शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: 'केडीसीसी’ राज्यात नंबर वन आणू, पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचा विश्वास 

By राजाराम लोंढे | Updated: March 4, 2024 13:39 IST

१० हजार कोटी ठेवींचा इष्टांक 

कोल्हापूर : मागील आर्थिक वर्षात ठेवी व नफ्याचे दिलेले उदिष्ट्य पार केले, या आर्थिक वर्षात दहा हजार कोटी ठेवीचा इष्टांक पुर्ण करायचा आहे. त्यादृ्ष्टीने कर्मचाऱ्यांनी कामाला लागावे असे आवाहन करत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक (केडीसीसी) राज्यात नंबर वन आणू, असा विश्वास बँकेचे अध्यक्ष, पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला. मार्च २०२४ च्या पार्श्वभूमीवर व्यवसाय वृध्दी, ठेव इष्टांक व वसुली पुर्तता या कार्यशाळेत ते बोलत होते.मंत्री मुश्रीफ म्हणाले,  बँकेने ग्राहकांच्या तत्पर सेवेसाठी डिजिटल सेवा उपलब्ध करून दिल्या आहेत. अजूनही काही आवश्यक सुविधा असतील तर ग्राहकांसाठी  त्याची पुर्तता केली जाईल.व्यवसाय विकास कक्षाचे व्यवस्थापक एस. ए. वरुटे, शेती कर्जे विभागाचे व्यवस्थापक एस. डी. आडनाईक, व्यक्तिगत कर्जे विभागाचे व्यवस्थापक एस. के. बावधनकर, माहिती तंत्रज्ञान विभागाचे व्यवस्थापक जी. जे. पाटील, सीएमए सेलचे व्यवस्थापक अल्ताफ मुजावर यांनी विभागनिहाय आढावा सादर केला. लवाद विभागाचे व्यवस्थापक आर. जे. पाटील यांनी प्रास्ताविक केले. बँकेचे उपाध्यक्षआमदार राजू आवळे, राजेश पाटील, निवेदिता माने, भैय्या माने,  बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर, संतोष पाटील, रणजीतसिह पाटील, सुधीर देसाई, रणवीर गायकवाड, विजयसिंह माने, श्रृतिका काटकर, स्मिता गवळी आदी उपस्थित होते.  लेखापरीक्षण विभागाचे व्यवस्थापक एस. व्ही. लाड यांनी आभार मानले.

राज्यात ‘केडीसीसी’च अव्वलराज्यातील ३१ जिल्हा बँकांमध्ये ‘केडीसीसी’ बँकेचे स्थान फार वरचे आहे. प्रत्येक शाखा व्यवस्थापकाने ताळेबंद बांधताना आर्थिक निकषांची पुर्तता करावी, असे आवाहन राज्य सहकारी बँकेचे सरव्यवस्थापक व जिल्हा बँकेचे माजी मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ. ए. बी. माने यांनी केले.               एन. पी. ए. अजिबात नको..मागील एनपीएची वसुली मार्च पुर्वी झाली पाहिजे, गेल्या वर्षीपेक्षा कोणत्याही परिस्थितीत त्यात वाढ होता कामा नये, त्यादृष्टीने वसुलीची प्रक्रिया राबवा, अशा सूचना मंत्री मुश्रीफ यांनी कर्मचारी व अधिकाऱ्यांना दिल्या.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरbankबँकHasan Mushrifहसन मुश्रीफ