शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर महापालिकेचा उपक्रम , ८५ दिव्यांगांना प्रत्येकी २५ हजार अनुदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2019 11:30 IST

कोल्हापूर महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने ८५ दिव्यांगांना व्यवसाय करण्याकरिता प्रत्येकी २५ हजार रुपयांचे अनुदान वाटप करण्यात आले. महापालिकेच्या विठ्ठल रामजी शिंदे चौकात महापौर सरिता मोरे व आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या हस्ते हा कार्यक्रम झाला.

ठळक मुद्देकोल्हापूर महापालिकेचा उपक्रम , ८५ दिव्यांगांना प्रत्येकी २५ हजार अनुदानउर्वरित अनुदान लवकरच : महापौर

कोल्हापूर : महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने ८५ दिव्यांगांना व्यवसाय करण्याकरिता प्रत्येकी २५ हजार रुपयांचे अनुदान वाटप करण्यात आले. महापालिकेच्या विठ्ठल रामजी शिंदे चौकात महापौर सरिता मोरे व आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या हस्ते हा कार्यक्रम झाला.महापालिका प्रशासनाने सन २०१५ मध्ये १७३ दिव्यांग बांधवांना केबिन वाटप केले होती. उर्वरित १४० दिव्यांगांचे अर्ज प्रलंबित होते. त्यांपैकी सहा दिव्यांग अपात्र झाले होते. त्यामुळे १२९ दिव्यांगांना केबिनऐवजी २५ हजार रुपयांची रक्कम द्यायचा निर्णय घेतला होता. याअंतर्गत मंगळवारी महापौर मोरे व आयुक्त कलशेट्टी यांच्या हस्ते ८५ दिव्यांगांना या अनुदानाचे वाटप करण्यात आले.महापालिकेने वार्षिक अंदाजपत्रकामध्ये शहरातील दिव्यांग बांधवांकरिता विशेष निधीची तरतूद केलेली असून, या तरतुदीअंतर्गत शहर परिसरातील पात्र लाभार्थ्यांना उपजीविका व उदरनिर्वाहासाठी यापूर्वी केबिनचे वाटप करण्यात आले आहे. याव्यतिरिक्त पात्र ठरलेल्या उर्वरित लाभार्थ्यांनाही लवकरच ‘आरटीजीएस’द्वारा अनुदान प्रदान करण्यात येईल, असे महापौर मोरे यांनी सांगितले. यावेळी आयुक्तांनीही मार्गदर्शन केले.प्रास्ताविकात आरोग्याधिकारी डॉ. दिलीप पाटील यांनी महापालिकेने दिव्यांगांना वेळोवेळी टप्प्याटप्प्याने मदत केली असल्याचे सांगितले. उपायुक्त मंगेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली एन.यू.एल.एम.च्या विजय तळेकर, निवास कोळी, रोहित सोनुले, स्वाती शहा, अंजली सौंदलगेकर यांनी दिव्यांगांचे सर्वेक्षण करून दिव्यांग बांधवांच्या कागदपत्रांची पडताळणी केली.यावेळी शिक्षण समितीचे सभापती अशोक जाधव, महिला व बालकल्याण सभापती अनुराधा खेडकर, नगरसेवक ईश्वर परमार, उपायुक्त मंगेश शिदे, आरोग्याधिकारी डॉ. दिलीप पाटील, नगरसचिव दिवाकर कारंडे उपस्थित होते.

 

 

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाkolhapurकोल्हापूर