शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्मचाऱ्यांना पदोन्नतीसाठी नवी अट; डिजिटल कोर्स उत्तीर्ण होणे आवश्यक
2
रेल्वे इंजिन घसरल्याने हार्बर मार्गावर खोळंबा; पनवेलला जाणाऱ्या लाेकल साडेचार तास ठप्प
3
भारतीय तरुणांना नशेत बुडविण्याचे कारस्थान
4
मी मराठीतूनच शिकलो, मातृभाषेतून शिकल्याने विषयांची समज पक्की होते; सरन्यायाधीश भूषण गवई
5
छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा ‘सीए’त टॉपर; सीए फायनलचा निकाल जाहीर, मुंबईचा मानव शाह देशात तिसरा
6
ठाकरेंच्या एकतेमुळे मविआची एकता धोक्यात? काँग्रेसचा बदलला सूर; वेगळ्या चुलीची शक्यता
7
मतदारयाद्या पुनरावलोकनाच्या काही नियमांत सूट; बिहार निवडणूक; आता बीएलओंवर जबाबदारी
8
दोन ठाकरेंच्या एकत्र येण्याचे असे झाले प्लॅनिंग..!
9
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
10
"महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकवू पाहणाऱ्यांच्या पोटात दुखणारच"; विजयी मेळाव्यावरील टीकेला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर
11
ICAI CA Toppers 2025: महाराष्ट्राचा राजन काबरा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
12
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
13
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार
14
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
15
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
16
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
17
जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला
18
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
19
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
20
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा

कोल्हापूर जिल्ह्याला वादळी पावसाने झोडपले

By admin | Updated: May 6, 2015 00:41 IST

वाहनधारकांची तारंबळ : कसबा बावड्यात भींत कोसळून तिघे जखमी; झाडे पडली; घरांची कौले उडाली, वीज गेल्याने काही काळ जिल्हा अंधारात

कोल्हापूर : जिल्ह्यात मंगळवारी सायंकाळी वळीव पावसाने झोडपले. विजेच्या कडकडाट व वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने अचानक सुरुवात झाल्याने शेतकऱ्यांची तारंबळ उडाली. जिल्ह्यात अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली. तर घरांची कौले, पत्रे उडून गेल्याच्या घटना घडल्या. कोल्हापूर शहरानगजीकच्या कसबा बावड्यात घराची भींत पडल्याने तिघेजण जखमी झाले. तर याच परिसरात पारायण सप्ताह कार्यक्रमसाठी उभारण्यात आलेला मंडप भुईसपाट झाला. वादळी वाऱ्यामुळे वीज गेल्याने जिल्ह्याचा बहुतांशी भाग अंधारातच होता. शेतीसाठी हा पाऊस उपयुक्त असल्याचे मानले जाते. संपूर्ण जिल्ह्याला पावसाने झोडपले असले तरी इचलकरंजी परिसरात मात्र पावसाने हुलकावणी दिली.कसबा बावड्यात भिंत कोसळून तिघे जखमी, मंडप भुईसपाटकसबा बावडा : सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास आलेल्या मुसळधार पावसामुळे येथील आंबेडकरनगरातील विष्णू सुभाना कांबळे यांच्या घरावर भिंत कोसळली. यामध्ये तिघेजण जखमी झाले, तर कसबा बावडा पॅव्हेलियन मैदानावर ज्ञानेश्वरी पारायण सप्ताहानिमित्त उभारण्यात आलेला मंडप जोरदार वारे व पावसामुळे भुईसपाट झाला.सायंकाळी साडेसहा वाजता बावड्यात अचानक आकाश काळवंडून आले. पाठोपाठ जोरदार वाऱ्यासह मुसळधार पावसास सुरुवात झाली. यामुळे आंबेडकरनगर येथे भिंत कोसळली. अग्निशामक दलाने ताबडतोब घटनास्थळी धाव घेऊन ढिगारा हलविण्यास सुरुवात केली. यामध्ये विष्णू कांबळे यांची पत्नी उषा कांबळे (वय ४७), सून सुप्रिया कांबळे (२२), नातू सोहम कांबळे (२) हे तिघेजण जखमी झाले. त्यांना उपचारासाठी सीपीआरमध्ये हलविण्यात आले.कसबा बावडा वारकरी सांप्रदाय व ग्रामस्थांच्या वतीने येथील पॅव्हेलियन मैदानावर ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. दि. ६ ते १२ मे अखेर होणाऱ्या या कार्यक्रमासाठी सात हजार स्क्वेअर फुटाचा भव्य मंडप उभारण्यात आला होता, पण हा मंडप जोरदार वाऱ्यामुळे भुईसपाट झाला. यामध्ये मंडपाचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले. आता हा कार्यक्रम पॅव्हेलियन मैदानाजवळील हॉलमध्ये घेण्यात येणार आहे. याशिवाय दत्तमंदिर परिसरात बाळासाहेब गरड यांच्या घरावर झाड पडले. दुकानलाईनमधील अनेक दुकानात पावसाचे पाणी शिरले. व्यापाऱ्यांची त्रेधातिरपीट उडाली. गारगोटीत घरांची कौले उडालीगारगोटी : भुदरगड तालुक्यात ठिकठिकाणी वादळी वाऱ्यासह प्रचंड मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने काही घराची कौले उडून जाऊन प्रचंड नुकसान झाले आहे. सायंकाळी अचानकपणे सुरू झालेल्या पावसाने जनजीवन विस्कळीत झाले.सायंकाळी वीज गायब झाल्याने अंधारातूनच शेतकरी, दुकानदार, बाजारला गेलेल्या मंडळींनी आपले घर गाठले. विजांच्या कडकडाडात पावसाने जोर धरला होता. मुसळधार पावसाच्या पाण्याने गावातील गटारी भरून वाहत होत्या.जयसिंगपूरला पावसाने झोडपलेजयसिंगपूरसह परिसरात मंगळवारी सायंकाळी वळीव पावसाने झोडपले. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. गेल्या दोन दिवसांपासून हवेत प्रचंड उष्मा जाणवत होता. दुपारनंतर ढगाळ वातावरण झाले होते. सायंकाळी सातच्या सुमारास वादळी वाऱ्यासह विजेच्या कडकडाटात वळीव पावसास सुरुवात झाली. पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला होता.