शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

kdcc bank result : पॅनेलमध्ये नको असणारेच झाले संचालक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2022 12:55 IST

ज्यांच्यामुळे बिनविरोधचे प्रयत्न संपले आणि निवडणूक लागली, जे पॅनेलमध्येही नको होते तेच संचालक म्हणून आले निवडून.

कोल्हापूर : संपुर्ण जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे निकाल हाती लागले आहेत. आतापर्यंत हाती आलेल्या निकालात अनेक दिग्गजांचा करेट कार्यक्रम झाला आहे. नागरी बँक, पतसंस्था गटात आमदार प्रकाश आवाडे, शाहूवाडीतुन संस्था गटातून बँकेचे विद्यमान संचालक सर्जेराव पाटील - पेरीडकर, तर गडहिंग्लज तालुक्यातील विकास सेवा संस्था गटातून बँकेचे विद्यमान उपाध्यक्ष विनायक ऊर्फ अप्पी पाटील यांचा प्रभाव झाला आहे.ज्यांच्यामुळे बिनविरोधचे प्रयत्न संपले आणि निवडणूक लागली, जे पॅनेलमध्येही नको होते तेच संचालक म्हणून निवडून आल्याची गंमतीशीर आणि तितकीच आत्मचिंतन करणारी घटना घडली आहे. बाबासाहेब पाटील आसुर्लेकर हे मुश्रीफ यांना सत्तारुढ पॅनेलमध्ये हवे होते, पण आमदार विनय कोरे यांच्या प्रखर विरोधामुळे त्यांना पॅनेलमधून बाहेर पडावे लागले. पॅनेल जाहीर झाल्याच्या दिवशीच आसुर्लेकर यांनी विरोधी शिवसेना पॅनेलमध्ये प्रवेश केला आणि इर्ष्येने निवडणूक जिंकून झालेल्या अपमानाचे उट्टे देखील काढले.अर्जून आबीटकर यांच्यासाठी प्रकाश आबीटकर यांचा आग्रह होता. पण के.पी.पाटील यांचा विरोध असल्याने मुश्रीफ यांनी आबीटकर यांच्या उमेदवारीसाठी विरोध केला. पण शेवटच्या दोन दिवसात मोठ्या जोडण्या लावत अर्जून आबीटकर यांनी आमदार प्रकाश आवाडे यांचा दारुण पराभव केला. या दोन्ही विजयामुळे पॅनेलमध्ये नेत्यांनी विरोध केलेल्यांनाच मतदारांनी बॅंकेत आणून बसवले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरbankबँकResult Dayपरिणाम दिवस