शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : निर्णय होईपर्यंत आंदोलन थांबवायचे नाही: धनंजय महाडिक : कोतवाल आंदोलनाला पाठींबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2018 16:42 IST

निवडणुका जवळ आल्या आहेत. त्यामुळे सरकारला तुमची गरज असून जोपर्यंत मागण्यांबाबत निर्णय होत नाही तोपर्यंत आंदोलन थांबवायचे नाही. मी तुमच्या बरोबर आहे, अशा शब्दात खासदार धनंजय महाडिक यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरु असलेल्या कोतवाल आंदोलनाला पाठींबा व्यक्त केला.

ठळक मुद्देनिर्णय होईपर्यंत आंदोलन थांबवायचे नाही: महाडिक, कोतवाल आंदोलनाला पाठींबा मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन चर्चा करण्याची ग्वाही : धनंजय महाडिक

कोल्हापूर : निवडणुका जवळ आल्या आहेत. त्यामुळे सरकारला तुमची गरज असून जोपर्यंत मागण्यांबाबत निर्णय होत नाही तोपर्यंत आंदोलन थांबवायचे नाही. मी तुमच्या बरोबर आहे, अशा शब्दात खासदार धनंजय महाडिक यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरु असलेल्या कोतवाल आंदोलनाला पाठींबा व्यक्त केला. यासंदर्भात बुधवारी मुंबईत होणाऱ्या कॅबिनेटच्या बैठकी दरम्यान मुख्यमंत्री, महसूलमंत्र्यांची भेट घेऊन चर्चा करु अशी ग्वाहीही त्यांनी दिली.सरकारी सेवेत सामावून घेऊन चतुर्थश्रेणीचा दर्जा द्यावा, या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरूअसलेले कोतवालांचे धरणे आंदोलन मंगळवारी २०व्या दिवशीही सुरूराहिले.

मंगळवारी दुपारी बाराच्या सुमारास खासदार धनंजय महाडिक यांनी आंदोलनस्थळी भेट दिली. यावेळी नगरसेवक सत्यजित कदम, प्रशांत शेटे यांच्यासह कोतवाल राजेंद्र पुजारी, संदीप टिपुगडे, उमेश कांबळे आदी उपस्थित होते.खा. महाडिक म्हणाले, कोतवालांचा चतुर्श्र श्रेणीत समावेश समावेश करण्यासाठी गेल्या वीस दिवसांपासून आंदोलन सुरु आहे. त्यांच्या मगण्या सरकार लवकरच मंजूर करेल व हे आंदोलन संपेल असे आपल्याला वाटत होते.

आंदोलनादरम्यान आपण दिल्लीत होतो. काल आपण दिल्लीहून काल कोल्हापूरात परतल्यानंतरही हे आंदोलन सुरु असल्याचे समजले. त्यामुळे मंगळवारी आपण आंदोलनस्थळी येऊन त्यांना पाठींबा दिला आहे.

जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत कोेतवालांनी जागेवरुन उठू नये. कारण आता निवडणूका जवळ आल्या आहेत. सरकारलाही तुमची गरज आहे. त्यामुळे निर्णय होईपर्यंत आंदोलन थांबवू नका. तसेच आज, बुधवारी कॅबिनेटची बैठक असून यावेळी मुख्यमंत्री व महसूलमंत्र्यांची भेट घेऊन चर्चा करु याबाबत सकारात्मक निर्णय घेण्याची विनंती करणार आहे.‘आप’कडून जेवणगेल्या वीस दिवसांपासून आंदोलनाच्या ठिकाणी कोतवाल स्वत: जेवण करुन खात आहेत. परंतु मंगळवारी दुपारी आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी भेट देऊन कोतवालांना जेवण दिले. तसेच या आंदोलनाला पाठींबाही व्यक्त केला.आंदोलनस्थळी भजनआंदोलनस्थळी राधानगरीच्या कोतवालांनी मंगळवारी संकष्टीनिमित्त व सरकारला जाग येण्यासाठी टाळ मृदंगाच्या गजरात भजन सुरु केले. यामध्ये सर्व कोतवालही सहभागी झाले.

 

 

टॅग्स :Dhananjay Bhimrao Mahadikधनंजय भीमराव महाडिकkolhapurकोल्हापूर