शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : बटाटा झाला दुप्पट; डाळिंब, बोरांची आवक वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2018 11:50 IST

बटाटा आणि भाज्यांची आवक कमी झाल्याने त्याचा परिणाम दरांवर झाला आहे. बटाटा दुपटीने वाढला असून, घाऊक बाजारात तो १० किलोंना १४० रुपये, तर किरकोळ बाजारात २०० रुपये असा होता. दुसरीकडे, डाळिंब, बोरांची आवक वाढली आहे; तर हरभरा, अननस रविवारच्या आठवडी बाजारात दाखल झाला आहे.

ठळक मुद्दे\बटाटा झाला दुप्पट; डाळिंब, बोरांची आवक वाढलीहरभरा, अननस बाजारात : भोगीसाठी राळ्याच्या तांदळाला मागणी

कोल्हापूर : बटाटा आणि भाज्यांची आवक कमी झाल्याने त्याचा परिणाम दरांवर झाला आहे. बटाटा दुपटीने वाढला असून, घाऊक बाजारात तो १० किलोंना १४० रुपये, तर किरकोळ बाजारात २०० रुपये असा होता. दुसरीकडे, डाळिंब, बोरांची आवक वाढली आहे; तर हरभरा, अननस रविवारच्या आठवडी बाजारात दाखल झाला आहे.

हरभऱ्याचा डहाळा १०० रुपयांना, तर अननस ३० ते ४० रुपयांच्या घरात होता. ‘भोगी’साठी लागणारे राळ्याचे तांदूळ बाजारात आले असून, यंदा पीक कमी आल्याने परिणामी दर वाढला आहे. प्रतिकिलो तो ८० पासून १०० रुपयांपर्यंत आहे. गतवर्षी तो ६० रुपये होता. त्याला आता मागणी वाढली आहे.सौंदत्ती यात्रा झाल्यामुळे आठवडी बाजारात ग्राहकांची फारशी गर्दी दिसत नव्हती. गेल्या आठवड्यापेक्षा या आठवड्यात काही भाज्यांचे दर वाढले आहेत. कांदा प्रतिकिलो एक रुपयाने कमी झाला असून, तो आठ रुपयांच्या घरात आला आहे. तसेच लसणाच्या दरात घसरण झाली आहे.

लसूण प्रतिकिला १२ रुपये होता. तो गेल्या आठवड्यात १५ रुपये होता. वांगी, ओली मिरची, ढबू मिरची, भेंडी, दोडका, गवार, फ्लॉवर, कोथिंबिरीच्या पेंढीच्या दरात वाढ झाली आहे. कोथिंबिरीच्या पेंढीमागे चार रुपये वाढले आहेत. मात्र मेथी, पालक, पोकळा, शेपू, कोबी, टोमॅटो, घेवड्याचे दर ‘जैसे थे’ होते.याचबरोबर डाळिंब व बोरांची आवक वाढली आहे. घाऊक बाजारात डाळिंब प्रतिकिलो ३३, तर बोरे १३ रुपये झाली आहेत. मोसंबी, माल्टा यांचे दर स्थिर आहेत. गुळाच्या रव्यांचा दर स्थिर होता. एक किलोच्या बॉक्सचा ३५०० रुपये दर होता. दरम्यान, ओल्या वाटाण्याची आवक वाढल्याने त्याचा दरावर परिणाम झाला आहे. घाऊक बाजारात ओल्या वाटाण्याचा दर २२५ रुपये असा होता. तो गेल्या आठवड्यात ३१० रुपये असा होता.

गहू दोन; तांदूळ चारने वाढलाबासमतीसह विविध प्रकारच्या तांदळाच्या दरात प्रतिकिलो चार रुपयांनी वाढ झाली आहे. बासमती ४० रुपयांवरून ४४ रुपये, ४८ वरून ५२ रुपये; तर गव्हाच्या दरात दोन रुपयांनी वाढ झाली. बन्सी गहू २८ रुपये असा झाला. सरकी, शेंगतेल, सुक्या खोबऱ्याचे दर स्थिर आहेत.बाजरी, तीळ वाढलेबाजरी २४ रुपयांवरून २८ रुपये; तर तिळाच्या दरात तब्बल ६० रुपयांनी वाढ होऊन १८० रुपये प्रतिकिलो झाले आहे. तसेच ड्रायफुटच्या दरात कोणतीही वाढ झालेली नाही. 

 

टॅग्स :Marketबाजारkolhapurकोल्हापूर