शहरं
Join us  
Trending Stories
1
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
2
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
3
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
4
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
5
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
6
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
7
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
8
मंगळ ग्रह गायब झाला तर पृथ्वीचं काय होणार? संशोधनातून धक्कादायक माहिती आली समोर  
9
"गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगा"; अधिवेशनात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
10
विरोधी पक्षनेतेपदाबाबत उद्धव ठाकरे आक्रमक, सरकारची कोंडी करण्याची तयारी; स्पष्ट इशाराच दिला
11
“अधिवेशानाचे सत्ताधाऱ्यांना गांभीर्य नाही, ‘हम करे सो कायदा’ पद्धतीने…”: हर्षवर्धन सपकाळ
12
“संसदीय लोकशाहीत विविध पक्षांच्या संघटनेचे योगदान देखील महत्त्वाचे”: मंत्री चंद्रकांत पाटील
13
“बाबा आणि आत्याने आईला खूप मारलं'”; ढसाढसा रडत ४ वर्षांच्या लेकाचा धक्कादायक खुलासा
14
अक्षय खन्नाला आहेत दोन भाऊ, एक सख्खा अन् एक सावत्र, दोघांनीही बॉलिवूडमध्ये केलं काम
15
विराट कोहली, रोहित शर्माला कपिल देव यांचा अजब सल्ला, म्हणाले- "मला वाटतं की टीम इंडियात..."
16
कॅमेरा नसलेला 'आयफोन' बाजारात? खरेच असा फोन अस्तित्वात आहे का? ॲप्पलच बनविते...
17
या ठिकाणी अचानक पडले ७०० मोठे खड्डे, जमिनीत गाडला जातोय संपूर्ण परिसर, कारण काय?
18
“साधूसंत झाडावर राहणार का? एक दिवस लोक सरकारला ‘चले जाव’ म्हणतील”; अण्णा हजारे संतापले
19
मैत्रिणींचा सोनमला वाचवण्याचा प्रयत्न? राजा रघुवंशीच्या भावाचा खळबळजनक आरोप
20
टाटा-हिंडाल्कोसह 'या' शेअर्समध्ये बंपर तेजी! बाजारात सलग दुसऱ्या दिवशी गुंतवणूकदारांची चांदी
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयाचा मुक्काम हलला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2018 16:27 IST

गेली २० वर्षे स्टेशन रोडवरील ट्रेड सेंटर या भाड्याच्या इमारतीतून जिल्ह्याच्या कृषी विभागाचा संसार चालविणारे जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालय आता स्वमालकीच्या जागेत स्थलांतरित होत आहे.

ठळक मुद्देकोल्हापूर जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयाचा मुक्काम हललाकसबा बावडा येथील नवीन जागेत उद्या स्थलांतरतब्बल २० वर्षांनंतर स्वमालकीच्या इमारतीत

कोल्हापूर : गेली २० वर्षे स्टेशन रोडवरील ट्रेड सेंटर या भाड्याच्या इमारतीतून जिल्ह्याच्या कृषी विभागाचा संसार चालविणारे जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालय आता स्वमालकीच्या जागेत स्थलांतरित होत आहे.

कसबा बावडा येथील ‘आत्मा’ कार्यालयातील एका इमारतीची ५० लाख रुपये खर्चून डागडुजी करून झाली आहे. या नव्या जागेत उद्या, गुरुवारपासून जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालय सुरू होत आहे. या स्वमालकीच्या इमारतीत २० वर्षांनंतर पहिल्यांदाच कृषी विभागातील कर्मचारी मोकळा श्वास घेणार आहेत.स्टेशन रोडवरील ट्रेड सेंटर इमारतीतील तिसरा मजला. पायऱ्यांवरून चढउतार शरीराची परीक्षा पाहणारा. एवढे करून आत गेले तर समोर दिसणारे दृश्य बघितले, की कशाला आलो म्हणावे अशी परिस्थिती. तरीही फायलींच्या ढिगाºयाच्या आडोशाला बसून काम करणारे पन्नासभर अधिकारी, कर्मचारी.

पायाखाली कधी उंदीर येतील याचा काही नेम नाही. असे हे १९९८ पासूनचे चित्र आहे, जिल्हा अधिक्षक कृषी कार्यालयाचे. मृद्संधारण, वसुंधरा पाणलोट, जलयुक्त शिवार, यांत्रिकीकरण, ठिबक यांसह दरवर्षी कोट्यवधीच्या २०० हून अधिक कृषी योजना राबविणाऱ्या या कार्यालयाचे कामकाज मात्र खुराडेवजा कार्यालयातून होत होते.ट्रेड सेंटर ही खासगी इमारत आहे.

कोल्हापूर जिल्ह्याला जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयाची मंंजुरी मिळाल्यापासून याच इमारतीतील तिसऱ्या मजल्यावर ‘कृषी’चे कार्यालय सुरू आहे. मध्यंतरी उमेश पाटील हे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी असताना त्यांनी सर्वप्रथम या खुराडेवजा कार्यालयाला नवीन लुक देण्याचा प्रयत्न केला.

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांसह सर्व अधिकाऱ्यांसाठी त्यांनी स्वतंत्र केबिन्स करून घेतल्या. यामुळे कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी आणि येणाऱ्या-जाणाऱ्यांचा वावर थोडा सुखावह झाला; पण त्यानंतर काहीही दुरुस्ती वा सुधारणा न झाल्याने कार्यालयातील फाइलींचे ढीग वाढत गेले, उंदरांचा उच्छाद वाढला. टेबल-खुर्च्याही मोडकळीस आल्या.यावरून अधिकारी, कर्मचाऱ्यांनी दुरुस्तीसाठी वारंवार पत्रव्यवहार केले. दोन वर्षांपूर्वी तर ‘दुरुस्ती करा अथवा स्थलांतर करा,’ असा आग्रहच अधिकारी, कर्मचाऱ्यांनी धरला. त्यानंतर सदर बाजार येथील कृषी विभागाच्या जागेवर कार्यालय बांधण्याच्या हालचाली सुरू झाल्या; पण तोही प्रस्ताव मागे पडला.

अखेरपूर्वी कसबा बावडा येथील ‘आत्मा’च्या कार्यालयातच हे कार्यालय स्थलांतरित करावे, असा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला. त्यासाठी ‘डीपीडीसी’तून ५० लाख रुपये मंजूर केले गेले. सहा महिन्यांपूर्वी इमारत ताब्यात घेऊन तिची डागडुजी करून घेतली. आता ही इमारत सुसज्ज झाली आहे.२० वर्षांत एक कोटी रुपये भाड्यावर खर्चदरमहा ४५ हजार रुपये निव्वळ भाडे म्हणून भरावे लागत होते. गेल्या २० वर्षांत एक कोटी रुपयापेक्षा अधिक रक्कम फक्त भाड्यावर खर्च झाली आहे. एवढ्या रकमेत एखादे नवीन कार्यालय उभे राहिले असते; पण शासकीय पातळीवरच्या उदासीनतेमुळे आजअखेर या कार्यालयाने आपला आतापर्यंतचा संसार याच कार्यालयातून केला.

२०० हून अधिक योजनांचा भारजिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयात आस्थापना, लेखा, वसुंधरा पाणलोट, मृद्संधारण, फलोत्पादन, सांख्यिकी हे प्रमुख सहा विभाग आहेत. येथे जलयुक्त शिवार, ठिबक, कृषी यांत्रिकीकरण या योजनांचे काम मोठ्या प्रमाणावर चालते. येथे एकूण ४५ अधिकारी, कर्मचारी कार्यरत आहेत. त्यांपैकी १५ जण कंत्राटी आहेत. 

टॅग्स :agricultureशेतीkolhapurकोल्हापूर