शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : शेतकऱ्यांच्या नादाला लागू नका, गूळ उत्पादकांचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2018 17:16 IST

अनिश्चित दरामुळे शाहू महाराजांनी वसवलेली गूळाच्या बाजारपेठेला अगोदरच घरघर लागली आहे. त्यात भेसळीच्या नावाखाली वेठीस धरून ‘कोल्हापूरी गूळा’ची बदनामी सुरू आहे, शेतकऱ्यांच्या नादाला लागू नका, असा इशारा गूळ उत्पादकांनी अन्न-औषध प्रशासन विभागाला दिला.

ठळक मुद्देशेतकऱ्यांच्या नादाला लागू नका‘अन्न-औषध’ विभागाला गूळ उत्पादकांचा इशारा  अधिकाऱ्यांना धरले धारेवर कोल्हापूरी गूळ भेसळविरहीत

कोल्हापूर : अनिश्चित दरामुळे शाहू महाराजांनी वसवलेली गूळाच्या बाजारपेठेला अगोदरच घरघर लागली आहे. त्यात भेसळीच्या नावाखाली वेठीस धरून ‘कोल्हापूरी गूळा’ची बदनामी सुरू आहे, शेतकऱ्यांच्या नादाला लागू नका, असा इशारा गूळ उत्पादकांनी अन्न-औषध प्रशासन विभागाला दिला. ‘कोल्हापूरी गूळाची आतापर्यंत एकाही सॅँपलमध्ये भेसळ आढळली नसल्याची कबुली अन्न-औषधचे सहायक आयुक्त मोहन केंबळकर यांनी दिली.

अन्न-औषध प्रशासन विभागाने आठवड्यापुर्वी बाजार समितीत धाडी टाकून व्यापाऱ्यांना नोटीसा दिल्या होत्या, त्यामुळे सौदे अस्थिर होऊन दरात घसरण झाली. या पार्श्वभूमीवर शनिवारी केंबळकर यांच्या उपस्थितीत समितीमध्ये बैठक झाली. यामध्ये संतप्त शेतकऱ्यांनी केंबळकर यांना धारेवर धरल्याने गोंधळ उडाला.ऊसाच्या रसापासून तयार केलेला पदार्थ म्हणजे ‘गूळ’ अशी गूळाची व्याख्या सांगत केंबळकर म्हणाले, हायड्रॉस पावडरचे प्रमाण एक हजार लिटर ला ३५ ग्रॅम हवे, पण रंगासाठी पावडर भरमसाठ टाकली जाते. ऊसाच्या वाणातच गोडी कमी असल्याने साखर मिसळली जाते, ही भेसळ बेकायदेशीर आहे.

यावर हरकत घेत संजय पाटील (वडणगे), शिवाजी पाटील (कोपार्डे) म्हणाले, मग कशाचा वापर करायचा ते सांगा? गूळ खाऊन किती माणसे मेली? संत्र्याच्या तयार केलेली दारू पिऊन माणसे मरतात, मग संत्र्यावर बंदी का घालत नाही. तानाजी आंग्रे (वरणगे) म्हणाले, शालेय पोषण आहारात चटणी म्हणून मुले राख, लेंड्यांचा भात खातात त्यावेळी तुमचे खाते कोठे जाते? कायदा फक्त शेतकऱ्यांनाच का, उद्या समितीत गूळ घेऊन येतो, आडवून दाखवाच.गेले दोन वर्षात कोल्हापूरातील गूळाची एकाही सॅँपलमध्ये भेसळ आढळलेली नाही. त्यामुळे तुम्ही घाबरू नका, परवाना न घेतल्याने व्यापाऱ्यांना नोटीसा काढल्याचे केंबळकर यांनी सांगितले. भेसळ नाहीतर कारवाई कसली करता, जाणीवपुर्वक त्रास देणार असाल तर गप्प बसणार नाही, असा इशारा समितीचे संचालक विलास साठे यांनी दिला.

शेतकऱ्यांच्या भावना तीव्र आहेत, यापुढे समितीत पाय ठेवू नका, असे सभापती कृष्णात पाटील यांनी सुनावले. उपसभापती अमित कांबळे, सचिव मोहन सालपे, उपसचिव राजेंद्र मंडलिक, संचालक उपस्थित होते.

 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMarketबाजार