शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची मोठी घोषणा...! 'या' देशांना दिली जाणार टॅरिफ सूट, नवा कार्यकारी आदेश जारी
2
पाकिस्तानात क्रिकेट सामन्यादरम्यानच मैदानात बॉम्बस्फोट; एकाचा मृत्यू, अनेक जखमी
3
भारत-रशिया-चीन एकत्र बघून NATOचं टेन्शन वाढलं? युक्रेन युद्धासंदर्भात 'या' नेत्याचं मोठं विधान!
4
आता रशिया-युक्रेन युद्ध थांबणार? पंतप्रधान मोदींची फ्रान्सच्या अध्यक्षांसोबत चर्चा; मॅक्रॉन म्हणाले...!
5
ओबीसींचा महामोर्चा काढणार, दोन पातळ्यांवर लढणार; काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा निर्धार
6
विसर्जनासाठी गेलेला 'गणेश' गिरणा पात्रात वाहून गेला, आई-वडिलांच्या डोळ्यासमोरच तरुण मुलगा बुडाला... 
7
गुजरातमधील पंचमहल यथे मोठा अपघात; पावागडमध्ये रोपवे कोसळला, 6 जणांचा मृत्यू
8
भाईंदरमध्ये गणेश मंडळाच्या कार्यकर्त्याचा शॉक लागून मृत्यू 
9
“PM मोदींच्या नेतृत्वाखालील सक्षम, नवीन भारत आपले परराष्ट्र धोरण स्वतः ठरवतो”: CM फडणवीस
10
एकनाथ शिंदे यांनी घेतली शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची भेट; म्हणाले, “अभिमानास्पद...”
11
गोपाळ शेट्टींसह मेहता, गुप्ता, मिश्रा अन् शर्मा यांच्यावर मुंबई भाजपानं दिली मोठी जबाबदारी
12
फक्त ३ वर्षांत दिला ५३२% परतावा, आता कंपनीला मिळाली ₹३,००,००,००० ची ऑरडर; ₹१०० पेक्षाही स्वस्त आहे शेअर!
13
Asia Cup Record : सचिन तेंडुलकर भारताचा 'नंबर वन ऑलराउंडर'; जयसूर्याची तर गोष्टच न्यारी
14
अमेरिका निघाली होती रशियाला पंगू बनवायला, आता स्वतःवरच आली अंडी खरेदीची वेळ! ३२ वर्षांत पहिल्यांदाच...
15
CM फडणवीसांकडून ग्रीन सिग्नल मिळताच अजित पवार गटाला बसणार झटका?; भाजपा आमदार लागले कामाला
16
राज ठाकरेंना मिळणार खास मान...यंदाचा शिवसेनेचा 'दसरा मेळावा' ठाकरे बंधू गाजवणार?
17
जीएसटी कमी झाल्यानंतर, किती रुपयांवर येईल Maruti Baleno? किती रुपयांचा होईल फायदा? जाणून घ्या
18
जगातील सगळ्यात महागडी शाळा; वर्षाची फी तब्बल १,१३,७३,७८० रुपये! आहे तरी कुठे नक्की?
19
चंद्रग्रहण २०२५: तुमच्या राशीनुसार करा ‘हे’ दान, धनवान बनाल; कल्याण होईल, सुख-सुबत्ता लाभेल
20
"गणित जुळलं की...", अभिनेत्री ऋतुजा बागवे लग्नाबद्दल स्पष्टच बोलली

कुरुंदवाड वेटलिफ्टिंगमध्ये कोल्हापूरचा दबदबा

By admin | Updated: November 27, 2015 01:04 IST

शालेय राज्यस्तरीय स्पर्धा : कोल्हापूरला २०, तर नाशिकला ५ सुवर्णपदके; विजेत्यांची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड

कुरुंदवाड : येथील दत्त महाविद्यालयात शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालय यांच्यावतीने घेतलेल्या शालेय राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत शेवटच्या दिवशीही कोल्हापूर विभागच भारी ठरला. १७ व १९ वर्षांखालील ८ विभागांतून एकूण ३० वजनी गटांत या स्पर्धा झाल्या. त्यामध्ये तब्बल २० सुवर्णपदके मिळवीत या स्पर्धेतील आपला दबदबा कायम राखत कोल्हापूर विभाग वेटलिफ्टिंगमधील हीरो बनला आहे. त्यापाठोपाठ पाच सुवर्णपदके पटकावत नाशिक विभाग दुसऱ्या क्रमांकावर राहिला आहे. यजमान दत्त महाविद्यालयाने पाच सुवर्णपदके व संकेत सदलगे बेस्टलिफ्टर (उत्कृष्ट खेळाडू)चा मानकरी ठरला आहे. सुवर्णपदक विजेत्या खेळाडूंची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.विजेत्या स्पर्धकांना प्रमुख मान्यवरांच्या हस्ते पदक देऊन गौरविण्यात आले. यावेळी निवड समिती सदस्य बिभीषण पाटील, मधुराज सिहासेन, उज्ज्वला माने, कोल्हापूर विभागीय क्रीडा अधिकारी बाजीराव देसाई, प्राचार्य आप्पासाहेब माने, रावसाहेब पाटील, अजित पाटील, आदी प्रमुख उपस्थित होते.अखेरच्या दिवशी झालेल्या स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे, कंसात विभाग व उचललेले एकूण वजन - १९ वर्षांखालील मुले - ७७ किलो वजनी गट - प्रथम - संकेत सदलगे (कोल्हापूर, २५० किलो), द्वितीय - विलास लोंढे (पुणे, २०० किलो), तृतीय निमेश पांडे (मुंबई, १७२). ८५ किलो वजनी गट - मनोज मगदूम (कोल्हापूर, २१५), गणेश काळे (पुणे, १९६), अभिषेक मिश्रा (अमरावती, १९२). ९४ किलो वजनी गट - अनिकेत कुंभार (कोल्हापूर, १८९), विघ्नेश पंडित (मुंबई, १६१), मनोहर गुलाटी (पुणे, १४२). १०५ किलो गट - मोहम्मद महारूफ (अमरावती, १५३), गणेश कांबळे (लातूर, १३०), दीपक वाघ (नाशिक, ११५). १०५ किलोवरील - अर्जुन मळगे (कोल्हापूर, १७३), भावेश कोलकर (मुंबई, १६२), अमित भोसले (पुणे, १६२).१९ वर्षांखालील मुली - ५३ किलो गट - रूपाली हनगडी (क्रीडा प्रबोधिनी, १५०), रागिनी अहिरे (नाशिक, १०३), तनिष्का कोळी (कोल्हापूर, ८२). ५८ किलो वजनी गट - ऐश्वर्या कदम (कोल्हापूर, १५०), शिवानी मोरे (मुंबई, १३७), पूजा परदेशी (नाशिक, १००). ६३ किलो वजनी गट - श्रद्धा पोवार (कोल्हापूर, १४९), प्राजक्ता खालकर (नाशिक, १४८), सोनल शेलार (पुणे, ९२). ६९ किलो गट - मयूरी देवरे (कोल्हापूर, १५५), वृषाली पवार (पुणे, १००), पायल टुले (नागपूर, ६३). ७५ किलो वजनी गट - अनुजा सावंत (कोल्हापूर, १०६), श्रृती जाधव (पुणे, ९२). ७५ किलोवरील - अश्विनी मळगे (कोल्हापूर, १५५), समृद्धी झवर (अमरावती, १०१), ऐश्वर्या सोमनाथ (पुणे, ७०).तीन दिवस चाललेल्या या स्पर्धेत पंच म्हणून प्रदीप पाटील, विजय माळी, रवींद्र चव्हाण, बिहारीलाल दुबे, संतोष सिंहासने, प्रवीण व्यवहारे यांनी काम पाहिले. (वार्ताहर)चार गटांतून उत्कृष्ट खेळाडू (बेस्ट लिफ्टर) - मुली - रूपाली महादेव हनगडी (क्रीडा प्रबोधनी), संस्कृती जितेंद्र देवकर (कोल्हापूर). मुले - महेश दत्ता अस्वले (पुणे), संकेत कुमार सदलगे (कोल्हापूर).