शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : शिवाजी पुलाचे काम फेब्रुवारीपर्यंत पूर्ण करा, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2019 13:58 IST

कोल्हापूर येथील आयुर्मान संपलेल्या शिवाजी पुलास पर्यायी म्हणून बांधण्यात येणाऱ्या नव्या पुलाचे काम फेब्रुवारी महिन्यापर्यंत पूर्ण करा. कोणत्याही परिस्थितीत काम रखडले जाऊ नये, अशी मागणी येथील सर्वपक्षीय कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रीय महामार्ग विभागाचे येथील अधिकारी व्ही. आर. कांडगावे यांच्याकडे केली.

ठळक मुद्देशिवाजी पुलाचे काम फेब्रुवारीपर्यंत पूर्ण करासर्वपक्षीय कृती समितीची मागणी

कोल्हापूर : येथील आयुर्मान संपलेल्या शिवाजी पुलास पर्यायी म्हणून बांधण्यात येणाऱ्या नव्या पुलाचे काम फेब्रुवारी महिन्यापर्यंत पूर्ण करा. कोणत्याही परिस्थितीत काम रखडले जाऊ नये, अशी मागणी येथील सर्वपक्षीय कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रीय महामार्ग विभागाचे येथील अधिकारी व्ही. आर. कांडगावे यांच्याकडे केली.नवीन पुलाचे बांधकाम ठेकेदाराचे बिल न दिल्यामुळे थांबण्याची शक्यता असल्याने त्याबाबत जाब विचारण्याकरिता हे कार्यकर्ते व्ही. आर. कांडगावे यांच्या कार्यालयात सकाळी गेले होते. त्या ठिकाणी ठेकेदार एन. डी. लाड हेही उपस्थित होते.शिवाजी पुलाचे बांधकाम ठेकेदाराची बिले दिली नाहीत म्हणून थांबता कामा नये. कोणत्या परवानगी मिळालेल्या नाहीत म्हणूनही काम थांबता कामा नये. जी काही पूर्तता करायची आहे, ती तातडीने करा; पण काम मात्र फेब्रुवारी महिन्यात पूर्ण झाले पाहिजे, असे कार्यकर्त्यांनी सांगितले.यावेळी अधिकारी कांडगावे यांनी खुलासा करताना सांगितले की, ‘पुलाच्या कामाला पुन्हा सुरुवात झाली तेव्हा एका बाजूला विहीर होती. त्याकरिता पायलिंग करावे लागले. जादा खुदाई झाली. ती सिमेंट-कॉँक्रीटने भरून घेण्यात आली. त्यामुळे वाढीव कामाला संबंधित अधिकाऱ्यांची मंजुरी मिळणे आवश्यक असून, तिची प्रक्रि याही आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. मात्र त्यामुळे काम थांबलेले नाही. काम सुरूच आहे. जास्तीत जास्त लवकर काम पूर्ण करून घेण्याचा आमचा प्रयत्न आहे.’लोकसभेच्या निवडणुका तोंडावर आहेत; त्यामुळे उपलब्ध निधी आपल्याकडे वर्ग करून घ्या, अन्यथा निधीअभावी काम बंद पडले असे होईल, अशी भीती कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. तेव्हा मात्र कांडगावे यांनी पुलासाठी १५ कोटींचा निधी मंजूर आहे, त्यामुळे काम थांबणार नाही, अशी ग्वाही दिली. यावेळी संभाजीराव जगदाळे, अशोक पोवार, बाबा पार्टे, प्रसाद जाधव, अशोक भंडारे, जयकु मार शिंदे, किसन कल्याणकर, सुभाष देसाई उपस्थित होते.

 

 

टॅग्स :pwdसार्वजनिक बांधकाम विभागkolhapurकोल्हापूर