शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : जबाबदारी लक्षात घेऊन पर्यावरणपूरक संशोधनावर भर द्यावा : ल्यू ख्रिस्तोफर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2018 15:55 IST

जीवन सुखकर करण्यासाठी आपण जे संशोधन करीत आलो आहोत; त्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत चालल्याचे चित्र आज निर्माण झाले आहे. असेच होत राहिले, तर मानवाचे अस्तित्व धोक्यात आल्याखेरीज राहणार नाही; त्यामुळे संशोधकांनीच आता ती जबाबदारी उचलून पर्यावरणपूरक संशोधनावर भर दिला पाहिजे, असे प्रतिपादन कॅनडाच्या लेकहेड विद्यापीठातील प्रा. ल्यू ख्रिस्तोफर यांनी  येथे केले.

ठळक मुद्देजबाबदारी लक्षात घेऊन पर्यावरणपूरक संशोधनावर भर द्यावा : ल्यू ख्रिस्तोफरशिवाजी विद्यापीठात आंतरराष्ट्रीय परिषदेचा प्रारंभ

कोल्हापूर : जीवन सुखकर करण्यासाठी आपण जे संशोधन करीत आलो आहोत; त्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत चालल्याचे चित्र आज निर्माण झाले आहे. असेच होत राहिले, तर मानवाचे अस्तित्व धोक्यात आल्याखेरीज राहणार नाही; त्यामुळे संशोधकांनीच आता ती जबाबदारी उचलून पर्यावरणपूरक संशोधनावर भर दिला पाहिजे, असे प्रतिपादन कॅनडाच्या लेकहेड विद्यापीठातील प्रा. ल्यू ख्रिस्तोफर यांनी  येथे केले.शिवाजी विद्यापीठातील ‘मटेरिअल्स व एन्व्हायर्नमेंट सायन्सेस’ या विषयावरील दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अ

ध्यक्षस्थानी प्र-कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के होते. विद्यापीठाचा वनस्पतीशास्त्र, संगणकशास्त्र आणि युसिक विभाग, श्री यशवंतराव पाटील विज्ञान महाविद्यालय (सोळांकूर), न्यू कॉलेज (कोल्हापूर) यांच्यातर्फे ही परिषद आयोजित करण्यात आली आहे.

प्रा. ख्रिस्तोफर म्हणाले, मानवी अस्तित्वासाठी पर्यावरणपूरक संशोधन करणे ही जागतिक संशोधन समुदायासमोरची प्राथमिकता असायला हवी. आंतरविद्याशाखीय, बहुशाखीय संशोधन होणे गरजेचे आहे. त्या दृष्टीने विज्ञानाच्या सर्वच शाखांमधील संशोधकांनी एकत्र येऊन विचारमंथन करणे आवश्यक आहे.या कार्यक्रमात प्रमुख उपस्थितांच्या हस्ते परिषदेच्या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी सोळांकूर महाविद्यालयाचे संस्थापक ए. वाय. पाटील, अध्यक्ष आर. वाय. पाटील, विद्यापीठाच्या विज्ञान व तंत्रज्ञान शाखेचे अधिष्ठाता डॉ. पी. एस. पाटील, वनस्पतीशास्त्र विभागप्रमुख डॉ. डी. के. गायकवाड, न्यू कॉलेजचे प्राचार्य डॉ. व्ही. एम. पाटील, सोळांकूरचे प्राचार्य डॉ. जी. जी. चौगुले, डॉ. आर. बी. पाटील, उपस्थित होते. डॉ. आर. के. कामत यांनी प्रास्ताविक केले. डॉ. मानसिंगराज निंबाळकर यांनी आभार मानले. या परिषदेत कॅनडासह आॅस्ट्रेलिया, बांगलादेश, नेपाळ, तैवान, श्रीलंका, सौदी अरेबिया, आदी देशांतील संशोधक सहभागी आहेत.धोरण ठरवून संशोधन व्हावेप्र-कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के म्हणाले, संशोधकांनी सुरक्षित, स्वस्त, वापरण्यास सुलभ अशा प्रकारचे तंत्रज्ञान, उत्पादने निर्माण करण्याचे धोरण ठरवून त्या दिशेने संशोधन करण्याची आज गरज आहे.

 

 

टॅग्स :Shivaji Universityशिवाजी विद्यापीठkolhapurकोल्हापूर