शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : वैचारिक साहित्य हे आधुनिकतेची निर्मिती : अशोक चौसाळकर; शहाजी महाविद्यालयातील चर्चासत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2018 15:45 IST

समाजाची सांस्कृतिक उंची वैचारिक साहित्यावर अवलंबून असते. वैचारिक साहित्य हे आधुनिकतेची निर्मिती आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत डॉ. अशोक चौसाळकर यांनी शुक्रवारी येथे केले. शिवाजी विद्यापीठ, श्री शहाजी छत्रपती महाविद्यालय, शिवाजी विद्यापीठ मराठी शिक्षक संघातर्फे आयोजित ‘आजच्या संदर्भात वैचारिक साहित्याची प्रस्तुतता' या विषयावरील राष्ट्रीय चर्चासत्राच्या उदघाटनप्रसंगी ते बोलत होते.

ठळक मुद्देवैचारिक साहित्य हे आधुनिकतेची निर्मिती : अशोक चौसाळकर शहाजी महाविद्यालयातील आजच्या संदर्भात वैचारिक साहित्याची प्रस्तुतता' विषयावर चर्चासत्र

कोल्हापूर : समाजाची सांस्कृतिक उंची वैचारिक साहित्यावर अवलंबून असते. वैचारिक साहित्य हे आधुनिकतेची निर्मिती आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत डॉ. अशोक चौसाळकर यांनी शुक्रवारी येथे केले.शिवाजी विद्यापीठ, श्री शहाजी छत्रपती महाविद्यालय, शिवाजी विद्यापीठ मराठी शिक्षक संघातर्फे आयोजित ‘आजच्या संदर्भात वैचारिक साहित्याची प्रस्तुतता' या विषयावरील राष्ट्रीय चर्चासत्राच्या उदघाटनप्रसंगी ते बोलत होते.शहाजी महाविद्यालयातील या कार्यक्रमास श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्थेचे मानद सचिव विजयराव बोंद्रे, शिवाजी विद्यापीठाच्या मराठी विभागातील प्रा.रणधीर शिंदे प्रमुख उपस्थित, तर अध्यक्षस्थानी प्रभारी प्राचार्य प्रा. एकनाथ काटकर होते.

डॉ. चौसाळकर म्हणाले, समाजाचे विविध प्रश्न सोडविण्याची ताकत वैचारिक साहित्यामध्ये आहे. आजच्या काळात वैचारिक साहित्य महत्वपूर्ण आहे. ते दुर्लक्षित होत आहे. डॉ. शिंदे म्हणाले, त्या-त्या काळाशी आणि सामाजिक प्रश्नांशी संबंधीत वैचारिक साहित्य असते. मराठी साहित्यातील कविता, गद्य, कादंबरी, नाटके यांच्याशी वैचारिक साहित्य संबंधीत होते.

आज व्हॉटस्अ‍ॅप, व्टिटर, फेसबुक आणि विविध माध्यमातून साहित्य निर्माण होत आहे. यास वैचारिक साहित्य म्हणावे का, हा प्रश्न पडतो. चांगल्या व निकोप समाज निमिर्तीसाठी वैचारिक साहित्याची आज नितांत गरज आहे.

प्रभारी प्राचार्य काटकर म्हणाले, समाजाच्या जडणघडणीत साहित्याची भूमिका महत्त्वपूर्ण आहे. या कार्यक्रमात प्रा. राजेखान शानेदिवाण यांनी प्रास्ताविक केले. दीपककुमार वळवी यांनी स्वागत केले. विजय देठे यांनी पाहुण्यांचा परिचय करुन दिला. पंढरीनाथ पाटील यांनी सूत्रसंचालन केले. महादेव जाधव यांनी आभार मानले.

विचारवंतांचे मार्गदर्शनउदघाटनानंतरच्या ‘आजच्या संदर्भात वैचारिक साहित्याची गरज’ या विषयावर डॉ. ज. रा. दाभोळे यांचे व्याख्यान झाले. अध्यक्षस्थानी प्रा. पांडुरंग पाटील होते. दुसऱ्या सत्रात डॉ. जयदेव डोळे यांचे ‘वृत्तपत्रातून गायब होत चाललेले वैचारिक गद्य' या विषयावर व्याख्यान झाले.

शिवाजी विद्यापीठाचे ओएसडी प्राचार्य डॉ. डी आर. मोरे अध्यक्षस्थानी होते. तिसऱ्या सत्रात किशोर बेडकिहाळ यांचे ‘समकालीन मराठी वैचारिक लेखनातील गारठा’ या विषयावर व्याख्यान झाले. अध्यक्षस्थानी डॉ. प्रकाश कुंभार होते. चौथ्या सत्रात साठहून अधिक संशोधकानी शोधनिबंधाचे वाचन केले. पाचव्या सत्रात डॉ.अरूण शिंदे यांचे व्याख्यान झाले.

 

टॅग्स :universityविद्यापीठkolhapurकोल्हापूर