शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर :दिवाळीची लगबग सुरू, बाजारपेठेत साहित्याची मांडणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2018 13:52 IST

नवरात्रौत्सवाच्या धामधुमीतून काही दिवसांची उसंत घेतल्यानंतर आता सर्वांना दिवाळीचे वेध लागले आहेत. वर्षातील या सर्वांत मोठ्या सणानिमित्त बाजारपेठेत आकर्षक आकाशकंदील, पणत्या, कपडे, फराळाचे साहित्य अशा अनेकविध वस्तूंची आवक झाली आहे.

ठळक मुद्देदिवाळीची लगबग सुरू, बाजारपेठेत साहित्याची मांडणीबाजारपेठेत आकर्षक आकाशकंदील, पणत्या, कपडे, फराळाचे साहित्य

कोल्हापूर : नवरात्रौत्सवाच्या धामधुमीतून काही दिवसांची उसंत घेतल्यानंतर आता सर्वांना दिवाळीचे वेध लागले आहेत. वर्षातील या सर्वांत मोठ्या सणानिमित्त बाजारपेठेत आकर्षक आकाशकंदील, पणत्या, कपडे, फराळाचे साहित्य अशा अनेकविध वस्तूंची आवक झाली आहे.दिवाळीचा सण मोठा, नाही आनंदाला तोटा... असे म्हणतात; म्हणूनच हा सण जल्लोषात साजरा करण्यासाठी वर्षभर प्लॅनिंग केले जाते. नवरात्रौत्सव नुकताच संपल्याने चार दिवसांची उसंत घेतल्यानंतर आता घरोघरी दिवाळीच्या तयारीची लगबग सुरू झाली आहे.फराळ म्हणजे दिवाळीचा अविभाज्य घटक. हे पदार्थ बनविण्यासाठी महिलांचा आठवडा जातो; त्यामुळे दिवाळी खरेदीची सुरुवात धान्य व फराळाच्या साहित्याने केली जाते. हरभराडाळ, तांदूळ, दाळे, मैदा, साखर, ड्रायफ्रुट, तेल, चिवड्यासाठी विविध प्रकारचे चिरमुरे या साहित्याची खरेदी केली जात आहे. त्यामुळे लक्ष्मीपुरीसह किराणा व भुसार मालाच्या दुकानात ग्राहकांची गर्दी होत आहे.

भिशी, रिकरिंग, बोनसची भरदिवाळीसाठी अनेक महिला भिशी योजनेत पैसे गुंतवतात, नोकरदार रिकरिंगवर भर देतात; शिवाय सर्वच आस्थापनांमधील कर्मचाऱ्यांना बोनस दिला जातो. यंदा दिवाळी नोव्हेंबरच्या सुरुवातीलाच असल्याने भिशी, रिकरिंग आणि बोनसचे जास्तीचे पैसे हाती येत असल्याने दिवाळीला आर्थिक चणचण भासत नाही.

डिझायनर पणत्यांची क्रेझपूर्वी केवळ मातीपासून बनविलेल्या पणत्या दारात लावल्या जायच्या. आता त्याला सुरेख रंग, लेस, कुंदनसह आकर्षक डिझाईन केली जाते. ग्राहकांची आवड व आॅर्डरनुसार पणत्या बनवून दिल्या जातात. याशिवाय लक्ष्मीपूजनाच्या समोर, रांगोळीवर ठेवण्यासाठी मोठ्या आकाराचे दिवे लावले जातात. त्यामुळे महाद्वार रोड, कुंभार गल्ल्यांमध्ये मांडलेल्या या पणत्या लक्ष वेधून घेत आहेत.

कपड्यांची खरेदीऐन दिवाळीच्या तोंडावर कपडे खरेदीला गेले की गर्दीमुळे निवडीला वाव राहत नाही. काहीवेळा कपड्यांची निवड चुकते; त्यामुळे सणाच्या आधीच कपड्यांची खरेदी आटोपून घेतली जाते. मोठ्यांसह लहान मुलांसाठीही नावीन्यपूर्ण फॅशनचे कपडे बाजारात आले आहेत. या खरेदीसाठी महाद्वार रोड, ताराबाई रोड, भाऊसिंगजी रोड, राजारामपुरी, लुगडी ओळ, गांधीनगर या ठिकाणी दुपारनंतर ग्राहकांची गर्दी होत आहे. 

 

टॅग्स :Diwaliदिवाळीkolhapurकोल्हापूर