शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

प्लॉट घेतला; मोजणीत लटकला सहा महिने..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2022 19:08 IST

जमीन, प्लॉट, शेती, घरांचे क्षेत्रफळ मोजणीचे काम करण्यासाठी हजारो रुपये भरूनही सहा, सहा महिने वेटिंग करावे लागत आहे. परिणामी अनेक ठिकाणी हद्दीवरूनची भांडणे होत आहेत.

भीमगोंडा देसाई कोल्हापूर : शहर आणि जिल्ह्यात ५ हजार ४६२ मोजणीची प्रकरणे भूमी अभिलेख विभागाकडे अनेक महिन्यांपासून प्रलंबित आहेत. कोरोनाचे सावट, मनुष्यबळाची कमतरता, ड्रोनव्दारे चाललेल्या सर्व्हेच्या कामांमुळे अति तातडीची मोजणीही वेळेत करता येत नाही, असा प्रशासनाचा दावा आहे.परिणामी पै पै जमा करून खरेदी केलेली जमीन, प्लॉट, शेती, घरांचे क्षेत्रफळ मोजणीचे काम करण्यासाठी हजारो रुपये भरूनही सहा, सहा महिने वेटिंग करावे लागत आहे. परिणामी अनेक ठिकाणी हद्दीवरूनची भांडणे होत आहेत.तालुकानिहाय असलेल्या भूमी अभिलेख प्रशासनाकडून मोजणीची प्रक्रिया पूर्ण केली जाते. या कार्यालयांकडे दाखलपैकी किती प्रकरणे निर्गत झाली, याचा आढावा दर महिन्याला जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेखांकडून घेतला जातो. शेतीच्या मोजणीचे काम उन्हाळ्यातच प्राधान्याने करावे लागते. पावसाळ्यात हे काम करता येत नाही.शिवाय सलग दोन वर्षे कोरोनाचे संकट सतावत आहे. दाखल प्रकरणाच्या तुलनेत मनुष्यबळाचीही कमतरता भासत आहे. यामुळे मोजणीच्या प्रलंबित प्रकरणांची संख्या मोठी आहे. या सर्व प्रकरणांचा निपटारा करावा, अशी मागणी होत आहे.

वर्षभरात ९ हजार प्रकरणे, ५ हजार प्रलंबित 

वर्षभरात सरासरी ९ हजारांवर मोजणीची प्रकरणे दाखल होतात. त्यापैकी निम्यांपेक्षा अधिक प्रकरणांची मोजणी वेळेत करणे प्रशासनाला शक्य होत नाही. यामुळे हद्द निश्चित करण्याची गरज असलेले शेतकरी भूमी अभिलेख कार्यालयात वारंवार हेलपाटे मारताना दिसतात.

सहा सहा महिने वेटिंग कशासाठी?अति तातडीच्या मोजणीलाही दोन महिने प्रतीक्षा करावी लागते. इतर प्रकारच्या मोजणीला सहा महिन्यांपेक्षा अधिक काळ थांबावे लागते. वेळेत मोजणी केली जात नाही. - विनायक कांबळे, शेतकरी

साध्या मोजणीसाठी अनेक वर्षे वेटिंगवर राहावे लागते. म्हणून तातडीच्या मोजणीसाठी जादा पैसे भरून घेतले जातात. तरीही वेळेत मोजणी केली जात नाही. - बाळू ऐवाळे, शेतकरी

जमीन मोजणीचे प्रकार  -  शुल्कसाधारण : १०००तातडीची : २०००अति तातडीची : ३०००अति अति तातडीची : १२ हजार

टॅग्स :kolhapurकोल्हापूर