शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशन निवडणूक : गावडे-देसाई पॅनेलमध्ये चुरस वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2019 17:44 IST

कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनच्या निवडणुकीत मुदतीत कोणीही अर्ज माघार न घेतल्याने १५ जागांसाठी ३२ उमेदवार निवडणूक रिंगणात कायम राहिले.

ठळक मुद्दे गावडे-देसाई पॅनेलमध्ये चुरस वाढलीजिल्हा बार असोसिएशन निवडणूक : मंगळवारी मतदान, निकाल

कोल्हापूर : जिल्हा बार असोसिएशनच्या निवडणुकीत मुदतीत कोणीही अर्ज माघार न घेतल्याने १५ जागांसाठी ३२ उमेदवार निवडणूक रिंगणात कायम राहिले.

मंगळवारी (दि. ३०) सकाळी १० ते सायंकाळी पाच या वेळेत मतदान होणार असून, त्याच दिवशी सायंकाळी सहानंतर निकाल जाहीर केला जाणार आहे. सत्तारूढ गटाकडून रणजित गावडे आणि विरोधी प्रशांत देसाई या दोन पॅनेलमध्ये ही लढत होत आहे. मतदानासाठी अवघे तीनच दिवस राहिल्याने पॅनेलचे नेते जिल्ह्यातील मतदार पिंजून काढत आहेत.जिल्हा बार असोसिएशनच्या निवडणुकीत दोन्ही पॅनेलच्या पॅनेलचे एकूण ३० व दोन अपक्ष उमेदवारांत ही लढत होत आहे. मतदार हे संपूर्ण कोल्हापूर जिल्हाभर असल्यानेच पॅनेलचे नेते यांनी जिल्ह्यातील वकिलांच्या गाठीभेटी सुरू केल्या आहेत. दोन्हीही पॅनेलकडून प्रचाराने गती घेतली आहे. खंडपीठ हा मुद्दा या निवडणुकीत प्राधान्याने पुढे केला जात आहे.मंगळवारी (दि. ३०) सकाळी १० वाजता बार असोसिएशनच्या सभागृहात मतदानाला प्रारंभ होणार असून, सायंकाळी सहा वाजता मतमोजणीला प्रारंभ होऊन रात्री आठ वाजेपर्यंत निकाल लागण्याची शक्यता आहे. मुख्य निवडणूक अधिकारी अ‍ॅड. सुभाष पिसाळ म्हणून काम पाहत आहेत. 

 

टॅग्स :Courtन्यायालयkolhapurकोल्हापूर