शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर जिल्हा बॅँकेकडून ‘त्या’ घटनेची चौकशी सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2019 11:35 IST

कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या कसबा बीड शाखेंतर्गत वाटप केलेल्या किसान क्रेडिट कार्डचा गैरवापर करून, परस्पर पैसे हडप केल्याचे स्पष्ट झाले. सावरवाडी (ता. करवीर) येथील एका शेतकऱ्याने बॅँकेकडे तक्रार दिली असून, त्याची चौकशी बॅँकेच्या पातळीवर सुरू आहे. त्याचबरोबर क्रेडिट कार्ड वाटपात दोषी कोण आहेत, याचा शोधही घेतला जात आहे.

ठळक मुद्देकोल्हापूर जिल्हा बॅँकेकडून ‘त्या’ घटनेची चौकशी सुरूएटीएम कार्डद्वारे २२ हजार काढले : सावरवाडीतील शेतकऱ्याची तक्रार

कोल्हापूर : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या कसबा बीड शाखेंतर्गत वाटप केलेल्या किसान क्रेडिट कार्डचा गैरवापर करून, परस्पर पैसे हडप केल्याचे स्पष्ट झाले. सावरवाडी (ता. करवीर) येथील एका शेतकऱ्याने बॅँकेकडे तक्रार दिली असून, त्याची चौकशी बॅँकेच्या पातळीवर सुरू आहे. त्याचबरोबर क्रेडिट कार्ड वाटपात दोषी कोण आहेत, याचा शोधही घेतला जात आहे.जिल्हा बॅँकेने २०१६ पासून शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्डचे वाटप करण्यात आले. या कार्डच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी बॅँकेतून व्यवहार करावा, हा उद्देश होता. बॅँकेच्या शाखांच्या माध्यमातून या कार्डचे वाटप करण्यात आले.

कसबा बीड शाखेतून त्या परिसरातील शेतकऱ्यांना कार्ड वाटप केले होते; पण शुक्रवारी (दि. ७) सावरवाडी येथील एका शेतकºयाच्या खात्यातून रक्कम गायब झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी तत्काळ शाखेशी संपर्क साधल्यानंतर ए. टी. एम. कार्डद्वारे पैशाची उचल केल्याचे दिसले.हळदी (ता. करवीर) येथील एका बॅँकेच्या ए. टी. एम.मधून हे पैसे काढल्याचे निष्पन्न झाले आहे. संबंधित व्यक्तीने २२ हजार रुपये काढले. जिल्हा बॅँकेने या प्रकाराची चौकशी सुरू केली आहे. हळदी येथील एका राष्ट्रीयकृत व एका खासगी बॅँकेच्या ए. टी. एम. सेंटरमधील सीसीटीव्ही फुटेजची मागणी जिल्हा बॅँकेने केली आहे.

बॅँकेच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी हे फुटेज ताब्यात घेतल्याचे समजते. फुटेजवरून ती व्यक्ती कोण? याचा तपास सुरू आहे. त्याचबरोबर हे क्रेडिट कार्ड दुसऱ्या व्यक्तीच्या हातात गेलेच कसे? यामध्ये दोषी कोण? याची सखोल चौकशीही बॅँकेच्या पातळीवरून सुरू आहे.

दोन बॅँकांच्या एटीएम सेंटरचे सीसीटीव्ही फुटेज घेऊन त्यातून संबंधित व्यक्तीचा शोध घेतला जात आहे. लवकरच या प्रकाराचा छडा लावला जाईल.- डॉ. ए. बी. माने,मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा बॅँक 

 

टॅग्स :Banking Sectorबँकिंग क्षेत्रkolhapurकोल्हापूर