे, अश्विन शेळके, निलेश हंकारे, मंदार तपकिरे, गजानन भुर्के, राजू काझी, पियुष चव्हाण, अविनाश कामते, ओंकार परमणे, कपील सरनाईक, आदी पदाधिकारी उपस्थित होते.

 

 

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाkolhapurकोल्हापूर