शहरं
Join us  
Trending Stories
1
अयोध्येमध्ये सिलेंडरचा भीषण स्फोट, घर कोसळून ५ जणा्ंचा  मृत्यू, अनेक जण अडकल्याची भीती  
2
ओवेसींच्या सभेतून वारिस पठाण यांचं नितेश राणेंना आव्हान, म्हणाले, ‘दोन पायांवर येशील, पण…’ 
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या गळ्यात शांततेचं नोबेल, नेतन्याहू यांनी शेअर केला असा फोटो, म्हणाले…
4
"सामाजिक विषमता निर्माण करण्याला शरद पवार जबाबदार', मनोज जरांगेंच्या भेटीनंतर राधाकृष्ण विखेंचा आरोप 
5
आठव्या क्रमांकाच्या बॅटरनं वाचवलं; पण तोच डाव उलटा फिरला!.. अन् टीम इंडियासमोर आफ्रिकेनं मारली बाजी
6
'हो, ते प्रवासी विमान आम्ही पाडलं होतं', अनेक महिन्यांनंतर व्लादिमीर पुतीन यांची कबुली
7
मनात नसताना रोहित-विराट 'तो' निर्णय घेणार? मोठी माहिती आली समोर
8
CJI गवईंवर बूट फेकणाऱ्या वकिलाला शरद पवारांचे खासदार निलेश लंकेंनी दिल्लीत गाठले; त्यानंतर...
9
महिलेने रडत रडत केला फोन, पोलिसांना सांगितलं पतीचं गुपित, घराची झडती घेताच बसला धक्का 
10
क्रिकेटच्या मैदानात AI ची ‘बोलंदाजी’! मिताली राजनं पिच रिपोर्टसाठी घेतली गुगल ‘जेमिनी’ची मदत, अन्...
11
आता भारतातच मिळणार जागतिक दर्जाचे शिक्षण; ब्रिटनची 9 विद्यापीठे उघडणार कॅम्पस
12
UNSC मध्ये भारताला ब्रिटनचा पाठिंबा! मुक्त व्यापार करारावर शिक्कामोर्तब; खलिस्तानवाद्यांवर कारवाईची मागणी
13
रस्त्यावर बेशुद्ध अवस्थेत सापडली महिला; शुद्धीवर आल्यावर सांगितलं असं; ऐकून सगळेच चक्रावले!
14
शाब्बास रिचा! सेंच्युरी हुकली; पण 'नॉट रिचेबल' वाटणारा टप्पा गाठला अन् मोठा डावही साधला
15
रावळपिंडी चिकन टिक्का, बहावलपूर नान, तर..., हवाई दलाच्या मेन्यू कार्डमधून पाकिस्तानची खिल्ली
16
शुभमन गिलच्या कर्णधारपदावर सौरव गांगुलींचे मोठे विधान, म्हणाला...
17
वारंवार मागणी केल्याने डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल शांतता पुरस्कार मिळेल? शर्यतीत कोण? जाणून घ्या...
18
'आम्ही सगळेच स्तब्ध झालो होतो, पण आता...', बूट फेकण्याच्या घटनेवर CJI गवई स्पष्टच बोलले
19
रोहित पवारांच्या मातोश्रींकडून गुंड निलेश घायवळचे कौतुक; सचिन घायवळसोबतचेही फोटो आणले समोर
20
Crime: एकाच कुटुंबातील तिघांवर प्राणघातक हल्ला, ५०० सीसीटीव्हीच्या मदतीने हल्लेखोराला अटक

कोल्हापूर : सगळ्या गोष्टी परस्परच करणार का?, स्थायी समिती सभेत अधिकाऱ्यांना विचारला प्रश्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2018 16:28 IST

एखाद्या विकासकामांबाबत कन्सल्टंट नेमणे, निविदा काढणे अशा सगळ्या गोष्टी परस्परच करणार का? असा सवाल करीत स्थायी समितीच्या सभेत सदस्यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. कन्सल्टंटच्या म्हणण्याप्रमाणे निविदा काढण्याची पद्धतच चुकीची असल्याचा आक्षेप सदस्यांनी सभेत नोंदविला. सभेच्या अध्यक्षस्थानी सभापती आशिष ढवळे होते.

ठळक मुद्देकोल्हापूर : सगळ्या गोष्टी परस्परच करणार का?स्थायी समिती सभेत अधिकाऱ्यांना विचारला प्रश्न

कोल्हापूर : एखाद्या विकासकामांबाबत कन्सल्टंट नेमणे, निविदा काढणे अशा सगळ्या गोष्टी परस्परच करणार का? असा सवाल करीत स्थायी समितीच्या सभेत सदस्यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. कन्सल्टंटच्या म्हणण्याप्रमाणे निविदा काढण्याची पद्धतच चुकीची असल्याचा आक्षेप सदस्यांनी सभेत नोंदविला. सभेच्या अध्यक्षस्थानी सभापती आशिष ढवळे होते.शुक्रवारी दुपारी झालेल्या स्थायी समितीच्या सभेत झूम प्रकल्पावरील कचऱ्याच्या गंभीर प्रश्नावर चर्चा उपस्थित झाली. झूमवरील सर्व कचऱ्याने पेट घेतला असून, प्रशासन त्यावर कशा प्रकारे कॅपिंग करणार आहे, याची कल्पना कोणालाच नाही. कचरा उचलण्यासाठी १७ कोटी रुपये खर्च करण्याऐवजी महानगरपालिकेची यंत्रणा वापरून काम करावे, अशी सूचना यावेळी करण्यात आली. परस्पर कन्सल्टंट नेमून त्याच्या म्हणण्याप्रमाणे संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करून मग स्थायी समिती व महासभेसमोर काम आणता. कन्सल्टंट नेमण्यापूर्वी तसेच निविदा काढण्यापूर्वी सभागृहाला का माहिती देत नाही, अशी विचारणा सदस्यांनी केली.हा १७ कोटी रुपयांचा खर्च वाचवता आला असता. जर सगळ्या गोष्टी जर निविदेद्वारेच करणार असाल तर मग महापालिकेची यंत्रणा काय करणार, अशीही विचारणा सदस्यांनी केली. कन्सल्टंटच्या म्हणण्याप्रमाणे जर १७ कोटी खर्च अपेक्षित असेल तर तेच काम महापालिकेची यंत्रणा राबवून किती खर्चात होऊ शकते याची माहिती सदस्यांना द्या, अशी सूचना अफजल पीरजादे यांनी केली.ठेकेदारांच्या बिलासंबंधी सभेत चर्चा झाली. पाणीपुरवठा, सार्वजनिक बांधकाम तसेच इतर विभागांकडील तातडीची कामे ठेकेदाराक डून करवून घेतल्यानंतर त्यांची बिले देण्यास दोन ते तीन वर्षे लागतात. अशामुळे महापालिकेची बदनामी होऊन कोणी कामे करण्यास ठेकेदार येत नाही. ज्यांनी तातडीने कामे केली आहेत, त्यांची बिले दोन-तीन महिन्यांत अदा करावीत, अशी सूचना सभापती ढवळे यांनी केली.ई वॉर्डात दोन-तीन दिवस पाणीपुरवठा झालेला नाही. एका बिल्डिंगच्या कामावेळी जलवाहिनीला गळती लागली असेल तर संंबंधित बिल्डरवर कारवाई करावी, अशी मागणी दीपा मगदूम यांनी केली.मध्यवर्ती बसस्थानकावरून पुण्याला जाणाऱ्या खासगी गाड्यांचे पार्किंग गाडीअड्ड्यावर करण्यास संंबंधितांना भाग पाडावे. त्यामुळे वाहतुकीचा त्रास कमी होईल. शिवाय महापालिकेला पार्किंग शुल्क मिळेल, अशी सूचना सभापती ढवळे यांनी केली. यावेळी झालेल्या चर्चेत सविता घोरपडे, भाग्यश्री शेटके, आदींनी भाग घेतला.

 

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाkolhapurकोल्हापूर