शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर जिल्ह्यात ३१ नवीन स्वतंत्र महसुली गावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2018 00:47 IST

कोल्हापूर : जिल्ह्यात नवीन ३१ महसुली गावे निर्माण केली असून, या ठिकाणी नवीन तलाठी सजे करण्यात आले आहेत. महसूलविषयक कामे प्राधान्याने मार्गी लागावीत, तसेच खातेदारांना विहित मुदतीत सर्व प्रकारचे दाखले मिळावेत, यासाठी ही गावे तयार करण्यात आली आहेत, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी मंगळवारी दिली.महसुली गावाच्या निर्मितीमध्ये करवीर ...

कोल्हापूर : जिल्ह्यात नवीन ३१ महसुली गावे निर्माण केली असून, या ठिकाणी नवीन तलाठी सजे करण्यात आले आहेत. महसूलविषयक कामे प्राधान्याने मार्गी लागावीत, तसेच खातेदारांना विहित मुदतीत सर्व प्रकारचे दाखले मिळावेत, यासाठी ही गावे तयार करण्यात आली आहेत, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी मंगळवारी दिली.महसुली गावाच्या निर्मितीमध्ये करवीर तालुक्यात शाहू मिल परिसर, ताराबाई पार्क, कसबा बावडा पूर्व, उचगाव दक्षिण, वरुणतीर्थ, शेंडा पार्क व संभाजीनगर येथे स्वतंत्र तलाठी सजा निर्माण करण्यात आला आहे. त्यामुळे या ठिकाणी आता स्वतंत्र तलाठी मिळणार असून त्यांना करवीर तलाठी चावडीत यावे लागणार नाही.नव्याने निर्माण केलेल्या सजापैकी १० गावांना यापूर्वीच महसुली गावाचा दर्जा देण्यात आला आहे. उर्वरित २१ पैकी २० गावांची प्रारूप अधिसूचना (गडहिंग्लज- १, शिरोळ- १, कागल- १, हातकणंगले- १०, करवीर -७ गावे) जिल्हाधिकारी कार्यालयासह संबंधित तहसीलदार कार्यालयाचे नोटीस बोर्ड, गावकामगार तलाठी यांच्या चावडी नोटीस बोर्डावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.अधिसूचनेमध्ये नव्याने घोषित महसुली गावांमध्ये अंतर्भूत गट नंबर - सर्व्हे नंबर याबाबतची सविस्तर माहिती नमूद करण्यात आली आहे. याबाबत संबंधित गावच्या नागरिकांना काही हरकती असतील तर त्यांनी १० सप्टेंबरपूर्वी लेखी स्वरूपात जिल्हाधिकारी कार्यालयातील कार्यासन येथे सादर कराव्यात, असे निवासी उपजिल्हाधिकारी शिंदे यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे कळविले आहे.महसुली गावे अशीबड्याची वाडी, वडरगे, (ता. गडहिंग्लज), संभाजीपूर (ता. शिरोळ), कागल पूर्व (ता. कागल), कलानगर गावभाग, शिवाजीनगर, आसरानगर, विवेकानंदनगर, पेठ भाग, जवाहरनगर, शिरोली एम.आय.डी.सी., समर्थनगर, मौजे इचलकरंजी इंडस्ट्रियल इस्टेट, शहापूर (ता. हातकणंगले) या ठिकाणी स्वतंत्र महसुली गावे निर्माण केली आहेत.शिरोलीपासून एमआयडीसी स्वतंत्रपुलाची शिरोली आणि एम.आय.डी.सी साठी स्वतंत्र गाव म्हणून दर्जा मिळाला आहे. त्यामुळे औद्योगिक वसाहतीतील महसुली कामांसाठी त्यांचा त्यांना स्वतंत्र तलाठी उपलब्ध होवू शकेल.