शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : महागाईसह इंधन दरवाढीच्या निषेधार्थ बंदला संमिश्र प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2018 12:01 IST

पेट्रोल, डिझेल, गॅसदरवाढ, तसेच महागाईच्या निषेधार्थ भाजप सरकारविरोधात आज, सोमवारी पुकारलेल्या ‘भारत बंद’ला कोल्हापूरात संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे. या ‘बंद’ला डाव्या लोकशाही आघाडीने पाठिंबा दिला असून, त्यांनी शहरातील चौकाचौकात निदर्शने केली.

ठळक मुद्देमहागाईसह इंधन दरवाढीच्या निषेधार्थ बंदला संमिश्र प्रतिसादडाव्या पक्षांनी आणला चक्क उंट, घोषणाबाजीने केली निदर्शने

कोल्हापूर : पेट्रोल, डिझेल, गॅसदरवाढ, तसेच महागाईच्या निषेधार्थ भाजप सरकारविरोधात आज, सोमवारी पुकारलेल्या ‘भारत बंद’लाकोल्हापूरात संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे. या ‘बंद’ला डाव्या लोकशाही आघाडीने पाठिंबा दिला असून, त्यांनी शहरातील चौकाचौकात निदर्शने केली.पेट्रोल व डिझेलच्या किमती अनुक्रमे २११ व ४४३ टक्के वाढल्याने जीवनावश्यक वस्तंूच्या किमतीत प्रचंड वाढ झाली आहे. तसेच भाजप सरकारच्या काळात राफेल विमान घोटाळा झाला असून जीएसटी, नोटबंदीसारखे चुकीचे निर्णय घेऊन सरकारने जनतेची फसवणूक केली आहे. त्याच्या निषेधार्थ ‘भारत बंद’ पुकारण्यात आला आहे.कोल्हापूरात बंदच्या नियोजनासाठी सकाळी १0 वाजता कॉँग्रेस कमिटी कार्यालयात शहर व जिल्हा पदाधिकाऱ्यांनी सकाळी उपस्थिती लावली. यामध्ये जिल्हा, शहर, तालुका, युवक, महिला, एन. एस. यू. आय., सेवादल, ओबीसी ग्राहक सेलचे अध्यक्ष व पदाधिकाºयांचा समावेश होता.डाव्या पक्षांची निदर्शनेभाजप सरकारने केलेल्या इंधन दरवाढीच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या ‘बंद’ला डाव्या लोकशाही आघाडीने पाठिंबा दिला आहे. सकाळी नऊ वाजता बिंदू चौक येथे त्यांनी सरकारविरोधात निदर्शने केली.

यामध्ये ‘भाकप’चे नामदेव गावडे, सतीशचंद्र कांबळे, शेतकरी कामगार पक्षाचे बाबूराव कदम, संभाजी जगदाळे, ‘माकप’चे चंद्रकांत यादव, प्रा. सुभाष जाधव, जनता दलाचे शिवाजीराव परुळेकर, अ‍ॅड. अरुण सोनाळकर, वसंतराव पाटील, रवी जाधव, लाल निशाण पक्षाचे अतुल दिघे, आप्पा कुलकर्णी, आदींसह कार्यकर्ते सहभागी झाले होते.शाळा, महाविद्यालयांत अघोषित बंदबंदच्या पार्श्वभूमीवर शहरातील विविध शाळाही बंद राहिल्या. महाविद्यालयातही तुरळक हजेरी होती. शाळेत विद्यार्थ्यांना सोडणाऱ्या रिक्षावाल्या मामांनीच वाहतूक बंद ठेवल्याने शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या कमी होती.उंटावरचे शहाणे...बिंदू चौकात डाव्या लोकशाही आघाडीच्या कार्यकर्त्यांनी सरकारच्या निषेधार्थ निदर्शने केली. यावेळी आंदोलनात चक्क उंट आणून सरकारची उंटावरचे शहाणे अशी संभावना करत आगळ्यावेगळ्या पध्दतीने निषेध केला. आॅल इंडिया स्टुडंड फेडरेशनच्या कार्यकर्त्यांनी घोषणा देत प्रतिकात्मक पध्दतीने उंटावर बसलेल्या या शहाण्यांची बिंदू चौक ते दसरा चौक मार्गावर मिरवणुक काढून आंदोलनाकडे लक्ष वेधून घेतले.

 

टॅग्स :Bharat Bandhभारत बंदkolhapurकोल्हापूर