शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर जिल्ह्यात ७८३ नवे रुग्ण, सातजणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2020 18:34 IST

कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक कायम असून, गेल्या २४ तासांत ७८३ नवीन रुग्णांची नोंद झाली; तर सात रुग्णांचा मृत्यू झाला; त्यामुळे एकूण रुग्णांची संख्या आता २२ हजार ५०६ वर जाऊन पोहोचली. दरम्यान, राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी दुपारी येथील सीपीआर रुग्णालयास भेट देऊन तेथे रुग्णांवर होत असलेल्या उपचारांची माहिती घेतली.

ठळक मुद्देकोल्हापूर जिल्ह्यात ७८३ नवे रुग्ण, सातजणांचा मृत्यूदेवेंद्र फडणवीस यांची सीपीआर रुग्णालयास भेट

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक कायम असून, गेल्या २४ तासांत ७८३ नवीन रुग्णांची नोंद झाली; तर सात रुग्णांचा मृत्यू झाला; त्यामुळे एकूण रुग्णांची संख्या आता २२ हजार ५०६ वर जाऊन पोहोचली. दरम्यान, राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी दुपारी येथील सीपीआर रुग्णालयास भेट देऊन तेथे रुग्णांवर होत असलेल्या उपचारांची माहिती घेतली.कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा उद्रेक सुरू आहे. रोज मोठ्या संख्येने नवीन रुग्ण समोर येत आहेत. त्यामुळे दिवसेंदिवस यंत्रणेवर प्रचंड ताण पडत आहे. विशेषत: कोल्हापूर व इचलकरंजी या दोन प्रमुख शहरांसह ग्रामीण भागातील हातकणंगले, करवीर, शिरोळ, चंदगड, राधानगरी या तालुक्यांत कोरोनाचा संसर्ग वाढत चालला आहे.कोल्हापूर शहरात ६८२१, तर इचलकरंजी शहरात २७९७ रुग्णांची नोंद झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत मरणाऱ्यांची संख्याही ६६१ वर जाऊन पोहोचली आहे. रुग्ण बरे होण्याचा दर ६० टक्के, तर मृत्यू होण्याचा दर तीन टक्के आहे.शनिवारी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी येथील सीपीआर रुग्णालयास भेट देऊन तेथील रुग्णांवर केल्या जात असलेल्या उपचारांबाबत माहिती घेतली. यावेळी जिल्हाधिकारी दौलत देसाई, आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, अप्पर पोलीस अधीक्षक तिरूपती काकडे, अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत म्हस्के, देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे, महानगर अध्यक्ष राहुल चिकोडे उपस्थित होते.

फडणवीस यांनी पाऊण तासाच्या भेटीत कोविड कक्षात उपचार घेणाऱ्या रुग्णाशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधून उपचाराची माहिती करून घेतली. त्यानंतर त्यांनी रुग्णालयाच्या आवारातच उभारण्यात आलेल्या ऑक्सिजन टाकीची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी जुन्या अपघात विभागातही जाऊन पाहणी केली. डॉ. म्हस्के यांनी त्यांना रुग्णालयाची सर्व माहिती दिली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूर